-महावीर सांगलीकर
ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह या कथेचा पुढचा भाग:
हा हनुमंत राव म्हणजे फारच हाय आय. क्यू. असणारा माणूस होता. तो उंच आणि धिप्पाड होता. एके काळी भारतीय सैन्यात मोठा अधिकारी होता. नंतर त्याला रॉवाल्यांनी आपल्याकडे ओढले. पुढे त्याची नेमणूक रॉच्या श्रीलंकेतल्या एका विशेष मोहिमेवर झाली होती. त्यावेळी झालेल्या एका बॉम्बस्फोटात हनुमंत रावाचे तोंड भाजले होते आणि त्याचे गाल आणि ओठ कायमचे सुजले होते, त्यामुळे हनुमंत रावाचा चेहरा मारुतीसारखा दिसत असे.
रामप्रसाद आणि लखनप्रसाद हणमंत रावाच्या ऑफिसमध्ये शिरले. हनुमंत राव त्यांना बघून उठून उभा राहिला आणि अत्यंत अदबीने हात जोडून म्हणाला, ‘रामप्रसादजी, लखनप्रसादजी, आईये, आईये, बैठीये’
राम-लखन दोघेही समोरच्या खुर्च्यांवर बसले.
‘चाय लेंगे या कॉफी? या फिर दूध? या लस्सी? या कोल्ड्रिंक?’ असे म्हणत हनुमंत रावाने टेबलावरची बेल दाबली. लगेच केबिनबाहेरचा प्यून आत आला आणि अदबीने उभा राहिला.
‘बोलिये सर, आपके लिये क्या मंगाऊ?’ हनुमंत रावाने पुन्हा विचारले.
‘पहले हमारा प्रॉब्लेम तो सून लीजिये’
‘सून लेंगे, इतनी भी क्या जल्दी है..?’
मग रामप्रसादाने ‘लस्सी चलेगी’ म्हणून सांगितले.
‘और आपको?’ हणमंत रावाने लखनप्रसादला विचारले.
‘मुझे भी लस्सी चलेगी. भैया अगर अपने लिये चाय बोलता, तो मैं भी चाय बोलता’
हणमंत रावाने प्यूनला सांगितले, ‘इनके लिये दो लस्सी और मेरे लिये एक लिटर दूध ले आओ’
मग हणमंत राव रामप्रसादला म्हणाला, ‘मुझे आपकी प्रॉब्लेम मालूम है. आपकी बीबी को कोई साधू उठाकर ले गया है. लेकिन वह साधू नही, बल्कि रावन्ना-2 नामका एक खतरनाक गुंडा है. मुझे बताइये, पूना में आप लोगों ने किसी सुंदर काली लडकी के साथ छेडखानी की थी?’
रामप्रसादला पुण्यातल्या बस स्टॉपवरचा शार्प नक्खानीच्या भेटीचा प्रसंग आठवला. त्याने तो हनुमंत रावाला विस्ताराने सांगितला. मग म्हणाला, ‘लेकिन उस घटना का मेरी केस से क्या संबंध है?’
हनुमंत राव म्हणाला, ‘यह रावन्ना-2 इस शार्प नक्खानी का बडा डेंजरस बडा भाई है. आप लोगों ने शार्प की जो बेइज्जती की, उसी कारण उसने बदले की भावना से आपकी बीबी को किडनॅप किया होगा. हम छुडायेंगे आपकी बीबी को. बडा नाजूक और इंटरनॅशनल मामला है यह. खर्चा बहुत आयेगा. मेरी फीस भी अलग से देनी पडेगी’
‘खर्चे और फीस की फिकर मत किजीये आप. बस मुझे मेरी बीबी वापस चाहिये. आपका बँक अकाउंट नंबर दिजीये. मैं पैसे ट्रान्सफर करवा देता हूं’
व्यवहाराच्या गोष्टी झाल्यावर रामप्रसादाने विचारले, ‘एक बात पूछना चाहता हूं आपसे... आप साउथ इंडियन होकर भी हिंदी इतनी अच्छी कैसे बोल लेते हैं?’
‘आप को किसने कहा कि साउथ इंडियन लोग अच्छी हिंदी नही बोल सकते?’
‘पूना के लोगों से सुना. वह लोग बोलते हैं कि साउथ में हिंदी नहीं चलती’
‘पूना के lलोग...’ हणमंत राव हसत म्हणाला, ‘उन्हे पूना के बाहर क्या चल रहा है कुछ मालूम भी होता है? और मैं तो तरह तरह की हिंदी बोलता हूं... हैद्राबादी, मुंबईया, पाकिस्तानी, भोजपुरी, मारवाडी.... यहां तक की मैं अरबस्तान की हिंदी भी बोल लेता हूं. मैं सिर्फ पूनावाली हिंदी समझ नही सकता’
‘पूना की हिंदी हमारी समझ में भी नहीं आयी...’ राम प्रसाद म्हणाला.
मग रामप्रसादाने विचारले, ‘आपका यह जो व्ही. हणमंत राव नाम है, उसमें से हणमंत राव तो मेरी समज में आया, लेकिन यह व्ही. क्या है?’
‘व्ही. माने विद्याधर... हम प्राचीन भारत के विद्याधरो के वंशज हैं ना, इसिलिये अपने नाम की शुरुआत व्ही से करते है... विद्याधर हणमंत राव’
‘और यह रावन्ना-2? रावन्ना तो मेरी समझ में आया. लेकिन यह 2 क्या है?’
‘पहले भी एक रावन्ना हो चुका है, श्रीरामजी के टाईम में... आप तो जानते ही होंगे..... इसलिये यह रावन्ना अपने आपको रावन्ना-2 मानता है. सिक्वेल..’
‘अच्छा विद्याधरजी, आप कब जायेंगे मेरी बीबी को ढुंढने?’ रामप्रसादाने विचारले.
‘अभी नहीं. अभी हम यंही से पता लगायेंगे कि वह लोग कहां है’ असे म्हणत हणमंत रावाने ब-याच ठिकाणी फोन लावायला सुरवात केली. प्रत्येक फोनवर बोलताना त्याला कांही तरी क्ल्यू मिळतोय असे दिसत होते. फोन बंद करून तो रामप्रसादला म्हणाला,
‘आपकी बीबी और रावन्ना-2 अभी चेन्नई में है. मेरे लोग उन पर वॉच रख रहे हैं. हम भी निकलेंगे थोडी देर में चेन्नई के लिये. मी अभी चेन्नई के लिये टिकट बुक करावा लेता हूं’.
लखनप्रसादकडे इशारा करत हणमंत रावने विचारले, ‘इनका हाफ टिकट है ना?’
‘जी नहीं... वह दिखता छोटा है लेकिन बडा है वह’
हनमंत रावाने आणखी एके ठिकाणी फोन करून चेन्नईला जाणा-या विमानाची तीन तिकिटे ताबडतोब बुक करायला सांगितली. मग थोड्याच वेळात ते तिघं हैद्राबादच्या विमान तळावर आले. चेन्नईला जाणारे एक विमान तिथे उभेच होते.
विमानात बसल्यावर रामप्रसादाला कधी एकदा विमान उड्डाण करतेय आणि आपण सीतेला भेटतोय असे झाले होते, तर लखनप्रसादचे हात त्या खतरनाक गुंडाला मारण्यासाठी आत्तापासूनच फुरफुरत होते. हणमंत राव मात्र शांतपणे रावन्ना-2च्या तावडीतून रामप्रसादच्या बायकोला सुखरूप सोडवायचे कसे याचा विचार करत होता. त्याला अशीही शंका सतावत होती की रावन्ना-2ने तिला खरच पळवलंय की ती त्याच्याबरोबर स्वत:हून पळून गेलीय? आजकालच्या बायकांचं काय सांगता येत नाही.
ते तिघं चेन्नईच्या विमानतळावर उतरले आणि बाहेर पडले, तेवढ्यात हणमंत रावास एक फोन आला. फोनवर ऐकताना त्याचा चेहरा थोडा चिंतातूर झाला होता.
फोन कट करून तो म्हणाला, ‘रामप्रसादजी, देअर इज अ बॅड न्यूज.... रावन्ना-2 आपकी बीबी को लेकर अभी अभी कोलंबो गया है. अब यह केस बडा पेचीदा हो गया है. इंटरनॅशनल मामला, बडा मुश्कील काम... लेकिन चिंता मत कीजिये, धीरज रखिये..’
‘फिर? अब क्या करेंगे?’ रामप्रसादने विचारले
‘आपके पास पासपोर्ट तो होगा ही. लेकिन श्रीलंका का वीजा पाने में देर लगेगी. मेरे पास तो वीजा है. आप दोनो यही चेन्नई मे रुक जाईये, वीजा का बंदोबस्त किजीये, तब तक मैं कोलंबो जाकर पता लगाता हूं वह लोग कहां हैं. मेरा एक असिस्टंट आपकी मदद करेगा वीजा पाने में. फिर आप लोगों को भी कोलंबो आना पडेगा’
‘ठीक है, लेकिन आप तो मेरी बीबी को पहचान लेंगे, वह आपको कैसे पहचानेगी? विश्वास कैसे करेगी?’ असे म्हणत रामप्रसादने आपल्या बोटातली अंगठी काढून हनमंत रावास दिली. ‘पिछले बर्थ डे पर मेरी बीबी ने मुझे यह गिफ्ट में दी थी. आप उसे यह दिखाइये, उसका विश्वास हो जायेगा’
हणमंत रावाने ती अंगठी घेतली आणि ती तो आपल्या बोटात घालू लागला. रामप्रसादला ते आवडले नाही, पण तो काय बोलणार? गरज त्याला होती. पण हणमंत रावाच्या जाडजूड बोटात ती अंगठी कांही बसेना, म्हणून त्याने ती आपल्या पाकिटात ठेवली. रामप्रसादला हायसे वाटले.
+++
चेन्नई-कोलंबो फ्लाईटने हनमंत राव कोलंबोला पोहोचला. विमानतळावरून बाहेर येताच त्याने एक टॅक्सी केली. सुमारे 20 मिनिटातच तो हॉटेल लंका येथे पोहोचला. तेथे त्याच्या नावाने एक सूट आधीच बुक झाला होता.
थोड्याच वेळात तो फ्रेश झाला. सीतेचा शोध कसा लावायचा हे त्याने ही केस हाती आल्याबरोबरच ठरवले होते. रावन्ना-2 चा धाकटा भाऊ बी. भीषन्ना हणमंत रावाच्या चांगल्याच ओळखीचा होता. हणमंत राव ज्यावेळी श्रीलंकेत रॉसाठी काम करत होता, त्यावेळी बी. भीषन्ना त्याच एजंट म्हणून काम करत असे. त्याने हणमंत रावाची भेट प्रभाकिरण या खतरनाक अतिरेक्याशी घडवून आणली होती. हा प्रभाकिरण रावन्ना-2ला वचकून असे. त्यामुळे तो बी. भीषन्नालाही घाबरत असे. हणमंत राव आणि बी. भीषन्ना प्रभाकिरणची भेट घ्यायला त्याच्या अड्ड्यावर गेले होते. तेथे हणमंत रावाने प्रभाकिरणला समजावून सांगितले होते की ‘हे निरपराध लोकांना मारायचे धंदे बंद कर, तुझे इंडियातले उद्योग बंद कर नाहीतर हकनाक जीवाला मुकशील’. पण प्रभाकिरण म्हणाला, ‘जब तक है जान, तब तक लढता रहूंगा..’ त्याच्या या बोलण्याचा राग येऊन हणमंत रावाने कुणाला कांही कळायच्या आत प्रभाकिरणवर गोळ्या झाडल्या, त्यात प्रभाकिरण जागेवरच मेला. पुढे मिडीयामध्ये श्रीलंकन सेनेने केलेल्या हल्ल्यात प्रभाकिरण मरण पावला अशी बातमी आली. असो.
पुढे बी. भीषन्नाने कोलंबोत प्राइव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी चालू केली होती.
सीतेला शोधण्यात बी. भीषन्ना फारच उपयोगी पडू शकतो हे हनमंत रावाने हेरले होते, कारण बी. भीषन्नाच्या भावानेच सीतेला किडनॅप केले होते, त्यामुळे तिचा ठावठिकाणा शोधण्याचे काम तोच चांगल्या रीतीने करू शकत होता.
हनमंत रावाने बी. भीषन्ना याला टेक्स्ट मेसेज पाठवून आपण आलो असल्याची खबर दिली आणि उद्या सकाळी हॉटेल लंकामध्ये येऊन भेटायला सांगितले.
दुसरे दिवशी सकाळी बी. भीषन्ना हनमंत रावास भेटायला आला.
‘आप किसी इंडियन लडकी की तलाश में आये हैं ना यहां?’ बी. भीषन्नाने आल्या आल्याच हनमंत रावास विचारले.
‘हां’, हनमंत राव म्हणाला, ‘लेकिन यह बात तुम कैसे जानते हो?’
‘मेरे एजंट चेन्नई से लेकर पूना तक फैले हुये है.... मुझे खबर मिलती रहती है...’
‘तो फिर उस लडकी की खबर भी होगी?’
‘येस... आण्णा ने उसे अपने फार्म हाउस में रखा है... असोका गार्डन..’
‘कहां है यह असोका गार्डन?’
‘यहां से कुछ 15-20 किलोमीटर दूर है.. मैं मेरी कार आया हूं, लेकिन हम सिटी बस से जायेंगे..’
‘अभी जायेंगे?’ हनमंत रावाने विचारले.
‘हां, तुरंत...’ बी. भीषन्ना म्हणाला, ‘आण्णा अभी वहां नहीं होगा. आपको उस लडकी से मिलना अभी आसान रहेगा’
दोघे हॉटेल पासून जवळच्या बस स्टॉपवर आले, आणि कांही वेळातच त्यांना बस मिळाली आणि 20-25 मिनिटात ते फार्म हाऊसजवळ पोहोचले देखील. असोका गार्डनचे गेट बंद होते. बी. भीषन्नाला बघून गेट वरच्या वॉचवुमनने लगेच गेट उघडले आणि सॅल्यूट ठोकला. बी. भीषन्नाने हनुमंत रावास आत यायला सांगितले. समोर एक मोठा महाल दिसत होता. दोघेही महालाच्या दिशेने चालले. बी. भीषन्नाला सगळ्याच सुरक्षा रक्षिका सॅल्यूट ठोकत होत्या. महालाजवळ पोहोचल्यावर तिथली चीफ रक्षिका उठून उभी राहिली आणि तिनेही सॅल्यूट ठोकला. बी. भीषन्नाने तिला सिंहली भाषेत विचारले, ‘वह इंडियन लडकी कहां है? हम उससे मिलना चाहते है’
‘सर, अभी बुलाती हूं मैं उसे, आप बैठीये’
‘उसे कहना उसे मिलने के लिये इंडिया से कोई आया है’
‘जी सर’ असे म्हणत ती सीतेला बोलवायला आत गेली आणि थोड्याच वेळात तिला घेऊन बाहेर आली.
‘हम कॉन्फरन्स रूम में बैठेंगे’ बी. भीषन्ना चीफ रक्षिकेला म्हणाला.
‘जी सर’ म्हणत तिने जवळच असलेल्या कॉन्फरन्स रूमचे दार उघडून दिले.
बी. भीषन्ना, हनमंत राव आणि सीता हे तिघे त्या रूममध्ये गेले.
सीता त्या दोघांनाही ओळखत नव्हती, त्यामुळे ती हे दोघे कोण असावेत यांचा अंदाज लावत होती. एवढ्यात बी. भीषन्ना म्हणाला,
‘हॅलो, मायसेल्फ इज बी. भीषन्ना... मैं रावन्ना का छोटा भाई हूं. और यह हणमंत राव हैं, इंटरनॅशनल प्राइव्हेट डिटेक्टिव्ह. आपके पतिने आपको ढुंढने और यहां से छुडाने का काम इन्हे दिया हैं, इसिलिये ये इधर आये हैं’
मग तो हनमंत रावास म्हणाला, ‘आप दोनो बातें कीजीये, तब तक मैं बगीचे में टहलकर आता हूं’
बी. भीषन्ना गेल्यावर सीता हनमंत रावास म्हणाली, ‘मेरी तो एक बात समझ में नहीं आ रहा है... अगर आपको सचमुच मेरे पतिने भेजा है, तो रावन्ना का भाई आपके साथ कैसे? कुछ तो गडबड है.. कुछ सबूत है आपके पास जो साबित कर सके कि आपको रामप्रसादने ही भेजा है?’
हणमंत रावाने लगेच आपल्या पाकिटातून रामप्रसादने दिलेली अंगठी काढली आणि सीतेला दाखवली. म्हणाला, ‘उसने यह अंगूठी दी है पहचान के लिये. आपने उसे बर्थ डे पर गिफ्ट दी थी ना यह?’
‘हां, लेकिन इससे यह कैसे साबित होता है कि आपको राम प्रसाद ने भेजा है? हो सकता है कि आपने यह अंगूठी राम प्रसाद से छीन ली हो... या आपने वैसीही दुसरी अंगुठी खरीदकर लायी हो ...’
हनमंत रावास तिच्या शंकेचे कौतुक वाटले. तो म्हणाला, ‘ठीक है, आप खुद रामप्रसाद जी से बात कीजीये’. त्याने लगेच आपल्या सेलफोन वरून रामप्रसादला फोन लावला. फोन लागताच तो म्हणाला, ‘राम प्रसादजी, मैने आपकी बीबी को ढुंढ लिया है. लीजिये, उससे बात किजीये’
त्याने सीतेकडे फोन दिला.
तिकडून आवाज आला,
‘हाय डीअर, कैसी हो तुम?’
‘बिलकुल मजे में हूं’, सीता म्हणाली, ‘एक बडे फार्म हाऊस में रहती हूं. कोई तकलीफ नहीं है, लेकिन अब मैं यहां से निकलना चाहती हूं. बडा मुश्किल काम है यहां से निकलना, तुम जल्दी आ जाओ’
‘आऊंगा. चिंता मत करना’
मग हनमंत रावाने रामप्रसादला ताबडतोब हॉटेल लंका येथे यायला सांगितले. कसे यायचे ते सांगितले. मॅपही पाठवला. मग सीतेस म्हणाला, ‘अभी मैं जाता हूं. कल फिर आऊंगा राम प्रसाद के साथ. टेक केअर, बाय..’
हणमंत राव कॉन्फरन्स रूम मधून बाहेर पडला. त्याला बाहेर बगीचात बी. भीषन्ना झाडांना पाणी घालत असलेला दिसला. हणमंत राव त्याच्याकडे गेला. म्हणाला, ‘अपना आधा काम हो गया. चलो जल्दी, मुझे और भी कुछ काम करने है’
मग ते गेटच्या दिशेने निघाले. तेवढ्यात गेटचे दार उघडले गेले आणि बाहेरून रावन्ना-2 आत आला. त्याच्या सोबत उंचेपुरे, धिप्पाड असे आणखी दहा लोक होते. त्यांना पहाताच बी. भीषन्ना मनातून चरकला. हणमंत रावास म्हणाला, ‘आण्णा आ गया. उसके साथ जो दस लोग है वह उसके बॉडीगार्डस है. हम बुरे फंस गये हैं ...’
हनमंत रावाने त्याला शांत रहायला सांगितले. रावन्नाला त्याच्या बॉडी गार्डससहित लोळवणे हणमंत रावासाठी सहज शक्य होते. पण आत्ता असे कांही करने सीतेच्या सुटकेच्या दृष्टीने चुकीचे होते, त्यामुळे त्याने वेगळा डाव खेळण्याचे ठरवले. तो बी. भीषन्नाला म्हणाला, ‘देखो, मैं बॉटनी का प्रोफेसर हूं... समझ गये ना?’
‘अच्छी तर समझ गया’ बी. भीषन्ना म्हणाला. मग तो धावत धावत रावान्नाकडे गेला. ‘पाय लागू भैय्या’ असे सिंहली भाषेत म्हणत त्याच्या पाया पडला.
मग हनमंत रावाची ओळख करून देत म्हणाला, ‘इनसे मिलीये... यह है डॉक्टर जगदीश चंद्रा... बांगला देश से आये हैं.... बहोत बडे सायंटिस्ट है बॉटनी के. इनको नोबेल प्राईझ मिलने वाला है. अपनी गार्डन में असोका के पेड देखना चाहते थे, इसलिये मैं इन्हे लेकर यहां आया था’
‘जगदीश चंद्रा....’ रावन्ना डोक्याला ताण देत म्हणाला, ‘यह नाम पहले कहीं सुना हुआ लागता है..’
‘रेडियो पर सुना होगा’ बी. भीषन्ना म्हणाला.
‘शायद’ असे म्हणत रावन्ना ने कमरेत झुकून हणमंत रावाला वंदन प्रणाम केला, मग नमस्कार केला, नंतर शेक ह्यांड केला, मग गळाभेटही घेतली, व शेवटी हणमंत रावाच्या गालाला गालही लावले. त्याने असे करण्याचे कारण म्हणजे त्याचा ‘थिंक ग्लोबल’ या उक्तिवर प्रचंड विश्वास होता आणि तो वेगवेगळ्या देशातील अभिवादनाच्या प्रथा पाळत असे.
‘अच्छा, तो हम चलते है...’ हनमंत राव रावन्नाला म्हणाला, ‘कल फिर आनेवाला हूं... आपसे जरूर मिलना चाहूंगा’
‘जरूर जरूर. कल दिनभर मैं यहीं रहूंगा’ रावन्ना म्हणाला.
मग हनमंत राव आणि बी. भीषन्ना हॉटेलकडे जाण्यासाठी गार्डन बाहेरच्या बसस्टॉप वर आले.
पुढे चालू ...
या कथेचा आधीचा भाग:
ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा