Advt.

Advt.

Tuesday, November 17, 2015

ज्याचे त्याचे संस्कार


-महावीर सांगलीकर 


एक हत्तीण आणि तिचं पिल्लू एका गल्लीतनं चालले असताना त्या गल्लीतलं एक कुत्रं पाठीमागून त्यांच्यावर भुंकायला लागलं. याचा हत्तीणीच्या पिल्लाला राग आला आणि ते मागे वळून त्या कुत्र्यावर धावून जायला लागलं. हत्तीणीनं आपल्या सोंडेनं पिल्लाचं शेपूट धरून ओढलं आणि त्याला म्हणाली, ‘बाळा, कुत्र्यांच्याकडे कधी लक्ष देऊ नये. आपण आपल्या वाटेनं चालत राहावं. तसाही कुत्र्यांच्या भुंकण्याचा आपल्याला फायदाच होतो. लोकांचं लक्ष कुत्र्याकडे नाही तर आपल्याकडे जातं’

कुत्रा भुंकत असताना त्याचं पिल्लू मात्र खेळत-बागडत होतं. कुत्र्याला आपल्या पिल्लाचा राग आला. ते त्याच्यावर भुंकत म्हणालं, ‘अरे कार्ट्या, आपल्या गल्लीत एवढे मोठे हत्ती शिरलेत आणि तू खेळत काय बसला आहेस? तुला कांही कळतं की नाही? आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्यावर आणि आपल्याच लोकांच्यावरदेखील भुंकायचं असतं नेहमी, लक्षात ठेव. भुंकायला शिक, नाहीतर तुला कुत्रं सुद्धा विचारणार नाही!’

हेही वाचा:
संगतीचा परिणाम
वाचक
एक न-प्रेमकथा

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा