Advt.

Advt.

रविवार, २४ ऑगस्ट, २०१४

कोलंबो टू चेन्नई

-महावीर सांगलीकर


आधुनिक रामायण भाग 4 था:

विमानात सीता आणि रामप्रसाद शेजारी-शेजारी बसले होते, तर दुसरीकडे थोड्या अंतरावर हनमंत राव आणि लखनप्रसाद ही जोडी बसली होती.

हनमंत राव लखनप्रसादला म्हणाला, ‘मैं आपको एक टीप देना चाहता हूं’
‘कैसी टीप?’ लखनप्रसादने विचारले.
‘यही की जब गुस्सा आता है तब माइंड कंट्रोल करना चाहिये. लर्न टू कंट्रोल युअर माइंड’, हनमंत राव म्हणाला.
‘हां.... आजकाल मैं हररोज हनुमान चालीसा पढता रहता हूं, माइंड कंट्रोल करने के लिये’
‘उस से क्या होता है? आप इतने पढे लिखे हो, आपको माइंड कंट्रोल के मॉडर्न तरीके अपनाने चाहिये’
‘लेकिन यह मॉडर्न तरीके मुझे सिखायेगा कौन?’
‘गुगल कीजिये, ढेर सारी जानकारी मिल जायेगी आपको... किसी गुरू-बिरू की जरूरत ही नही. सेल्फ स्टडी इज सुप्रिम स्टडी’, हनमंत रावाने सांगितले.

दुसरीकडे सीता नेहमीप्रमाणे रामप्रसादपुढे बडबड करत होती आणि रामप्रसादही नेहमीप्रमाणे ती काय बोलतेय हे न ऐकताच हो हो, नाही नाही अशा अर्थाने मान हलवत होता. हे सीतेच्या लक्षात आल्यावर त्याच्या हातावर चापट मारत ती म्हणाली, ‘क्या सोच रहे हो रामन्ना? कुछ बोलते क्यों नहीं?’ 

‘रामन्ना?’ रामप्रसादने चमकून विचारले, ‘यह किस नये नाम से पुकार रही हो मुझे तुम?’
‘हम चेन्नई जा रहें हैं ना, वहां रामप्रसाद को रामन्ना बोलते है, इसिलिये मैं ने तुम्हे इस नाम से पुकारा’ सीतेने उत्तर दिले.
‘अच्छा, यह बात है... फिर तो जब हम चेन्नई से पूना के लिये रवाना होंगे तब तुम मुझे रामभाऊ कहने लगोगी...’ रामप्रसाद म्हणाला.
‘नहीं..’ सीता म्हणाली, ‘रामभाऊ का मतलब रामू भैय्या होता है. वहां तो मैं तुम्हे सिर्फ रामू कह कर पुकारुंगी’
‘तो मैं क्या तुम्हारा नौकर हूं?’ रामप्रसाद डोळे वटारत म्हणाला.
‘मैं ने ऐसा तो नहीं कहा...’ सीता हसत म्हणाली. मग तिने विषय बदलला.
‘पूना पहुंचने के बाद हम उर्मिला को वहां बुलायेंगे. बेचारी बोअर हो गयी होगी’
‘ठीक है, लेकीन पहले लखनप्रसाद को पुछना चाहिये’
‘उसीने कहा मुझे. बेचारा वह भी बोअर हो गया है’
‘फिर ठीक है’
मग त्यानेही विषय बदलत विचारले, ‘एक बात मेरी समझ में नहीं आ रही है... यह सब तुमने किया कैसे?’
‘मैं ने क्या किया?’
‘यही... तुमने रावन्ना-2 को चकमा कैसे दिया? कुछ तो गडबड है’
‘मैं फिर कभी बताउंगी’
‘अभी क्यों नहीं?’
‘क्यों कि वह एक सिक्रेट है... फिलहाल राज को राज रहने दो... पूना पहुंच ने का बाद मैं डिटेल में पूरी स्टोरी सुना दूंगी’
‘ये बात है.. यानि तब तक तुम सोचकर तय करोगी की मुझे क्या बताना है’
‘ऐसी कोई बात नहीं. तुम्हारा  यही प्रॉब्लेम है, शक करने की तुम्हारी आदत गयी नहीं अबतक... कॉलेज में भी तुम मुझ पर शक किया करते थे’

+++

तिकडे सा-या भारतात गेला आठवडाभर सीतेने श्रीलंकेत केलेल्या पराक्रमाची चर्चा चालू होती. मेडियाला आपला टी.आर.पी. वाढवण्यासाठी हे एक नवे खाद्य मिळाले होते. सीता ही जनक सिंह यांची मुलगी असल्याचे मेडियाला कळल्यामुळे त्यांचेही नाव आणखी गाजू लागले आणि त्यांचे राजकीय वजन आणखी वाढले.

त्या दिवशी चेन्नई विमानतळावर सीतेचे स्वागत करायला अनेक व्ही.आय.पी. लोक जमा झाले होते. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री, चेन्नईच्या मेयर, अनेक मंत्री, केंद्र सरकारचे प्रतिनिधी, शिवाय न्यूज टी.व्ही.वाले, खरे-खोटे पत्रकार यांची तोबा गर्दी विमानतळावर झाली होती.

एवढ्यात एक सुरक्षा अधिकारी धावत धावत मुख्यमंत्र्यांच्या जवळ आला आणि त्यांच्या कानात कांही तरी कुजबूजला. ते ऐकून मुख्यमंत्र्यांचा चेहरा उतरला. त्या तिथून हलल्या आणि निघून गेल्या. त्यांच्या मागोमाग मंत्रीही निघून गेले. त्यामागोमाग चेन्नईच्या मेयर आणि त्यांच्या सोबतची मंडळी घाई-घाईत निघून geगेली. केंद्र सरकारचे प्रतिनिधीही गेले.

तितक्यात एक अनाउन्समेंट झाली. सुरक्षेच्या कारणासाठी सर्व प्रेक्षक, पत्रकार, बघे यांना विमानतळ सोडण्याचा आदेश देण्यात आला. ते बाहेर जात असतानाच विमानतळावर अनेक कमांडो आले.

कांहीतरी विचित्र घडलंय याचा अंदाज पत्रकारांना आला. पण नेमकं काय घडलंय हे त्यांना कळलं नाही.
वेगवेगळे अंदाज लावले जावू लागले. न्यूज चॅनल्सवर ‘चेन्नई विमानतळावर इमरजन्सी’ अशी बातमी स्क्रोल होवू लागली. पत्रकारांनी वेगवेगळ्या मार्गाने बातमी काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या हाती कांही लागले नाही.

पण असल्या बातम्या काढण्यात माहीर असलेल्या ‘अचानक न्यूज’ या चॅनलच्या एका लेडी रिपोर्टरने काय घडलंय याची नेमकी बातमी मिळवलीच. ‘कोलंबो से चेन्नई आनेवाला हवाई जहाज गायब’ ही बातमी तिने थेट विमानतळाच्या बाहेरूनच ‘लाईव्ह’ सांगितली. विमानाकडून येणारे सिग्नल्स बंद झाल्याची अधिकची माहिती त्या रिपोर्टरने सांगितली. या बातमीमुळे सगळीकडे खळबळ उडाली, तर इतर न्यूज चॅनलवाल्यांना खूप दु:ख झाले. म्हणजे विमान गायब झाले म्हणून नव्हे, तर ही बातमी आधी त्यांना मिळाली नाही म्हणून. असो.

अर्थातच विमानतळावरच्या अधिका-यांना नेमकं काय झालय हे माहीत होतच. ही गोष्ट तातडीने वरिष्ठांना कळवण्यात आली. विमानाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली. इंडियन नेव्हीची जहाजे, त्या जहाजांवरची विमाने, श्रीलंकन नेव्हीची जहाजे आणि विमाने यांनी कोलंबो आणि चेन्नई यांच्या मधला समुद्र पिंजून काढला. पण त्यांना विमानाचा शोध लागला नाही. नंतर इस्रो, नासाच्या उपग्रहांची मदत घेण्यात आली, पण त्यांनाही कांहीच गवसले नाही.

विमानाचे सिग्नल्स यायचे बंद झाले त्यावेळी विमान आकाशात ज्या पॉइंटला होते, त्याच्या खालील समुद्रतळाचा पन्नास किलोमीटर आजूबाजूचा परिसर नौदलाच्या पाणबुड्या आणि पाणबुडे यांनी पालथा घातला. विमान नाही पण निदान त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडेल असे वाटले होते, पण कसचे काय. एवढे मोठे विमान सापडले नाही, मग ब्लॅक बॉक्स तरी कसा सापडेल बरे? शेवटी कंटाळून ही शोधमोहीम बंद करण्यात आली. विमानातील प्रवाशांचे नातेवाईक आक्रोश करू लागले. मंदिरे, मशिदी, चर्चेसमध्ये विमानातील प्रवाशांना श्रद्धांजली वहाण्यात आली. एका साधूने ते प्रवासी त्यांच्या गेल्या जन्मातल्या वाईट कर्मामुळे मेले असा शोध लावला. त्या साधूच्या या वक्तव्याचा अनेकांनी कडक निषेध केला. एका रॅशनल थिंकरने त्या साधूला जाहीर प्रश्न विचारला, ‘प्रवाशांचं ठीक आहे, त्यांनी गेल्या जन्मात पाप केले असेल, पण त्या विमानाने काय पाप केले होते?’

पंतप्रधानांनी विमानातल्या प्रत्येक प्रवाशाच्या जवळच्या नातेवाईकास भरघोस आर्थिक मदत जाहीर केली.
आगाव जनतेकडून सीतेला तिच्या पराक्रमाबद्दल मरणोत्तर अशोकचक्र देण्याची मागणी करण्यात येऊ लागली. विशेष म्हणजे ही मागणी सगळ्यात आधी पुण्यातनं करण्यात आली. आणखी विशेष म्हणजे ही मागणी करणा-यांमध्ये परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन करणारे आणि सीतेला भाड्याने फ्लॅट द्यायला नाकारणारे लोक आघाडीवर होते.

पुण्यातल्या एका मराठी पेप्राने सीतेचे पूर्वज मूळचे महाराष्ट्रातलेच होते असा मराठी मन सुखावणारा शोध देखील लावला.

हळूहळू लोक हळहळायचे थांबले. पेपरवाले, न्यूज चॅनलवाले हे विमान प्रकरण विसरूनही गेले. मेडियावाले दुस-या एखाद्या ब्रेकिंग न्यूजच्या शोधात होते. त्यांना तशी एक बातमी मिळालीही. दिल्लीमध्ये शाळेत चाललेला एक मुलगा केळीच्या सालीवरून घसरून पडला होता. त्याचा आंखो देखा हाल अनेक न्यूज चॅनल्सवाले दाखवू लागले. त्या बातमीची दाखल घेत दिल्ली सरकारने तातडीने शाळांच्या परीसरात शंभर मीटरपर्यंत केळीच्या विक्रीला आणि केळी खाण्याला बंदी घालणारा आदेश काढला. त्यांचे बघून इतर अनेक राज्य सरकारांनीही असेच आदेश काढले. त्यामुळे केळीचे भाव पडले. तिकडे लोकसभेच्या एका पोट निवडणुकीत एक बडा नेता पडला. दुसरीकडे पाडापाडीच्या राजकारणाची आवड असणा-या एका वजनदार नेत्याने एका राज्याचे सरकार पाडले. भरीस भर म्हणून इंडिया-पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तान विजयी झाले, त्यामुळे क्रिकेट प्रेमींचे चेहरे घाऊकपणे पडले. या सगळ्या पडण्यांमुळे विमान पडल्याची चर्चा पूर्ण बंद पडली.

नाही म्हणायला एका प्रसिद्ध पाक्षिकाने विमानाच्या गायब होण्यावर एक विशेषांक काढला होता. त्यात हे विमान एलियन्सनी वरच्या वर गायब केले असावे आणि ते त्या विमानाला आपल्या ग्रहावर घेवून गेले असावेत असा अंदाज व्यक्त केला होता.

+++

विमान गायब झाल्या नंतर तब्बल बारा दिवसांनी श्रीलंकेच्या अध्यक्षांना एक पत्र आले. ते पत्र सिंहली भाषेत होते. त्या पत्राचा मराठी अनुवाद असा:

कराची, पाकिस्तान

माननीय अध्यक्ष साहेब, श्रीलंका
सप्रेम नमस्कार विंनती विशेष

आता पत्रास कारण की कोलंबोवरून चेन्नईला जाणारे विमान गायब झाले, पडले अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे असे ऐकले. पण ते विमान सुरक्षित आहे. त्यातील प्रवाशी मजेत आहेत. ते विमान प्रवाश्यांच्यासह आम्ही तुमच्या ताब्यात देवू इच्छितो. आमच्या या चांगल्या कामास आपण सहकार्य करावे ही विनंती.

इथे गेले दोन दिवस भरपूर पाऊस पडला. प्रवाश्यांनी त्या पावसात भिजून त्याचा आनंद घेतला. कांही प्रवाशांना सर्दी-पडसे झाले, पण आम्ही त्यांच्यावर तातडीने उपचार केले.

हे पत्र मिळताच आपण टी.व्ही. वरून ‘देश के नाम संदेश’ द्यावा आणि विमान आणि त्यातले प्रवाशी सुखरूप असल्याचे जनतेला सांगून तिला दिलासा द्यावा ही नम्र विनंती.

अशाच प्रकारचे एक पत्र आम्ही भारताच्या पंतप्रधानांना पाठवले आहे.

आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, प्रवाशांची अजिबात काळजी करू नये ही विनंती.

कळावे, लोभ असावा.

आपले विश्वासू
हायजॅकर्स

इकडे भारताच्या पंतप्रधानांना अशाच प्रकारचे एक पत्र मिळाले. दोन्ही देशाच्या इंटेलिजन्स एजन्सीज सावध झाल्या. पत्र पाकिस्तानमधून आले होते, आणि ते ज्या दिवशी पोस्ट करण्यात आले होते त्याच्या आधी दोन दिवस कराचीमध्ये खरेच पाउस पडला होता अशी माहिती रॉच्या एका पाकिस्तानी हस्तकाने कळवली. त्यामुळे विमान पळवण्यात पाकिस्तानचा हात आहे हे नक्की करण्यात आले. दिल्लीतल्या पाकिस्तानच्या राजदूताला बोलावून त्याला जाब विचारण्यात आला. त्याने दिलेले उत्तर विचित्र होते. तो म्हणाला, ‘विमान पळवण्यात पाकिस्तान सरकारचा अजिबात हात नाही. ते जर पाकिस्तानच्या सैन्याने किंवा आय.एस.आय.ने पळवले असेल तर त्याचा आमच्या सरकारशी कांहीच संबंध नाही. आणि तालिबानने पळवले असेल तर ते त्यांनी आम्हाला आधी सांगूनच पळवले असते. पण आम्हाला यातले कांहीच माहीत नाही. तसेच विमान पाकिस्तानात असते तर तुमच्या रॉवाल्यांना ते कधीच कळले असते’

त्या राजदूताला भारत सोडून जाण्याचा हुकूम देण्यात आला. त्याचा बदला म्हणून पाकिस्ताननेही तिथल्या भारतीय राजदूताला देश सोडायला सांगितले. दोन्ही देशातला तणाव वाढला. सीमेवरचे सैन्य सावध झाले. दोन्ही देशाच्या जनतेत युद्धज्वर वाढला. कधी एकदा लढाई होतेय असे झाले दोन्हीकडच्या जनतेला.

एवढ्यात श्रीलंका आणि भारत या दोन्ही देशाच्या प्रमुखांना आणखी एक पत्र आले. त्यात लिहिले होते,
‘विमान पाकिस्ताने पळवले किंवा पाकिस्तानात आहे असा आपला गोड गैरसमज झाला आहे असे दिसते. पण विमान तेथे नाही. आम्ही फक्त आधीचे ते पत्र कराचीमधून पोस्ट केले होते. विमान कोठे आहे ते आम्ही तुम्हाला आत्ताच सांगणार नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही ते विमान स्वत:हून तुम्हाला देणार आहोत. आमच्या मागण्या अशा आहेत:

1.    रावन्ना-2ला तुरुंगातून सोडून देण्यात यावे, आणि त्याला श्रीलंकेतून सुरक्षितपणे बाहेर जाण्याची परवानगी देण्यात यावी.
2.    कोलंबोची ए.एस.पी. विजया जयसिंहा आणि रावन्नाचा भाऊ बी. भीषन्ना यांना आमच्या ताब्यात देण्यात यावे.
3.    सीता आणि हनमंत राव हे आमच्याच ताब्यात रहातील, बाकी सगळ्या प्रवाशांना आम्ही सुखरूप सोडून देवू.

विमानाचा शोध घेण्यात वेळ वाया घालवू नये, आमच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणजे ते विमान तुम्हाला सहजच मिळेल. मागण्या मान्य न केल्यास विमान समुद्रात बुडवण्यात येईल असा मजकूरही त्या पत्रात होता.

हे पत्र सिंगापूर वरून पोस्ट करण्यात आले होते. त्यामुळे इंटेलीजन्स एजन्सीज आणखी चक्रावल्या.

विमान रावन्नाच्या लोकांनी पळवले हे तर आता नक्की झाले होते. आता रावन्नाची कठोर चौकशी सुरू झाली. त्याचवेळी ते विमान कोठे असावे याचाही शोध घेण्यात येऊ लागला. अगदी ज्योतिषी, मांत्रिक यांचीही मदत घेण्यात येऊ लागली.

पुढे चालू ......


या कथेचे आधीचे भाग:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा