Advt.

Advt.
Mahaveer Sanglikar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Mahaveer Sanglikar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

टीना की कहानी

-महावीर सांगलीकर



मी एका whats app ग्रुपची मेम्बर्स लिस्ट चेक करत होतो तेंव्हा त्या लिस्ट मधल्या ~Teena या नावावर माझी नजर थबकली.  कोण असावी बरं ही? नावावरनं तरी लहान मुलगी वाटते. लहान म्हणजे शाळा-कॉलेजमधली. पण कांही सांगता येत नाही. मी तरुण असताना माझ्या ओळखीची टीना नावाची एक छोटी मुलगी होती. 

त्यावेळी मी एक फोटोग्राफर होतो.  त्या टीनाचा मी  एक सुंदर फोटो काढला होता. तो तिच्या आई-वडिलांना एवढा आवडला होता की त्यांनी तो मोठा करून घेतला आणि फ्रेम करून घरी लावला. पुढं ती टीना माझ्या डोळ्यासमोरच तरुण झाली, तिचं लग्न झालं आणि ती सासरीही गेली. तिला आता मुलंही झालीत. सांगायचा मुद्दा म्हणजे वयस्कर बायकांचं नावही टीना असू शकतं. म्हणजे ही whats app टीना लहान असू शकते किंवा मोठीही असू शकते.

मी सहसा आपणहून कुणाला मेसेज पाठवत नाही. चॅटिंगचा तर प्रश्नच नाही. पण कांही वेळा मेसेज पाठवणं माझ्याकडनं आपोआपच घडून जातं. त्यामागं कांही हेतू नसतो. वाटलं म्हणून पाठवला, असं होतं. मग चॅटिंगही सुरू होतं. असो.

मी टीनाला एक मेसेज पाठवला, हाय टीना!
थोड्याच वेळात टीनाचं उत्तर आलं, हाय! व्हू इज धिस?
‘महावीर सांगलीकर’
‘ओह... बोलिये सर’

वेल! म्हणजे ती मला ओळखत होती. प्रत्यक्षात नसलं तरी नावानं तरी. पण यात कांही विशेष नव्हतं. म्हणजे मी खूप प्रसिद्ध आहे म्हणून नाही, तर तिनं माझ्या पोस्ट्स त्या ग्रुपमध्ये वाचल्या असतील. त्यामुळं  ती मला ओळखत असेल.
‘कुछ नहीं... ऐसे ही मेसेज किया’ मी तिला उत्तर दिलं.

एव्हाना तिचा डी.पी. दिसू लागला होता. ती एखादी कॉलेज कुमारी नव्हे तर एक मध्यमवयीन बाई होती. तिच्या चेहऱ्यावरनं मी लगेच ओळखलं, शी इज अ जिनिअस लेडी! मी हे पण ओळखलं की तिचा जन्मांक 8 असणार. जन्मतारीख 8, 17 किंवा 26 पैकी एखादी, पण शक्यतो 8च. हे असं ओळखणं मला अलीकडं खूपच सोपं जातं. म्हणजे त्यासाठी फारसा विचार करावा लागत नाही, एका क्षणातच कळतं. क्वचित कधीतरी अंदाज चुकतो. पण हवामान खात्याच्या अंदाजाइतकी चूक होत नाही.

एवढ्यात टीनाचा मेसेज आला,
‘सर आप न्यूमरॉलॉजिस्ट है ना?’
‘येस’
‘मेरा बताईये ना!’
‘तुम्हारा क्या बताऊं?
‘न्यूमरॉलॉजी’
‘ओके. गिव्ह युवर डेट ऑफ बर्थ’
‘8 ऑगस्ट’
अरे बापरे! आपण अंदाज केला आणि हिची जन्मतारीख खरंच 8 निघाली! जन्म महिनाही आठवा. लगेच मला जाणवलं, हिची माझी चांगलीच मैत्री जमणार आहे.
मी तिला सांगितलं, ‘देखो टीना, यू आर मटेरिअली अ व्हेरी सक्सेसफुल लेडी. यू आर अ रिच पर्सन अँड युवर लाईफ स्टाईल इज रॉयल. यू आर जिनिअस, स्पिरिच्युअल अँड ह्युमॅनेटेरीअन. स्पिरिच्युअली अँड मटेरिअली यू आर व्हेरी हॅप्पी. बट....’
‘बट व्हॉट?’
‘यू आर नॉट सो हॅप्पी इन युवर फॅमिली लाईफ...’
‘और...?’
‘और प्रॉबेबली यू आर वर्किंग इन अ फिल्ड रिलेटेड टू इंटलेक्ट.. लाईक एज्युकेशनल etc. ’
‘सर, मुझे लगता है आपने मेरे बारे में पहले ही किसी से पूछ रखा है!’
‘नहीं टीना जी.... मुझे किसी के बारे में पुछना नहीं पडता. मेरे लिये किसी की  डेट ऑफ बर्थ ही काफी होती है, उसके बारे में जानने के लिये . तुम्हारी केस में तो मेरे सामने डेट ऑफ बर्थ के साथ साथ तुम्हारा चेहरा भी हाजीर है’
‘सर आपने मेरे बारे में जो कुछ कहा वह लगभग सब सच है. लेकिन सर एक बात मेरी समझ में नहीं आयी...’
‘कौन सी बात?’
‘उस ग्रुप में मैं पीछले दो सालों से हूं....  आप भी हैं. लेकिन आज अचानक आपने मुझे मेसेज कैसे भेज दिया? मतलब आज ही क्यों? इतने दिनों तक क्यों नहीं?’
‘शायद हर किसी घटना के पीछे समय का रोल राहता है. समय से पहले या बाद में कुछ नहीं होता. अगर कोई व्यक्ति अचानक तुम्हारे जीवन में आता है, तो समझ लेना उसके पीछे समय का ही रोल है. तुम तो स्पिरिच्युअल हो  तुम्हें तो मालूम ही होगा यह सब..’
‘हां सर’
‘वेल, शायद वही थेअरी यहां काम कर गयी हो’
‘हो सकता है’
‘वेल, तुम काम क्या करती हो?’
‘सर, मैं टीचर हूं’
‘अरे वा.... दॅट इज अ परफेक्ट प्रोफेशन फॉर यू’
‘यस सर. आय लव्ह माय प्रोफेशन’
‘कौन से स्कूल में पढाती हो?’
‘सर शिवाजी नगर में  एक इंग्लिश मेडियम स्कूल है..  वहां मैं के.जी. से सातवी तक पढाती हूं’
‘गुड... और सब्जेक्ट्स?’
'सभी... ए टू झेड'
'गुड'
‘और सर मैं बच्चों के लिये क्लासेस भी लेती हूं’
‘गुड... और क्या करती हो’
‘सर मैं स्पोकन इंग्लिश के क्लासेस भी लेती हूं’
‘अरे वा, गुड गुड’
‘सर आप क्या करते हो.... न्यूमरॉलॉजी के अलावा’
‘न्यूमरॉलॉजी इस माय प्रोफेशन... बट माय पॅशन इज ऑब्झर्विंग... आय ऑब्झर्व पिपल, देअर फेसेस, देअर बॉडी लँग्वेज अँड देन आय अॅनालाईझ देम. इन शॉर्ट, मैं लोगों को पढता हूं'’
‘आय सी..... इट इज इंटरेस्टिंग..... और क्या करते हो सर?’
‘मैं लिखता हूं.. स्टोरीज, आर्टिकल्स वगैरा... यू आर अ लकी बेबी, सून देअर विल बी टीना'ज स्टोरी रिटन बाय महावीर सांगलीकर..’
‘लेकिन सर मैं मेरी स्टोरी किसी को नहीं बताती हूं... मैं किसी से जादा कुछ शेअर नहीं करती... यह मेरी बडी प्रॉब्लेम है’
‘दॅट इज नंबर 8 पिपल प्रॉब्लेम... बट डोंट वरी... आगे तुम मुझसे बहुत कुछ शेअर करने वाली हो’
‘नही सर.... नॉट पॉसिबल’
‘आय बेट.... यू विल शेअर’
‘सर, आय बेट.... आय विल नॉट’
‘देखोगी....’
‘आप भी देखोगे’

रात्री ती परत आली. त्यावेळी तिचा डी. पी. बदललेला होता.
‘हाय सर..’
‘हाय टीना, बोलो!’
‘कुछ नहीं, ऐसे ही... सर मेरा नया डी.पी. देखा?’
‘हां, देखा’
‘सर मैं रोज डी.पी. बदलती हूं’
‘क्यों?’
‘ऐसे ही’
मग मी न मागताच तिनं मला तिचे 7-8 फोटो पाठवले. केसांच्या बटा  काढलेल्या, ओठांना लाली लावलेली आणि भरपूर मेक अप केलेलं. साडी किंवा पंजाबी ड्रेस मधला एकही फोटो नव्हता. सगळे फोटो शर्ट किंवा जर्किन आणि जीन्स घातलेले. एकूण अवतारवरनं ती हाय-फाय आणि अपर क्लास लेडी असल्याचं सरळ दिसून येत होतं.

थोड्या वेळानं तिचा मेसेज आला, ‘सर, कैसे लगे?’
‘कौन कैसे लगे?’
‘मैं.. आय मीन माय फोटोग्राफ्स’
‘सुन्दर..’
‘कौन, मैं?’
‘नहीं, तुम्हारे फोटोग्राफ्स सुंदर है’
‘क्या सर... एक ही मतलब हो गया ना..’
‘नहीं... फोटो धोखा दे सकते है.. जरुरी नहीं कि फोटो में सुंदर दिखने वाला हर चेहरा असल में भी सुंदर हो’
‘क्या सर...’
‘देखो टीना.... फोटो में तुम हंस रही हो... लेकिन जरुरी नहीं कि यह हंसी रिअल हो. इस हंसी के पीछे गम भी हो सकता है...’
‘ठीक पहचाना आपने सर’
‘और बोलो’
‘सर, आप का शेड्यूल क्या रहता है?’
‘आय एम माय ओन बॉस... इसलिए आय एम अल्वेज बिझी अँड अल्वेज फ्री’
‘आय सी... सर मैं मेरा शेड्यूल बताऊं?’
‘यस, बताओ!’
‘सर, मैं सुबह पांच बजे उठती हूं...’
‘अरे बाप रे... फिर?’
‘फिर ठंडे पानी से नहाती हूं’
‘क्या? सुबह पांच बजे, ठंडे पानी से? वह भी इन दिनों में?’
‘यस सर... आदत है’
‘मैं भी ठंडे पानी से नहाता हूं.... लेकिन सुबह आठ बजे.. आदत है’
‘ठंडे पानी से नहाना अच्छा रहता है सेहत के लिये’
‘जानता हूं! ठीक है.. आगे बोलो?’
‘फिर मैं खाना बनाती हूं.. बच्चों के लिये... और हजबंड के लिये भी’
‘तुम्हारे लिये नहीं बनाती हो?’
‘बनाती हूं ना’
‘फिर?’
‘फिर मैं बच्चों को उठाती हूं, नहलाती हूं, तैय्यार करती हूं और स्कूल भेजती हूं’
‘आगे?’
‘फिर मैं संजू को उठाती हूं..’
‘संजू तुम्हारा पति...’
‘यस.. लेकिन आपको कैसे मालूम?‘
‘मुझे शेरलॉक होम्स ने बताया अभी अभी’
‘समझ गयी’
‘आगे?’
‘फिर मैं स्कूल जाती हूं’
‘देन?’
‘ढाई बजे तक वहां पढाती हूं’
‘फिर?’
‘फिर मैं वापस घर लौटती  हूं... फ्रेश होती हूं और बच्चों के क्लासेस लेती हूं’
‘अरे टीना, एक बात बताना तुम भूल ही गयी..’
‘कौन सी सर’
‘तुम स्कूल टिफिन लेकर जाती हो और वहां स्टाफ रूम में बैठकर खाना खाती हो’
‘हां सर... समझ गयी सर, फिर से शेरलोक होम्स ने बताया आपको!’
‘आगे बोलो..’
‘आगे क्या... शाम तक क्लासेस, फिर जिम जाना, वापस घर आकर फ्रेश होना, फिर खाना बनाना, फिर कल की तैयारी..’
‘फिर?’
‘फिर बुक्स पढती हूं’
‘टी.व्ही. नहीं देखती?’
‘बिल्कुल नहीं सर’
‘गुड.. गुड... अच्छा, फिर तुम सोती कब हो?’
‘बारा-साडे बारा बजे’
‘अरे बाप रे... यानि कि तुम हर दिन जादा से जादा 5 घंटों की नींद लेती हो?’
‘दिन नहीं सर, रात को!’
‘एक बात बताओ टीना...’
‘पूछिये सर’
‘यह सब तुम whats app पर चॅटिंग करते-करते करती हो ना?’
‘क्या सर... आप भी मेरा मजाक उडा रहें हो!’
‘मजाक नहीं, सिरिअसली पूछ रहां हूं’
‘नहीं सर... मेरा कोई दोस्त नहीं है जिस से मैं चॅटिंग करूं... मैं दोस्त बनाती ही नहीं... और बाय चान्स किसी से दोस्ती हो भी गयी तो वह जादा दिन टिकती ही नहीं’
‘आय नो’
‘कैसे?’
‘क्यों कि तुम्हारा बर्थ नंबर 8 है’
‘हां... समझ गयी’
‘और’
‘और सर गुड नाईट... सुबह जल्दी उठना है’
‘गुड नाईट टीना... हॅव स्वीट ड्रीम्स’

दुसऱ्या दिवशी ती परत चॅट करू लागली. म्हणाली, ‘सर, बीस तारीख से मुझे दस दिनों के लिये छुट्टियां है’
‘अरे वा! फिर क्या प्रोग्राम है?’
‘सर मै और संजू टूर पे जाने वाले हैं’
‘कहां?’
‘मॉरिशस’
‘गुड.. बच्चों के साथ?’
‘हां...’
‘व्हेरी गुड.... वापस कब आओगी?’
‘एक जनवरी के दिन’
‘ठीक है... तुम वापस आने के बाद हम मिलेंगे... नए साल में’
‘सर आप मुझसे मिलना चाहते हो?’
‘हां... क्यों नहीं? तुम नहीं मिलना चाहती?’
‘हां सर’
‘हां मतलब मिलना नहीं चाहती?’
‘चाहती हूं सर...’
‘ओ.के.... तो मिलेंगे’

संध्याकाळी टीनाचा फोन आला. पहिल्यांदाच.
‘सर, टीना हिअर’
‘बोलो टीना’
‘कैसे हो आप?’
‘फाइन... अॅज युज्युअल’
‘सर, आप से एक बात पूछनी थी..’
‘पूछो ना’
‘क्या हम जल्दी मिल सकते हैं? मतलब जनवरी तो बहोत दूर है’
‘हां, क्यों नहीं? बोलो, कब मिलना है?’
‘आप बोलिये...’
‘मैं तो अभी के अभी मिल सकता हूं... आंऊ फोन के जरिये तुम्हारे पास? तुरंत?’
‘नहीं सर... यह कैसे हो सकता है?’
‘क्यों नहीं हो सकता? आंऊ?’
‘सर मजाक छोडिये प्लीज’
‘ओके बेबी... तुम बोलो कब मिलना है?’
‘शनिवार के दिन... मुझे छुट्टी है... इज इट पॉसिबल फॉर यू?’
‘यस मॅडम... लेकिन कितने बजे.... और कहां?’
‘दो बजे मिलेंगे... कहां वह मैं बाद में बताउंगी’
‘दो बजे.... यानि हमें खाना खाने जाना है...?’
‘हां सर...’
‘ठीक है.... शनिवार दोपहर दो बजे.... प्लेस तुम बाद में बताओगी... पक्का?’
‘पक्का’

पुढे चालू.....

हेही वाचा:

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०१४

2014, तुला सलाम... तू मला महान बनवलं आहेस !

-महावीर सांगलीकर


2002 च्या एप्रिल पासून 2012पर्यंत मी एक अतिशय निगेटिव्ह माणूस होतो. माझ्या आयुष्यातली तब्बल दहा वर्षे मी मूर्खांच्या नादी लागून वाया घालवली होती. नको त्या लोकांच्या आणि संघटनांच्या नादी लागलो होतो. मी माझी सगळी क्रिएटीव्हिटी चुकीच्या गोष्टींसाठी आणि चुकीच्या लोकांसाठी  वापरत होतो.

2013 मध्ये हळूहळू मी स्वत:ला यातून बाहेर काढायचे ठरवले. तोपर्यंत मी जे लिहीत होतो, अगदी त्याच्या उलटे विचार माझ्या लिखाणात येऊ लागले. आधी मी ज्यांच्या नादी लागलो होतो ते लोक मला आता प्रतिगामी समजू लागले. मी त्या सगळ्यांना पुरून उरलो. मी माझ्या फेसबुक अकाउंटवरनं अक्षरश: हजारो विद्रोही, आंबेडकरवादी, ब्रिगेडी, हिंदुत्ववादी, हिंदूधर्म विरोधी, अनिसवाले, व्यक्तिपूजक यांना चक्क हाकलून लावले. त्यांच्यापैकी ज्यांचे फोन नंबर्स माझ्या फोनबुकमध्ये होते, तेदेखील मी डिलीट करून टाकले. त्यातले जे लोक मला प्रत्यक्ष भेटायचे त्यांना मी माझे दरवाजे बंद करून टाकले. घरातली विद्रोही, तथाकथित पुरोगामी पुस्तक रद्दीत घातली.

पुढे 1 जानेवारी 2014 हा दिवस उजाडला. त्यादिवशी मला विनोद तेजवानी हा माझा जुना मित्र भेटला. त्यानं ‘सध्या काय करतोस?’ असं विचारलं. खरं म्हणजे अभिमानानं सांगता येईल अस मी कांहीच करत नव्हतो. मी थाप मारली, ‘मी न्यूमरॉलॉजीची प्रॅक्टिस करतोय’. हे ऐकून त्याला खूप आनंद झाला. त्यानं लगेच त्याची आणि त्याच्या मुलाची जन्मतारीख मला दिली आणि रिपोर्ट बनवायला सांगितला. अशा रीतीनं माझी न्यूमरॉलॉजीची प्रॅक्टिस या वर्षाच्या पहिल्या दिवशी योगायोगाने सुरू झाली.

न्यूमरॉलॉजीचा माझा सखोल अभ्यास होताच. पण माझ्यावर वर उल्लेख केलेल्या लोकांचा प्रभाव असल्यानं आत्तापर्यंत मी त्याची प्रॅक्टिस करण्याचे नेहमीच टाळलं होतं. पण आता मी त्या प्रभावातून मुक्त झालो होतो, त्यामुळे न्यूमरॉलॉजीकडं पूर्ण लक्ष द्यायचं ठरवलं.

माझं विद्रोही प्रकारचे लिखाण बंद झालेच होते, पण मी आता विद्रोही लोकांच्या विरोधात लिहायचा उद्योग देखील बंद करायचे ठरवलं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हीच सगळ्यात चांगली होती. मग मी माझं लक्ष न्यूमरॉलॉजी बरोबरच क्रिएटीव्ह लिखाणाकडेही द्यायचं ठरवलं. माझ्यामध्ये कथालेखनाचे अंग फार पूर्वीपासूनच होतं, कोणे एके काळी मी इंग्रजी कथाही लिहिल्या होत्या. 2014मध्ये मी मराठी कथा लिहायला सुरवात केली. त्या फुकट्या प्रकाशकांना देण्याऐवजी वाचकांना फुकट देण्यासाठी महाकथा हा ब्लॉग सुरू केला.

अगदी थोड्याच काळात माझ्या कथा अतिशय लोकप्रिय होऊ लागल्या. त्याचं कारण म्हणजे मी वाचकांना वेगळ्या विश्वात नेऊ लागलो. वाचकांना खिळवून ठेवणारी मांडणी, त्या कथांमध्ये पात्रांचे असणारे हाय टॅलेंट, मानवी बुद्धिमत्तेची कमाल, पात्रांना असणारी जबाबदारीची जाणीव, कथांमध्ये अचानक येणारी वळणे, वाचकांचे चुकणारे अंदाज, अगदी व्हिलनलादेखील दिलेला रिस्पेक्ट, आगळे-वेगळे तत्वज्ञान, रहस्य, अनोखे संघर्ष, स्त्रीशक्तीची चुणूक, इतिहासापासून धर्म-विज्ञानापर्यंत हाताळले गेलेले वेगवेगळे विषय, गूढ विषयांचा परिचय, टिपिकल विनोदांच्या पलीकडले विनोद, सहज ओघवती भाषा, मराठी-हिंदी-इंग्रजी या भाषांचा मुक्त वापर  या सगळ्या गोष्टी वाचकांना भुरळ पाडू लागल्या. वाचकांमधून मला अनेक नवीन आणि पॉझीटीव्ह मित्र मैत्रिणी मिळाल्या.

.... आणि या वर्षीच्या जून महिन्यात अचानक एक मुलगी माझ्या जीवनात आली. माझी एक कथा तिनं फेसबुकवर लाईक केली, मग ती माझी फेसबुक फ्रेंड झाली. त्यानंतर केवळ आश्चर्यकारक घटना घडल्या. या सगळ्या घटना मी माझ्या ‘शिवानी द ग्रेट’ या कथेमध्ये मांडल्या आहेत. या घटनांमधून मला मी एक महान मोटीव्हेटर आहे याची जाणीव झाली. याचं कन्फर्मेशन मला 28 ऑक्टोबरच्या पहाटे मिळालं. मी कोण आहे, कशासाठी आहे याची मला अचानक जाणीव झाली. त्यादिवशी ज्ञानपंचमी होती.

मग भराभर माझ्यामध्ये बदल होऊ लागले. माझ्या अंगातील सुप्त शक्ती जागृत होऊ लागल्या. 15 नोव्हेंबर रोजी मी यशस्वीरीत्या टेलेपॅथिक मेसेज पाठवला आणि त्याचे उत्तरही मिळवले. ( शिवानी गायब आणि माझा टेलेपथीचा प्रयोग ). 22 डिसेंबरला ‘हिलिंग टच’ आणि ‘विश ट्रान्सफर’चा यशस्वी आणि एकत्रित प्रयोग केला.

हे सगळं स्वप्न तर नाही ना? असं कधी-कधी वाटतं. पण हे स्वप्न नाही.

2014, तुला सलाम... मी कोण आहे याची तू मला जाणीव करून दिली आहे. तू माझ्या सुप्त शक्त्या जागृत केल्या आहेत.  तू मला नवी दुनिया, नवे मित्र दिले आहेत.. तू मला नवा जन्म दिला आहे. तू मला महान बनवलं आहेस.

धन्यवाद.... धन्यवाद....


हेही वाचा:

रविवार, २७ जुलै, २०१४

पुणेरी शोले: शॉट नंबर ४: वासंती रिक्षावाली

 -महावीर सांगलीकर


जयसिंग आणि वीरसिंग हे दोघं गब्बरपंताचा अड्डा असलेल्या शनिवारवाड्याला भेट देण्यासाठी पिंपरी-चिंचवड वरून बसनं मनपाला येतात. तिथंनं शनिवारवाड्याला कसं जायचं याचा विचार करत असतानाच एक रिक्षावाली त्यांना हाक मारते….

रिक्षावाली: अहो  साहेब, कुठं जायचं आहे? डेक्कन, टिळक रोड, कोथरूड....
जयसिंग: आमाला शनिवारवाड्यावर जायचं हाय.
रिक्षावाली: बसा… बसा
वीरसिंग:  (डोळे मिचकावत) किती घेणार?
रिक्षावाली: अहो साहेब, मी रिक्षावाली आहे
वीरसिंग: तसं नाय, रिक्षाचं भाडं किती घेणार आसं इचारलं
रिक्षावाली:  मग तसं बोला ना… काय होईल ते मीटर प्रमाणे घेईन
जयसिंग: (वीरसिंगला): ए चल बस लवकर
(जयसिंग आणि वीरसिंग रिक्षात बसतात. रिक्षावाली पण रिक्षात बसते आणि रिक्षा स्टार्ट करते आणि पुणे स्टेशनच्या दिशेने नेते)
रिक्षावाली: माझं नाव वासंती आहे
वीरसिंग: पुण्यात असली जुनाट नाव अजून असत्यात?
वासंती: अहो काय सांगायचं, माझं नाव ठेवलं त्यावेळी मी खूप लहान होते, बोलता येत नव्हतं नाहीतर मी या नावाला त्याचवेळी विरोध केला असता.
वीर सिंग: आताही नाव आडनावासकट बदलत येतंय की
वासंती: ते कसं काय?
वीरसिंग: लग्न केलं की नवरा नाव-आडनाव दोन्ही  बदलून टाकतो
वासंती:  (लाजत) आता माझ्याशी कोण लग्न करणार? माझ्या रंगामुळं  मला कोणी पसंतच करत नाही.
वीरसिंग: पण तुझा रंग असा कसा झाला?
वासंती: अहो काय सांगायचं … माझं आडनाव गोरे आहे, पण झालं उलटंच. माझ्या आईचं माहेरचं आडनाव काळे आहे. आई काळे-गोरे अशी दोन्ही आडनावे लावते, पण मी  आईच्या माहेरच्या आडनावावर  गेले. 
वीरसिंग: गोरेपण की क्रीम लावून बघायची की मग….
वासंती: बघितली, कांही  उपयोग नाही झाला. ....... तुमचा मित्र कांहीच बोलत नाही, ते का बरें …?
जयसिंग: तू अशी नाकात का बोलतीस? बामन हायेस का काय?
वासंती: बामन नाही ब्राह्मण आहे मी … ती पण चांगली कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण…. पण रंगामुळे सगळे मला देशस्थ समजतात.
जयसिंग:  तरीच.... आमच्याकडं सर्दी झाली तरच असं नाकात बोलत्यात
(तेवढ्यात जयसिंगला रस्त्यावर खड्डा दिसतो)
जयसिंग: (ओरडत): खड्डा …… खड्डा
वासंती: घाबरू नका साहेब… पुण्यातला खड्डा अन खड्डा मला माहीत आहे
(रिक्षा पुणे स्टेशन जवळ आली आहे. वासंती रिक्षा स्वारगेटच्या रस्त्यानं न्यायला लागते. )
वासंती: साहेब, माझं नाव-आडनाव दोन्ही सांगितलं, पण अजून तुम्ही तुमची नावं नाही सांगितलीत
जयसिंग: विचारल्याशिवाय कसं सांगणार?
वासंती: बरं विचारते. तुमची नावं काय हो?
जयसिंग: माझं नाव जयसिंग आणि याचं वीरसिंग
वासंती: तुम्ही राजपूत दिसताय?
वीरसिंग: नाय नाय. आम्ही मर्द मराठे आहोत.
वासंती: आणि आडनावं काय?
वीरसिंग: मी चव्हाण आणि हा पवार
वासंती: मग तुमचं पटतं कसं काय? हे हे हे ……….
(रिक्षा स्वारगेट वरून सारस बागेकडे येते)
वासंती: साहेब इथं गणपती आहे, बाग पण आहे, जायचं का दर्शनाला?
वीरसिंग: (जयसिंगकडे  बघत) जायचं का?
जयसिंग: नको, आधी लगीन शनिवारवाड्याचं
(एवढ्यात रिक्षा बंद पडते. वासंती ती पुन्हा सुरु करायचा प्रयत्न करते, पण ती सुरू होत नाही )
वासंती: अहो आता रिक्षा ढकलायला लागेल.
(वीरसिंग एकटाच  रिक्षातून उतरतो आणि एका  हाताच्या पंजाने रिक्षा हलकेच ढकलतो. रिक्षा लगेच सुरू होते. वीरसिंग रिक्षात बसतो )
वासंती: कमाल आहे, तुमच्या हातात खूप ताकत दिसते…
वीरसिंग: ये हात नही हमारी पार्टी का पंजा है …… हाहाहाहा
वासंती: पण रिक्षा बंद पडली नव्हतीच मुळी. मी तसे नाटक केले, तुम्हाला कामाला लावायला
वीरसिंग: असं काय? थांब, तुझ्याकडं मागनं बघतो……
वासंती: मग आता काय पुढनं बघत आहात काय?
जयसिंग: मागनं बघतो म्हणजे नंतर बघतो असं त्याला म्हणायचं हाय
(शेवटी एकदाची रिक्षा शनिवारवाड्याजवळ येते. वीरसिंग आणि जयसिंग रिक्षातून उतरतात)
वीरसिंग: किती झाले?
वासंती: (मीटर मधील आकडा बघून आणि हिशेब करून) साहेब, फक्त 209 रुपये झाले
(वीरसिंग तिला  100च्या दोन नोटा आणि 10ची एक नोट देतो. वासंती त्याला दहाची नोट परत द्यायला लागते)
वीरसिंग: दहा रुपये सूट  का? 
वासंती: नाही. वरचे नऊ रुपये सुट्टे द्या.
वीरसिंग: (दहाची नोट नाकारत ) असू दे  एक रुपया तुझ्याकडंच
वासंती: नको. मी मीटर पेक्षा एक पैसाही जास्त घेत नाही.
जयसिंग: आमाला काय खुळं समजतीस व्हय? या पुलाच्या पलीकडं आमी तुझ्या रिक्षात बसलो आणि तू फिरवून फिरवून आमाला इथं आणलंस. दहा रुपये पण भाडं होत नाही
(वासंतीचा चेहरा उतरतो)
जयसिंग: या वीरसिंगला एखादी पोरगी रिक्षातनं  फिरवायची होती म्हणून आमीच तुला येडं बनवलं. त्याला तू लई आवडलीस.
वासंती: (लाजत, वीरसिंगला) मग घरी पोहे खायला कधी येणार?
वीरसिंग: घरी कशाला? इथंच कुठं तरी हॉटेलात खाऊया की पोहे
वासंती: नाही हो, इथले हॉटेलवाले एका प्लेट मध्ये दोघांना खाऊ देत नाहीत. हेहेहेहे……. तुम्हाला कसं कळत नाही हो? घरी पोहे खायला या म्हणजे माझ्या मावशीला भेटायला या.
वीरसिंग: पण तुझ्या मावशीला कशाला भेटायचं?
(वासंती कपाळाला हात लावते )

हेही वाचा:
पुणेरी शोले शॉट नंबर १६
हिटलरची गुप्त भारतभेट 
ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह

बुधवार, २३ जुलै, २०१४

ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह

-महावीर सांगलीकर



ठाकूर दशरथप्रसाद हे युपी मधलं एक बडं प्रस्थ होतं. ते एक मोठे जमीनदार होते. राजकारणातही त्यांचं मोठं वजन होतं.

त्यांच्या तरुणपणी त्यांचं लग्न झालं. पण त्यांना मूळ-बाळ कांही होईना. मग त्यांनी दुसरं लग्न केलं. दुस-या बायको पासूनही त्यांना मूळ-बाळ होईना. मग त्यांनी तिसरं लग्न केलं. तिलाही मूळ-बाळ होईना.  

मग ठाकूर दशरथप्रसाद आपल्या तिन्ही बायकांना घेऊन या विषयातील एका जाणकार उर्फ तज्ञ डॉक्टरांना भेटले. डॉक्टरांनी त्या सगळ्यांची तपासणी केली. त्यांना कुणातच कांही दोष आढळला नाही, त्यामुळे त्यांनी या चौघांना निर्दोष जाहीर केलं. ठाकूरसाहेबांना सांगितलं, प्रयत्न करत रहा, कधी ना कधी फळ मिळेलच.

आणखी दोन वर्षे झाली, पण ठाकूर साहेबांना कांही मुलबाळ होईना.

मग ठाकूर दशरथप्रसाद यांनी आपला खानदानी जालीम उपाय अमलात आणण्याचं ठरवलं. ते आपल्या तीनही बायकांना, म्हणजे कुसुम, सुमन आणि कलावती यांना घेऊन वैष्णोदेवीला गेले. ठाकूर साहेबांनी देवीला नवस केला, ‘मला मुले होऊ देत, मी त्या सगळ्यांच्या नावापुढे ‘प्रसाद’ हा शब्द लावेन’ मग त्यांनी आणि त्यांच्या तिन्ही बायकांनी देवीचा प्रसाद खाल्ला, आणि गावी परत आले.

चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल की ठाकूर दशरथ यांच्या नावापुढे प्रसाद हा शब्द का आहे ते. चाणाक्ष नसलेल्या वाचकांसाठी: कारण दशरथप्रसाद यांच्या वडिलांनाही मूळ-बाळ होत नव्हते, म्हणून ते वैष्णोदेवीला गेले होते आणि तेथे नवस करून देवीचा प्रसाद खाल्ला होता वगैरे वगैरे... असो.

वैष्णोदेवीला जाऊन आल्यावर वर्षाभरातच ठाकूर दशरथप्रसाद यांना त्यांच्या तीन बायकांपासून चार मुले झाली. कांही वाचकांना असा प्रश्न पडेल की असे कसे काय? तर सर्वात धाकट्या बायकोला म्हणजे कलावतीला जुळे झाले. हे सयामी जुळे होतं, एकेमेकांना चिकटलेले होतं. डॉक्टरांनी मोठे प्रयत्न करून, जोर लावून त्या दोघांना वेगवेगळे केलं.

देवीला केलेल्या नवसानुसार, घराण्याच्या ‘प्राण जाये पर वचन न जाये’ या उक्तीला जागत ठाकूर दशरथप्रसाद यांनी आपल्या मुलांची नावे रामप्रसाद, लखनप्रसाद, भरतप्रसाद आणि शत्रुघ्नप्रसाद अशी ठेवली. ही सगळी मुले हळू हळू मोठी झाली, शाळेला जाऊ लागली. पुढे कॉलेजलाही जाऊ लागली. सगळे जण ग्रॅज्यूएट झाले.

हे चारी भाऊ स्वभावाने फार वेगवेगळे होते. रामप्रसाद हा फार शांत स्वभावाचा, कमी बोलणारा, एकवचनी होता. तो इतका सज्जन होता की लोक त्याला देवच समजत. याउलट लखनप्रसाद हा जरा तापट, अविचारी होता. पण तो नेहमी रामप्रसादच्या आज्ञेत रहायचा. भरतप्रसादचा नेमका स्वभाव काय आहे हे कोणालाच कळत नसे. तो थोडा रिझर्वड मनाचाव वाटे. पण त्याचे रामप्रसादवर खूप प्रेम होते. सगळ्यात धाकटा शत्रुघ्नप्रसाद भारदस्त आणि जरबी आवाजाचा होता, त्याने नुसते ‘खामोश.....’ असे म्हंटले की लोक आणि म्हशी देखील चिडीचूप होत असत. केवळ तेवढ्या भांडवलावर, अभिनय करता येत नसतानाही पुढे त्याला बॉलीवूडमध्ये व्हिलनचे काम मिळाले. त्याच भांडवलावर भांडवलदारांच्या एका पक्षाने त्याला आपल्या पक्षात घेतले आणि खासदारही केले. विशेष म्हणजे त्याच्याही पुढच्या काळात त्याच्या मुलीलाही हिंदी सिनेमात हिरोईनचे काम मिळाले. आकाराने ती हुबेहूब शत्रुघ्नप्रसादसारखी सारखी दिसत असे. पण नंतर तिने डायेटिंग करून आपलं आकार कमी करून घेतला. असो. तिच्याबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन.

 
पुढे रामप्रसाद एमबीए करण्यासाठी दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये दाखल झाला. तिथ पहिल्या वर्षाच्या दुस-याच दिवशी त्याची सीता जनकसिंह नावाच्या बिहारी मुलीशी ओळख झाली. तिची स्टोरी वेगळीच होती. तिचे वडील जनकसिंह हे एक मोठे शेतकरी आणि शेतक-यांचे नेते होते, शिवाय ते कुर्मी समाजाचे होते. त्यामुळे बिहारच्या राजकारणात त्यांचे खूप वजन होते. एकदा ते शेतात गेले असताना तेथे त्यांना एक मोठी लाकडी पेटी दिसली. त्यांनी ती पेटी उघडून बघितली तर तिच्यात एक लहान बाळ होते. ती म्हणजेच सीता. म्हणजेच ती सीता जनक सिंहाची खरी उर्फ जिनेटिक उर्फ बायालॉजीकल मुलगी नव्हती किंवा मानलेली मुलगीही नव्हती, तर सापडलेली मुलगी होती. सीता शेतक-याची मुलगी असूनही गोरीपान आणि खूप सुंदर होती याचे कारण आता (पुन्हा चाणाक्ष वाचकांच्या) लक्षात आलेच असेल. असो, पण त्याने काय फरक पडतो? शेवटी मुलगी ती मुलगी. जनक सिंहानी तिला आपली एकुलती एक मुलगी म्हणून वाढवलं.

नंतर रामप्रसाद आणि सीता या दोघांची चांगलीच गट्टी जमली. पुढे दोघेही एमबीए झाले. तोपर्यंत सीतेच्या वडिलांनी तिच्यासाठी चांगलीचांगली स्थळे पाहून ठेवली होती, पण तिने रामप्रसादच्याच गळ्यात माळ घालायचे ठरवले होते. तिनं तिच्या वडिलांना तसं सांगितलं, तर रामप्रसादनं त्याच्या वडिलांना. 

ठाकूर दशरथप्रसाद आणि जनकसिंह कुर्मी यांचीही या लग्नाला फुल्ल परवानगी होती. रामप्रसाद आणि सीता यांचे वाजत-गाजत लग्न झाले. त्याच हॉलमध्ये लखनप्रसादचेही लग्न उरकून घेण्यात आले. त्यानं उर्मिला नावाची एक मुलगी पसंत केली होती.

पण या दोन्ही लग्नांना भरतप्रसादच्या आईचा, म्हणजे कलावतीचा कडक विरोध होता. तिची इच्छा त्या दोघांनी तिच्या माहेरच्या नात्यातल्या मुलींशी लग्ने करावीत अशी होती.

पुढे कलावती सीता आणि उर्मिला यांचा सारखा छळ करू लागली. रामप्रसाद आणि लखनप्रसाद यांना आपआपल्या बायकांना घेऊन घरातनं निघून जाण्यासाठी त्यांच्यावर प्रेशर आणू लागली, त्यामुळे ठाकूर दशरथप्रसाद यांचे ब्लड प्रेशर वाढले. नंतर त्यांना हार्ट अॅटॅक आला आणि त्यात ते वारले.

रामप्रसादने सीतेला घेऊन कायमचे घराबाहेर पडायचे ठरवले. लखनप्रसादही त्या घरात वैतागला होता, म्हणून त्यानेही रामप्रसादबरोबर जायचे ठरवले होते. पण उर्मिलेचे सीतेशी पटत नसल्याने (कारण त्या दोघी जावा-जावा होत्या) तिने मात्र घर सोडायला नकार दिला.

ते तिघे घर सोडून चालले तेंव्हा भरतप्रसाद म्हणाला, ‘दादा, तुला जायचे असले तर जा, पण तुझे शूज तेवढे मला देवून जा, आठवण म्हणून’

रामप्रसादाने लगेच त्याला आपले नवे कोरे इम्पोर्टेड शूज उदार मनाने देऊन टाकले आणि दुसरे जुने कानपुरी शूज घालून तो बाहेर पडला. त्याच्या मागोमाग लखनप्रसाद आणि सीता हेही बाहेर पडले.

रामप्रसाद, लखनप्रसाद आणि सीता सरळ पुण्याला आले. आधी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिले. मग जॉब शोधू लागले आणि रहाण्यासाठी फ्लॅटही शोधायला लागले. हे लोक परप्रांतीय असल्याने आणि त्यावेळी पुण्यात परप्रांतीयांच्या विरोधात चळवळ चालू असल्याने त्यांना फ्लॅट मिळायला खूप अडचणी आल्या. लोक परप्रांतीयांना, विशेषत: यूपी-बिहारवाल्यांना भाड्याने घर देत नसत. तसेच हे तिघे शाकाहारी असल्याने मांसाहारी लोकही त्यांना आपल्या सोसायटीत घर देत नसत.  मग त्यांनी महात्मा गांधींच्या मार्गाने  जायचे ठरवले. त्यासाठी ते पुणे कॅम्पात गेले आणि महात्मा गांधी रोडवरून फिरू लागले. तिथे त्यांना ‘सोराबजी अॅन्ड दोराबजी इस्टेट एजन्सी’ अशी एक पाटी दिसली. तिथं चौकशी केल्यावर त्यांना लगेच एका पॉश एरियात तीन बेडरूमचा एक चांगला फ्लॅट कमी भाड्यात मिळाला. (इथे पुन्हा चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल की ते तिघेजण होते म्हणून त्यांनी तीन बेडरूमचा फ्लॅट घेतला.) 

लवकरच तिघांनाही चांगले जॉब देखील मिळाले. रामप्रसादाला एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून, लखनप्रसादला असिस्टंट मॅनेजर म्हणून आणि सीतेला एका इंग्रजी दैनिकात प्रोडक्शन मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली.

एकदा ते दोघे भाऊ एका बस स्टॉपवर बसची वाट बघत उभे असताना एक सुंदर तरुणी तेथे आली. बस स्टॉपवर दुसरे कोणीच नव्हते. रामप्रसाद तिचे निरीक्षण करू लागला. ती रंगाने काळीसावळी आणि खूप सुंदर होती. तिने तिच्या केसांना सरसोच्या तेलाऐवजी खोबरेल तेल लावलेलं होते, त्यामुळे सहन न होणारा विचित्र असा वास येत होता. तिची नखे खूपच लांबडी होती आणि ती नेल कलरने रंगवली होती. दहा बोटांना दहा वेगवेगळे रंग लावलेले होते. 

‘हॅलो, आय एम शार्प नक्खानी’ ती त्याला म्हणाली.
‘हे असले कसले विचित्र नाव?’ रामप्रसादने नवलाने विचारले.
‘अॅक्चुअली माझं नाव शूर्प नखा आहे, पण एका न्यूमरॉलॉजिस्टनं मला सांगितलं की नावात बदल कर म्हणजे तुझं  लवकर लग्न होईल. तिनं मला शार्प नक्खानी हे नाव सुचवलं. या नावामुळे माझी बुद्धीही माझ्या नखांसारखीच शार्प होईल असं पण  म्हणाली. एवढं सांगण्यासाठी तिनं माझ्याकडनं चक्क दहा हजार रुपये घेतले’
‘एवढ्या सल्ल्यासाठी एवढी फी? आर यू टॉकिंग अबाउट श्वेता?’
‘यस, श्वेता सहानी’
‘त्यापेक्षा तू महावीर सांगलीकरांच्याकडे जायला पाहिजे होतस. रास्त फीत तुला चांगला सल्ला मिळाला असता. शिवाय सावळ्या मुलींना भरपूर कन्शेशन देतात ते फीमध्ये’
‘गेले होते, पण ते फार बिझी असतात. त्यांच्या ऑफिस समोर सावळ्या मुलींची रांगच लागलेली असते. त्यांची अपॉइंटमेंट मिळत नाही लवकर. मला तर फार घाई आहे, म्हणून तर मी श्वेता सहानीकडे गेले’

मग ती राम प्रसादला म्हणाली,
‘आर यू मॅरीड?’
‘याह,’ राम प्रसाद म्हणाला, ‘बट माय ब्रदर इज जस्ट सेपरेटेड’ त्याने लखनप्रसादकडे बोट दाखवले. शार्प नक्खानी लगेच लखनप्रसादजवळ गेली आणि आपल्या नखाने त्याच्या दंडावर पोक करत म्हणजे टोचत म्हणाली, ‘वुड यू लाईक टू मॅरी वुईथ मी?’

या प्रश्नाचा नाही, पण नखाने टोचण्याचा लखनप्रसादला राग आला. त्याला नखे वाढलेले लोक, विशेषत: स्त्रिया अजिबात आवडत नसत आणि तो स्वत:चीही नखे सारखी म्हणजे दिवसातून तीन-चार वेळा तरी कट करत असे. त्यामुळे त्याच्याकडे नेहमी नेल कटर असे. त्याने रागाच्या भरात शार्प नक्खानीची नखे आपल्या जवळच्या नेल कटरने कट करून टाकली. ती जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, ‘केवढ्या कष्टाने मी माझी नखे वाढवली होती.... गिनीज बुकमध्ये माझे नाव येण्यासाठी. यू फूल, थांब आता मी माझ्या दादालाच तुझं आणि तुझ्या दादाचं नाव जाऊन सांगते.... मे आय नो युअर नेम्स प्लीज?’
‘सांग सांग... मी नाही घाबरत. घे लिहून ... आय एम लखनप्रसाद अॅन्ड माय दादा इज रामप्रसाद’

आपल्या छोट्या पर्समधनं तिनं एक मोठी डायरी काढली आणि रडत रडतच तिने त्या दोघांची नावे लिहून घेतली. मग रडत-ओरडतच निघून गेली.

त्यावेळी इंडिया–पाकिस्तानची कबड्डीची मॅच चालू असल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता, त्यामुळे भर रस्त्यात बस स्टॉपवर ही घटना घडूनही कोणाच्या लक्षात आली नाही.


+++

त्या तिघांना शनिवारी-रविवारी सुट्टी असे. एके रविवारी सकाळी एक फेरीवाला त्यांच्या बिल्डींग जवळून ‘पैठणी घ्या पैठणी, पैठणी लेव पैठणी’ असा मराठी-हिंदीत ओरडत गेला. सीतेला पैठणी हा प्रकार फार आवडत असे, दिसली पैठणी की घे विकत असा प्रकार ती करत असे. तिने रामप्रसादला त्या फेरीवाल्याला घेऊन यायला सांगितले. रामप्रसाद लगेच बाहेर निघाला, तेंव्हा लखन प्रसाद म्हणाला, ‘दादा नको जाऊस, या फेरीवाल्यांच्या पैठण्या डुप्लिकेट असतात’ पण भावाचे ऐकायचे का बायकोचे असा प्रश्न येतो तेंव्हा नवरे बायकोचेच ऐकायचे असते. त्या प्रथेनुसार रामप्रसाद फेरीवाल्याला आणायला गेला.

थोड्या वेळाने सीता लखनप्रसादला म्हणाली, ‘भाऊजी, तुम्ही मार्केटमध्ये जाऊन थोडी कोथिंबीर आणि खोबरे घेऊन या’

आज खमंग पोहे खायला मिळणार या आनंदात लखनप्रसाद भाजी मार्केटकडे चालला. जाताना म्हणाला, ‘वहिनी, डोअरबेल वाजली तरी आयबॉलमधनं बघून बाहेर कोण आलंय याची खात्री करून घ्या, मगच दार उघडा. महाराष्ट्र म्हणजे कांही तुमचा बिहार नाही. त्यात हे पुणं आहे. इथं कधी कोण घरात घुसेल ते सांगता येत नाही. इथला क्राईम रेटही जास्त आहे. दिवसाढवळ्या मोठमोठ्या लोकांना भर रस्त्यात गोळ्या घालून मारतात इथले लोक’

ते ऐकून सीता हसत म्हणाली, ‘मी यूपीवाल्यांना घाबरत नाही तर पुण्याच्या लोकांना कशाला घाबरेल? एक बिहारी सब पे भारी...’

‘माहिती आहे,’ लखनप्रसाद तोंड वेंगाडत म्हणाला, ‘चाळीस किलो पण वजन नाही, आणि म्हणे सब पे भारी. बी सिरिअस, सावध रहा जरा’

लखनप्रसाद दाराबाहेर गेला आणि त्याने जोराने दार ओढून ते बंद केले.

लखनप्रसाद गेल्यावर थोड्या वेळाने टिंग- टॉन्ग..टिंग-टॉन्ग अशी डोअर बेल वाजली. सीतेला वाटले की रामप्रसाद फेरीवाल्याला घेऊन आला. म्हणून तिने आयबॉलमध्ये न बघताच घाईघाईत दार उघडले. बाहेर एक उग्र दिसणारा साधू उभा होता. ‘भिक्षा दे माय’ तो त्याच्या करड्या आवाजात म्हणाला. सीता घाबरून आत पळू लागली, पण त्या साधूने तिचा हात धरून तिला ओढले आणि उचलून आपल्या खांद्यावर ठेवले. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडून शब्दही फुटेना. तो साधू तिला घेऊन बिल्डींगच्या बाहेर आला. तिथं नो पार्किंग एरियात त्याची कार उभी होती. त्याने सीतेला कारमध्ये कोंबले. बिल्डींगच्या वॉचमनला कांहीतरी गडबड ऐकू आली आणि तो दिवसाढवळ्या झोपेतून खाडकन जागा झाला. तो कारकडे धावला आणि त्याने त्या साधूला कारमधून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, पण त्या साधूने वॉचमनला एका ठोशातच लोळवले. मग तो साधू कार घेवून भरधाव वेगाने निघून गेला.

थोड्या वेळाने रामप्रसाद परत आला, त्याने आपल्या फ्लॅटची बेल वाजवली. पण दार उघडले गेले नाही. एवढ्यात लखनप्रसाद पण आला. दादाच्या बेलला सीता दार उघडत नाही, मग निदान आपण बेल वाजवली तर सीता दार उघडेल या आशेने लखनप्रसादनेही बेल वाजवून बघितली. पण आतून कांहीच उत्तर नाही. त्यामुळे त्या दोघांनी दार तोडायचे ठरले, तेवढ्यात बिल्डींगचा वॉचमन आला. त्याने एका साधूने सीतेला कारमधून पळवले आणि ती कार विमानतळाच्या दिशेने गेली असे सांगितले.

‘तू त्या साधूला आत का सोडलेस?’ रामप्रसादाने वॉचमनला जाब विचारला.
‘माझी नजर चुकवून तो आत शिरला’, वॉचमन आपली नजर झुकवत म्हणाला, ‘मला त्यावेळी जरा डुलकी लागली होती’ 

रामप्रसादाने त्याला त्या साधूचे वर्णन करायला सांगितले. वॉचमन म्हणाला, ‘तो आसाराम बापूसारखा दिसत होता, पण त्याची दाढी काळी होती आणि डोळे रामदेव बाबासारखे होते’

हे ऐकल्यावर लगेच ते दोघे भाऊ एका मोटर सायकलवरून वेगाने विमानतळाच्या दिशेने गेले. ते तिथे पोहोचले तेंव्हा एका छोट्या प्रायव्हेट विमानात बसून एक साधू आणि एक महिला हैद्राबादला गेल्याची माहीती त्यांना मिळाली. मग त्यांनीही हैदराबादला जायचे ठरवले. तिकीट वगैरे काढण्यात बराच वेळ गेला.

दोघे भाऊ हैदराबादला पोहोचले. तेथे त्यांनी आधी एक पोलीस स्टेशन गाठले. तिथल्या वरिष्ठ अधिका-यास सगळा प्रकार सांगितला. सगळं  ऐकून घेतल्यावर तो अधिकारी म्हणाला, ‘अहो काय सांगायचे तुम्हाला... आमच्याकडे माणसंच नाहीत तपास करायला. आमची निम्मी माणसं नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यात गुंतली आहेत आणि निम्मी राजकारण्यांच्या संरक्षणात. मलाही रोज पार्ट्यांना जायचं असल्याने वेळ मिळत नाही. तुम्ही असं करा, माझा एक डिटेक्टिव्ह मित्र आहे, त्याला भेटा.. तो शोधून काढेल तुमच्या बायकोला’

मग त्या अधिका-याने टेबलच्या ड्रॉवरमधून एक व्हिजिटिंग कार्ड काढलं आणि रामप्रसादला दिलं. रामप्रसादाने ते कार्ड बघितले. त्यावर लिहिले होते,

व्ही. हणमंत राव
इंटरनॅशनल प्राइव्हेट डिटेक्टिव्ह
स्पेशालिस्ट इन किडनॅपिंग केसेस
चार मिनार, हैद्राबाद  
फोन: G0G H0H WXYZ

चाणाक्ष रामप्रसादने ओळखलं की हा डिटेक्टिव्ह सुपर जिनिअस दिसतोय. म्हणूनच त्याने आपला फोन नंबर असा सांकेतिक भाषेत दिला आहे, जेणेकरून तो केवळ सेन्स ऑफ सिक्रेसी असणा-या आणि हुशार लोकांनाच कळावा. रामप्रसादने लगेच त्या नंबरला फोन करून हनुमंत राव ऑफिसमध्ये असल्याची खात्री करून घेतली आणि ते दोघे भाऊ लगेच पोलीस स्टेशनाच्या बाहेर आले आणि रिक्षा करून हणमंत रावाच्या ऑफिसकडे  निघाले.



-पुढे चालू

या कथेचे पुढचे भाग:
डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव 
मिशन असोका गार्डन  
कोलंबो टू चेन्नई

सोमवार, २१ जुलै, २०१४

सुदीपच्या लग्नाचा प्लॅन

-महावीर सांगलीकर


सुदीपचे आईवडील त्यानं लग्न करावं म्हणून त्याच्या मागे लागले होते, पण तो लग्नाला अजिबात तयार होत नव्हता. ‘मी कधीच लग्न करणार नाही’ असं तो नेहमी म्हणत असे. कारण काय तर त्याच्या आई-बापाची सतत होणारी विनाकारण भांडणे त्यानं लहानपणापासून बघितली होती. पुढं त्याच्या मोठ्या भावाचं लग्न झाल्यावर कांही दिवसांनीच त्या भावाची आणि त्याच्या बायकोची छोट्या कारणावरून मोठी भांडणे झाली. भावाची बायको माहेरी निघून गेली ती परत आलीच नाही. असले प्रकार शेजारी-पाजारीही बरेच घडले होते. सुदीपचे अनेक विवाहित मित्रही त्याला आपापली बायको कशी भांडखोर आहे हे सतत सांगत असत. इतकंच नाही तर सुदीपचा बॉसदेखील बायकोला घाबरून असे, ती भांडते म्हणून. त्यामुळे विषाची परीक्षा घ्यायची कशाला? असं सुदीपचे स्पष्ट मत होते.

त्याला भांडणं हा प्रकार अजिबात आवडत नसे, आणि लग्न हे भांडण्यासाठीच करतात असा त्याचा रास्त समज झाला होता.

एके दिवशी कुणी एक मध्यस्थ सुदीपसाठी स्थळ घेऊन आला. त्याच्या आई-वडिलांना भेटला. सुदीपच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी आणखीन एक प्रयत्न करायचं ठरवलं.

संध्याकाळी सुदीप ऑफिसमधनं परत आल्यावर त्याच्या आईनं त्याला नवीन स्थळाबद्दल सांगितलं. तो आईवर उचकलाच. म्हणाला, “तुला माझ्या लग्नाशिवाय दुसरं कांही सुचत नाही का? परत जर माझ्या लग्नाचा विषय काढला तर मी घर सोडून निघून जाईन.... सांगून ठेवतो”
“जा म्हणे. पण आधी त्या पोरीला बघून घे. या रविवारी आपण तिच्या घरी तिला बघायला जायचं आहे” आई म्हणाली.

मुलगी पहायला जाणे हा प्रकार तर त्याला अजिबात आवडायचा नाही. तो आईवर परत खेकसला, “मुलगी म्हणजे काय सिनेमा आहे का बघायला जायला?”
पण त्याच्या आईचं टुमणं सुरूच राहिले. मग त्यानं ओरडून सांगितलं, ‘परत जर माझ्या लग्नाचा विषय काढला तर मी जीव देईन’. तो तसं कांही करणार नाही हे आईला माहीत होते, त्यामुळे ती शांतपणे म्हणाली, “दे म्हणे, पण आधी त्या पोरीला बघून घे. ती शांत स्वभावाची आहे, तुझ्याशी भांडणार नाही अजिबात”
“पण तू तिच्याशी भांडशील ना, त्याचं काय? एका सुनेला पळवून लावलंस, आता आणखी एका पोरीचं वाटोळं  करायचं आहे का तुला? दादाचं वाटोळ केलंस आता माझंही वाटोळं करायचं आहे का तुला?”
त्याचं हे बोलणं त्याच्या आईला फारच लागलं. “रहा असाच बिन लग्नाचा” असं रागानं म्हणत ती स्वयपाकघरात निघून गेली.

एक आठवडा झाला. सुदीप संध्याकाळी ऑफिसवरनं घरी आला तर घरात कोणी पाहुणे आले होते. दोन मुली आणि एक वयस्क जोडपे. हे कोण असावेत याचा तो अंदाज बांधत होता, तेवढ्यात त्याची आई म्हणाली, “अरे हे पाहुणे कोण आहेत माहीत आहे का?”
त्यानं ‘नाही’ अशी मान हलवली.
“हे तुझ्या दीदीच्या सासरवरून आलेत. तुझ्या भाऊजींच्या जवळच्या नात्यातले आहेत. सहज पुणे फिरायला आलेत”
तसा तो मनातनं घाबरलाच होता, एखादेवेळी हे लोक आपल्याला पहायला वगैरे आलेत की काय या कल्पनेनं. पण हे दीदीच्या सासरकडचे पाहुणे आहेत आणि पुणे फिरायला आलेत हे ऐकून त्याला हायसं वाटलं. त्यानं त्या सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या. त्या मुलींची नावं सुनिता आणि अनिता अशी होती.

दुस-या दिवशी तो ऑफिसला गेला आणि संध्याकाळी परत आला तेंव्हा सुनिता घरी होती, पण तिचे आईवडील आणि अनिता त्याला दिसले नाहीत. त्यानं आईला विचारलं, तर ती म्हणाली, “ते पुणे पहायला गेलेत आणि तसंच पुढं त्यांच्या गावी जाणार आहेत”
“आणि सुनिता नाही गेली?” त्यानं विचारलं.
“नाही. ती आता आपल्याकडं थांबणार आहे थोडे दिवस. जॉब शोधायचा आहे तिला पुण्यात”

कुणाला जॉब पाहिजे असला तर सुदीपच्या अंगात उत्साह संचारत असे. त्यानं लगेच तिची चौकशी करायला सुरवात केली. शिक्षण, अनुभव वगैरे. म्हणजे एक प्रकारे तिचा इंटरव्ह्यूच घेतला. ती बरीच शिकलेली होती आणि थोडासा अनुभव होता तिला. शिवाय ती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न अडखळता पटापट देत  होती. “तुला उद्याच जॉब मिळेल आमच्याकडे” तो म्हणाला, “उद्या माझ्याबरोबर चल आमच्या कंपनीत”. तो इतक्या आत्मविश्वासाने  “तुला उद्याच जॉब मिळेल” म्हणण्याचं कारण म्हणजे तो त्याच्या कंपनीत एचआर डिपार्टमेंटमध्ये चांगल्या हुद्द्यावर कामाला होता आणि तिथं सुनिताला योग्य अशी नोकरी उपलब्ध आहे हे त्याला माहीत होतं. शिवाय सुनिता सहज सिलेक्ट होईल याचीही त्याला खात्री होती.
दुस-या दिवशी ती सुदीपबरोबर त्याच्या कंपनीत गेली, त्याच्या कारमध्ये  बसून.

सुदीपनं तिची एचआर मॅनेजरशी गाठ घालून दिली. सुनितानं अगदी आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू दिला. ती फारच हुशार दिसली. कंपनीनं तिला जॉब द्यायचे ठरवले. महिन्याला चाळीस हजार रुपये पगाराची ऑफर दिली. पण तिनं तिथं काम करायला नकार दिला. एवढ्या कमी पगारात काम करणं शक्य नाही असं तिनं सांगितलं. तिला पगाराची अपेक्षा विचारल्यावर तिनं असा आकडा सांगितला की इंटरव्ह्यू घेणारे एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. ती पटकन उठली आणि निघून गेली. सुदीपच्या घरचा पत्ता तिला माहीतच होता. ती सरळ घरी गेली.

संध्याकाळी सुदीप घरी गेला तेंव्हा जरा रागातच होता. अशी चांगली ऑफर असताना सुनितानं ती संधी सोडली हे त्याला आवडलं नव्हतं.

तो तिला म्हणाला, “तुला नोकरीचा फारसा अनुभव नाही मग तू एवढ्या मोठ्या पगाराची अपेक्षा का केलीस?”
“कारण मला जॉब मिळवण्याची घाई नाही’ ती शांतपणे आणि हसत म्हणाली, ‘पुण्यात इतक्या कंपन्या आहेत, तुमच्याच कंपनीतच जॉब करायला पाहिजे असं कुठं आहे? मला पाहिजे तसा जॉब मिळेलच दुसरीकडं कुठं तरी”

पण ती जॉब शोधायला जातच नसे. घरीच सुदीपच्या आईला स्वयपाकात, बाकीच्या कामात मदत करत असे. मग  मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स असल्या विषयाची पुस्तके वाचत असे. सारखा कांहीतरी विचार पण करत असे. तिचं आणि सुदीपच्या आईचे बरंच सूत जमलं होतं.

तिचं बोलणं, तिचं वागणं, तिचं रूप सर्वच त्याला आवडलं होतं. सुनिता जवळपास नसताना एकदा तो आईला लाजत लाजत आणि लाडीगोडी लावत  म्हणाला, “आई, सुनिता मला आवडली आहे. खूप छान मुलगी आहे. तिला विचार ना, माझ्याशी लग्न करेल का म्हणून.. तुझ्याशी पण तिचं चांगलं पटतं”
“अरे,” आई म्हणाली,’ “तिचं लग्न आधीच ठरलंय..”
हे ऐकून त्याचा चेहरा सर्रकन उतरला.
“आणि तू तर लग्न करायचं नाही असं म्हणतोस ना?”
त्यानं मान खाली घातली.
“काळजी करू नकोस,”  आई म्हणाली, “आपण दुसरी मुलगी बघू तुझ्यासाठी”
“नाही... नको.. अजिबात नको...” तो म्हणाला.

दुस-या दिवशी संध्याकाळी तो घरी आला तेंव्हा सुनिता त्याला दिसली नाही.
त्यानं आईला विचारले, “सुनिता कुठं दिसत नाही ती?”
“ती गेली तिच्या गावी” आई म्हणाली.
“का? आणि अशी अचानक? मला न सांगता?” तो नाराज होत म्हणाला.
“तुला कशाला सांगायला पाहिजे? मला सांगून गेली ती” आई त्याच्या चेहऱ्याकडं बघत खोचकपणे म्हणाली.
सुदीप केविलवाणं हसला.
आई म्हणाली, “खूपच आवडलेली दिसते तुला ती? तुला खरंच तिच्याशी लग्न करायचं आहे का?”
“पण तिचं लग्न ठरलंय असे तूच म्हणालीस ना?”
“ते बघता येईल काय करायचं ते ... मला सांग तुला तिच्याशी लग्न करायचं आहे का?”
“हो” तो लाजत लाजत म्हणाला.
“मग ऐक नीट. हीच ती मुलगी, जिचं स्थळ तुझ्यासाठी आलं होतं. पण तू तिला पहायला जायला देखील तयार नव्हतास. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्लॅन आखला. ती आपल्या घरी येऊन राहिली. ती तुला पसंत पडणार याची आम्हाला खात्रीच होती”
“पण मग तर तिनं आमच्या कंपनीतला जॉब का नाकारला?”
“कारण तिला आधीचाच चांगला जॉब आहे. तुझ्याएवढाच पगार आहे तिला.... खास रजा काढून प्लॅनमध्ये भाग घेतला तिनं”
“कुठं जॉब करते ती?”
“पुण्यातच”
“मग आता पुढं काय?”
“पुढं काय? तुम्ही दोघांनी मिळून ठरवा. येईलच थोड्या वेळात ती”
“येईलच? ती गावी गेली ना?”
“ती पण एक थापच होती” आई हसत हसत म्हणाली.
“चांगला प्लॅन होता”
“तिनंच आखला होता....”
“आं....” त्याला आश्चर्य वाटलं.
“अरे, पण एक गोष्ट तुला सांगायची राहिली बरं का..”
“कोणती गोष्ट?”
“सुनिता थोडी भांडखोर आहे”
“चालेल.... नाहीतरी तुला पाहिजेच ना कुणीतरी भांडायला!”

हेही वाचा:
शिवानीचं लग्न: भाग 1 
एक न-प्रेमकथा
गौरीचं लग्न


गुरुवार, २६ जून, २०१४

अमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....

-महावीर सांगलीकर


तुकुतुकू ग्रहावरून आलेल्या त्या एलियनने महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करायचे ठरवले होते. त्याने आता पुण्याकडे आपला मोर्चा वळवला. एका अमेरिकन इतिहास संशोधकाच्या रुपात तो पुण्यात अवतरला. इतिहासाची आवड असणा-या कांही टिपिकल पुणेरी लोकांशी त्याने मैत्री केली. त्याने मित्र निवडताना ज्यांच्या चेह-यावर प्रचंड तुच्छताभाव दिसत होता असेच नमुने निवडले. असे करण्याचे कारण म्हणजे त्याच्या तुकुतुकू ग्रहावर या प्रकारचे स्वत:ला फारच शहाणे समजणारे लोक होते, त्यांच्याशी यांचे काय साधर्म्य आहे हे त्या एलीयनला बघायचे होते. अर्थातच असे मित्र गोळा करायला त्याला फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत.

एके दिवशी त्याचा एक पुणेरी मित्र आपली नसलेली छाती फुगवत त्याला म्हणाला, "तुमच्या अमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास आहे, पण आमच्या भारताला 5000 वर्षांचा इतिहास आहे". हे ऐकताच तो एलियन म्हणाला, "हो, आणि तुमच्या महाराष्ट्राला तर फक्त साडे तीनशे वर्षांचाच इतिहास आहे".

एलियनचे हे मत ऐकल्यावर त्या पुणेकराची छाती एकदम आतच गेली. मग तो एलियन म्हणाला, 'अरे मित्रा, तुला तुझ्या महाराष्ट्राचा 350 वर्षापूर्वीचा इतिहास माहीत नाही, मग अमेरिकेचा 500 वर्षांपूर्वीचा इतिहास कसा काय माहीत असणार? तुझे अज्ञान मी समजू शकतो. अरे, तू जेंव्हा अमेरिकेला 500 वर्षांचाच इतिहास आहे असे म्हणतोस, त्यावेळी तुला युरोपिअन लोक अमेरिकेत गेले आणि तेथे वसले एवढेच माहीत असते. पण त्या अगोदरही तेथे लोक होते आणि त्यांना हजारो वर्षांचा इतिहास आहे हे तू विसरतोस. तुझ्यासारख्या बुद्धिमान टोळीचा वारसा असलेल्या माणसाला हे अज्ञान शोभत नाही".

हे ऐकताच तो पुणेकर तरातरा निघून गेला. पुढे तो एका इतिहास विध्वंसक मंडळात त्या एलियनला दिसला होता. एका कर्नाटकी माणसाला म्हणत होता, "आमच्या महाराष्ट्राला इतिहास आणि भूगोल या दोन्ही गोष्टी आहेत, तुमच्या कर्नाटकाला फक्त भूगोलच आहे".

एलियनची आता पक्की खात्री झाली की हे टिपिकल पुणेकर कधीच सुधरू शकत नाहीत. तुकुतुकू ग्रहावरील त्या रानटी गो-या टोळ्यांशी यांचे फारच साम्य आहे हे त्याला आता कळून चुकले होते.


हेही वाचा:
ज्याचे त्याचे संस्कार
व्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव
वाचक
संगतीचा परिणाम
एका बदल्याची गोष्ट

मंगळवार, २४ जून, २०१४

एका बदल्याची गोष्ट

-महावीर सांगलीकर


मिलिंदला अनेक लोकांनी सांगितले होते की त्या मकरंदच्या खापरपणजोबांनी तुझ्या खापरपणजोबाच्या थोबाडीत मारली होती. पण तुझा खापरपणजोबा दुबळा असल्याने त्यावेळी गप्प बसला. ही गोष्ट सारखी-सारखी ऐकून मिलिंद मकरंदचा आणि मकरंद नावाच्या सगळ्या लोकांचा द्वेष करू लागला.

एकदा मिलिंद आणि मकरंद (मूळ मकरंद, ज्याच्या खापरपणजोबांने  मिलिंदच्या खापरपणजोबाच्या थोबाडीत मारली होती तो ) आमने सामने आले. सुडाने पेटलेल्या मिलिंदने मकरंदच्या थोबाडीत ठेवून दिली.

"का मारलीस? मी काय बिघडवले तुझे?" मकरंद रडवेला होवून गाल चोळत म्हणाला.
"तुझ्या खापरपणजोबाणे माझ्या खापरपणजोबांच्या थोबाडीत मारली होती," मिलिंद म्हणाला, " तुझ्या थोबाडीत मारून मी त्याचा बदला घेतला. आता मी मकरंद नावाच्या सगळ्यांच्या थोबाडीत मारून मी पुन्हा बदला घेणार आहे. इथून पुढे बदला घेणे हेच माझे जीवन कार्य असणार आहे"

हे बदला  प्रकरण घडत असताना  एक एलियन ते बघत होता. हा एलियन पृथ्वीपासून 12 प्रकाशवर्षे दूर असलेल्या 'तुकुतुकू' या ग्रहावरून 'महाराष्ट्रातील जातीकलह आणि त्याचे तुकुतुकू ग्रहावरील रानटी लोकांच्या टोळीकलहाचे तुलनात्मक अध्ययन'  या विषयावर अभ्यास करण्यासाठी आला होता. वरील घटना घडताच त्याने लगेच आपल्या टाईम  मशीनला उलटी किक मारली आणि तो मिलिंदच्या खापरपणजोबाच्या काळात पोहोचला.

तेथे त्याला एक पैलवान एका वयस्क माणसाच्या थोबाडीत सारखा-सारखा मारत होता असे दृश्य दिसले. एलियनने दुरूनच त्या दोघांच्या मेंदूची नोंद करून घेतली. त्या दोघांची सर्व सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, जिनेटिक  वगैरे माहिती एलियनच्या मेंदूत साठवली गेली.

त्यानंतर तो एलियन  पुन्हा वर्तमान काळात आला. त्यावेळी त्याला मिलिंद एका पैलवान टाईप तरुणाशी गप्पा मारत असल्याचे दिसले. त्या एलियनने त्या दोघांच्याही मेंदूची दुरूनच नोंद करून घेतली. त्याला मिळालेली माहिती त्याने वर मिळालेल्या माहितीशी ताडून बघितली तेंव्हा असे दिसले की आत्ताच्या पैलवान पोराच्या खापरपणजोबाने मिलिंदच्या खापर खापरपणजोबाच्या थोबाडीत मारली होती, त्या घटनेशी मकरंदच्या खापरपणजोबाचा कांहीच संबंध नव्हता. एलियनने ही गोष्ट मिलिंदला सांगायचे ठरवले. तो मानवी रुपात प्रकट होवून मिलिंद जवळ गेला. तोपर्यंत तो पैलवानटाईप पोरगा निघून गेला होता.

"अरे, तू मिलिंद ना? थोड्या वेळापूर्वी त्या मकरंदच्या थोबाडीत मारणारा?"
हे ऐकून मिलिंद दचकला. त्याला वाटले मकरंदने या माणसाला आपल्याला जाब विचारायला पाठवले की काय? एलियनने हे ओळखले होतेच. तो म्हणाला, "घाबरू नकोस, मी तुला एवढेच सांगायला आलो की तुझ्या खापरपणजोबाच्या थोबाडीत मकरंदच्या खापरपणजोबाने नव्हे, तर आत्ता जो मित्र तुझ्याबरोबर होता ना, त्याच्या खापरपणजोबाने मारली होती. पण तू तर मकरंदला दोष देत आहेस"

"हो माहीत आहे मला" , मिलिंद म्हणाला, "पण मकरंदच्या थोबाडीत मारणे मला जास्त सोयीचे आहे.  तो प्रतिकार करत नाही. त्या पैलवान मित्राच्या थोबाडीत मारायला गेलो तर तो मला उलटी थोबाडीत मारील"

इथल्या लोकांची मानसिकता आपल्या ग्रहावरील रानटी लोकांसारखीच आहे असे त्या एलियनला वाटू लागले. पण त्यासाठी त्याला आणखी अनेक लोकांचा सर्व्हे करायची गरज होती. बघूया पुढे त्याला आणखी कसले कसले नमुने भेटतात ते.....

शुक्रवार, १३ जून, २०१४

संगतीचा परिणाम

-महावीर सांगलीकर


एका गावाबाहेर चिंचेचे एक मोठे झाड होते. त्या झाडाला खूप चिंचा लागत असत. त्या झाडाची सावली वाटसरुंना गारवा देत असे. ते झाड इतके विचारी होते की आपल्या पिकलेल्या चिंचा ते स्वत: होवून खाली पाडून टाकत असे. वाटसरू अशा चिंचा घेवून जात. त्यातील कांही चिंचोके कुठे ना कुठे, कधी ना कधी रुजत असत, उगवत असत आणि त्यातील कांहीचे मोठे झाडही होत असे. जिनेटिक गुणांमुळे या नवीन उगवणा-या झाडांचा माइंडसेटही त्या गावाबाहेरच्या चिंचेच्या झाडासारखाच परोपकारी, सात्विक, पॉसिटिव्ह थिंकिंग करणारा असे.

पण संगतीच्या परिणामामुळे एखाद्याचे चांगले मूळ गुण कसे मार खातात त्याची ही कथा आहे.

एके दिवशी एका कावळा चिंचेच्या झाडाच्या फांदीवर बसला. त्याने टाकलेल्या विष्टेतून बाभळीच्या बिया चिंचेच्या झाडाखाली पडल्या. त्यातील एक बी उगवून बाभळीचे एक झाड हळूहळू वाढू लागले.  त्याने त्या चिंचेच्या झाडाशी दोस्ती केली. त्या दोस्तीचा गैरफायदा घेवून ते चिंचेच्या झाडाचे मन इतरांच्या विषयी कलुषित करू लागले. ते म्हणायचे, ' अरे काय तू, कोणीही येते आणि तुझ्या सावलीत विसावा घेते. तुझ्या चिंचा तुला न विचारता घेवून जाते. त्या माणसांची पोरे तर तुला दगडे मारतात.'

'मग काय बिघडले?' चिंचेचे झाड म्हणाले, 'माझ्या सावलीत जे विसावा घेतात, बसतात, त्यामुळे त्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद होतो. माझ्या चिंचा लोकांसाठीच असतात. त्यातील चिंचोके कुठे तरी उगवतात आणि माझा वंश वाढतो. आता माणसांची पोरे मला दगडे मारतात, पण त्यांचा हेतू मला दगडे मारणे हा नसून चिंचा पाडणे हा असतो. त्यांनी चिंचा नेल्या तर पुढे माझाच वंश वाढणार असतो. शिवाय त्यांनी मारलेली दगडे मला फुलासारखी वाटतात'.

हे ऐकून बाभळीच्या झाडाला चिंचेच्या झाडाची कीव करावीशी वाटली. ते रागाने म्हणाले, 'तू प्रतिगामी आहेस. तुझे माणसीकरण झाले आहे. तू असा आहेस. तू तसा आहेस'.

चिंचेच्या झाडाने त्याचे म्हणणे कांही मनावर घेतले नाही. पण बाभळीच्या झाडाचे पालुपद रोजच चालू असे. ते रोज कांहीतरी नवीन मुद्दा मांडून चिंचेच्या झाडाचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करत असे.

एके दिवशी ते म्हणाले, 'या माणूस नावाच्या प्राण्याने जगभर झाडांची कत्तल चालवली आहे. या माणसांच्याकडे बघून घ्यायला पाहिजे.' झाडांच्या कत्तलींचा मुद्दा ऐकून चिंचेचे झाड थोडे हबकले.

आणखी कांही दिवसांनी बाभळीचे झाड खोटेच म्हणाले, ' अरे तुला कळले का, आता माणसे चिंचेच्या झाडांची कत्तल करायला लागले आहेत'.

आता मात्र चिंचेचे  झाड निराश झाले. त्याला माणसांचा राग यायला लागला. या माणूस नावाच्या प्राण्याला धडा शिकवायचाच असे त्याने ठरवले. काय करावे बरे? त्याला एक आयडीया सुचली. तो आपले मूळ विचार, मूळ गुण विसरून गेला. त्याने ठरवले,  आपल्या अंगाला चिंचा लागतात, म्हणून माणसे ती खायला येतात. आपली थंडगार सावली पडते म्हणून माणसे आपल्या सावलीत विसावा घेतात. आता आपण आपल्या अंगाला चिंचाच  लावून घ्यायच्या नाहीत. आपली सगळी पाने गाळून टाकायची, म्हणजे सावलीच पडणार नाही. असे केले तर ती माणसे आपल्याकडे कशाला फिरकतील? हे विचार त्याने लगेच अमलात आणले. त्या झाडाची सगळी पाने कांही झाडून गेली. त्या झाडाला आता चिंचा लागेनात. कांही महिन्यातच ते झाड खंगून गेले. वाळले. मेले.

आत्तापर्यंत चिंचेच्या सावलीमुळे नीट वाढ होत नसलेले ते बाभळीचे झाड मात्र चांगलेच फोफावू लागले.

गुरुवार, १२ जून, २०१४

तुमचे आयुष्य बदलवणारा सिक्रेट फॉर्म्यूला


माझ्या तरूण मित्रांनो/मैत्रिणींनो,

जर तुम्हाला उंच भरारी घ्यायची असेल, जीवनात योग्य दिशेने प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी माझ्याकडे अनेक सिक्रेट फॉर्म्यूलाज आहेत. जर तुम्ही माझ्या कसोटीला उतरलात तर मी तुमचे आयुष्य बदलवून टाकू शकतो. आजवर मी अनेकांची आयुष्ये बदलवून टाकली आहेत. तुम्ही माझ्या  गौरी आणि फेसरीडरगौरीचं लग्न या कथा वाचल्या असतीलच. त्या कथा काल्पनिक नसून एक पूर्ण सत्यकथा आहेत. त्यातील फेसरीडर मीच आहे.  (जर आपण या कथा वाचल्या नसतील तर त्या याच ब्लॉगवर शोधाव्यात )

केवळ गेल्या महिनाभरात मी अशा डझनभर गौ-या आणि गोरोबांचे आयुष्य बदलवून टाकले आहे.

जर तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली नसेल, जर तुम्हाला सतत अपयश येत असेल,  जर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स कोणाला सांगू शकत नसाल, तुमची सुखदु:खे कोणापुढे व्यक्त करू शकत नसाल, जर तुमच्यावर कसलेही दडपण असेल, जर तुमचे लग्न होत नसेल तर बिनधास्तपणे मला सांगा. मला तुम्ही तुमचा मोठा भाऊ समजा, मित्र समजा.

तुम्ही मला जे सांगाल ते गुप्तच राहील. तुमच्या लेखी परवानगीशिवाय ते अगदी कथेत देखील वापरले जाणार नाही. मी जे तुम्हाला सांगेन ते देखील गुप्तच राहिले पाहिजे.

माझ्याकडे कसलीही जादूची छडी नाही, खडे नाहीत आणि अंगठ्याही नाहीत. मी तुम्हाला कोणत्याही देवाची भक्ती करायला सांगणार नाही. कर्मकांड करायला लावणार नाही. तीर्थक्षेत्री जायला लावणार नाही. माझ्याकडे केवळ एक विशाल मन आहे, जे तुम्हाला समजून घेईल. माझ्याकडे एक बोट आहे जे तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. तुम्ही त्या दिशेने प्रवास करू लागलात की नक्कीच तुमचे भले होणार. जसे आजवर अनेकांचे भले झाले आहे.

आजपर्यंत तुम्ही आपल्या आयुष्यातला बराच वेळ वाया घालवला आहे. आता वेळ लावू नका. आजच माझ्याशी संपर्क साधा:

महावीर सांगलीकर
(पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली, मुंबई)
Numerologist, faceFace Reader, Motivator, Healer, Author
Email: samdolian@gmail.com
Cell Numbers:  814 947 6895, 962 372 5249
Blogs:  http://ankshaastra-numerology.blogspot.in/ ,  http://mahaakatha.blogspot.in/

बुधवार, २८ मे, २०१४

कन्फेशन

-महावीर सांगलीकर


कन्फेशन लेटरमध्ये नेमके काय लिहायचे ते लिहून काढायची गरज नव्हती. मनात सगळं तयार होतच. सायबर कॅफेत जायचं, टाईप करायचं  आणि पोस्ट करायचं...

मी एक ग्रुप ओपन केला. बघतो तर तेथे माझ्या विरोधात आणखी एक नवीन पोस्ट दिसली..

सांगलीकर बिट्रेयड मी टू

सांगलीकर यांनी माझाही विश्वासघात केला आहे. मी पुण्यातच रहाणारी एक तरुणी आहे. सांगलीकर यांनी माझ्यावर प्रेमाचे नाटक केले, माझ्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले, माझे शोषण केले आणि नंतर लग्न करण्याचे नाकारले. मी त्यांच्या विरोधात पोलीस केस केली, पण त्याचा कांही उपयोग झाला नाही. मला आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही...
-पुणेकर मुलगी

ही पुणेकर मुलगी म्हणजे दिशाच असणार... आणखी किती आरोप माझ्यावर टाकेल सांगता येत नाही. आता तिचा कांहीतरी बंदोबस्त केला पाहिजे.

मग मी राजीव शहा, मुंबई गर्ल आणि पुणेकर मुलगी या नावाने आलेल्या पोस्ट्सचे आय.पी. अॅड्रेस चेक केले. मला धक्का बसला... तिन्ही आय.पी. अॅड्रेस वेगवेगळे होते. पुणेकर मुलगीचा आय.पी. अॅड्रेस तर पुण्यातलाच होता. दिशा फारच पोहोचलेली होती. ती काळजीपूर्वक खेळ खेळत होती. ती सूडाने पेटलेली होती, आक्रमक झाली होती आणि मुळातच तिच्याबद्दल मला आपुलकी असल्याने मी मात्र मवाळ बनून राहिलो होतो. पण असे मवाळ वागत राहिल्यास वागल्यास आपली बदनामी होत रहाणार, आणि आपण आक्रमक झालो तरी तिच्यापुढे आपला निभाव लागणार नाही हे मला माहित होते. काय करावे बरे? संपूर्ण शरणागती पत्करायची? पण असा विचार मनात येताच माझा इगो जागा झाला. आता मरायचेच आहे तर लढून मरायचं...

मी लगेच एक पोस्ट लिहिली.....

नाऊ इट इज इनफ  
आजवर मी शांत राहिलो, पण माझ्या संयमाचा गैरफायदा घेवून आता ही सो कॉलड मुंबई गर्ल सगळ्या सीमा ओलांडून वेगवेगळ्या नावाने माझ्यावर खोटेनाटे आरोप करत सुटली आहे. बट नाऊ इट इज इनफ. आजच मी पुणे पोलिसांच्या सायबर शाखेत या बयेच्या विरोधात केस दाखल करत आहे. या ग्रुपमध्ये ज्या लोकांनी मुंबई गर्लच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून माझी बदनामी केली, त्यांच्यावरही मी केसेस टाकत आहे.

याचा व्हायचा तो परिणाम झालाच. दिशाची साथ देणा-यांनी काढता पाय घेतला. पण मुंबई गर्लची पुन्हा एक पोस्ट आलीच...

व्हाट अबाउट द कन्फेशन?

त्या पोस्टवर मी लगेच उत्तर दिले, तू शांत रहा... मी आजच कन्फेशन देणार होतो, पण तू मध्येच बकवास केली असल्याने आता मी उद्या कन्फेशन देईन.. अर्थातच तू तोपर्यंत कांही बडबड, गडबड केली नाहीस तर.

दुस-या दिवशी मी पुन्हा सायबर कॅफेत गेलो. ग्रुप्स चेक केले. सारे कसे शांत होते. मग मी माझे म्हणणे मांडू लागलो.... 

माय कन्फेशन
 
माझ्या विरोधात वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आजकाल जे कांही लिहिले जात आहे, माझ्यावर जे आरोप केले जात आहेत  त्यामुळे माझी अवस्था खूप विचित्र झाली आहे. माझ्यावरील आरोपांचे उत्तर न द्यावे तर मी दोषी आहे असेच मानले जाईल, आणि जर विस्ताराने उत्तर दिले तर हे प्रकरण आणखीनच वाढत जाईल अशी भीती मला वाटते. मी तुम्हा सर्वांना एवढेच सांगू इच्छितो की सदर मुलीने माझ्यावर जे आरोप केले आहे ते पूर्णपणे खोटे आहेत आणि असे खोटे आरोप करण्यामागे तिचे उद्देश काय आहेत ते मला माहीत नाही.

ही मुलगी दहा वर्षांपूर्वी माझी पत्रमैत्रीण होती. कांही महिन्यांपूर्वीपासून ती माझ्या पुन्हा संपर्कात आली. तिचे विविध विषयांचे सखोल ज्ञान, तिचा गूढ चेहरा यामुळे मी तिच्या कधी प्रेमात पडलो हे माझे मलाच कळले नाही. होय, मी तिच्यावर प्रेम केले... अगदी जीवापाड.. तहान भूक विसरून... तिनेही माझ्यावर तेवढ्याच उत्कटतेने प्रेम केले.. या प्रेमात शारीरिक आकर्षण अजिबात नव्हते. हे व्हर्च्युअल प्रेम होते, आणि ते कायम व्हर्च्युअलच राहावे अशी माझी इच्छा होती. जिच्यावर मी प्रेम करावे अशी माझ्या आयुष्यात आलेली ही एकमेव मुलगी आहे.

मी मुंबईला कामानिमित्त अनेकदा जात असे, पण मी तिची भेट घेणे नेहमी टाळले. खरे म्हणजे तिची भेट घेण्याची मला कधी इच्छाच झाली नाही. पण तिची मात्र मला भेटण्याची इच्छा होती. तिची भेट टाळण्यासाठी मी मुद्दामच तिच्याशी भांडण काढले. त्यात मी किंचित गैरप्रकार केला. त्यामुळे ती दुखावली गेली. त्यातूनच तिने मला धडा शिकवण्यासाठी मला जाहीरपणे बदनाम केले. 

मला धडा शिकवण्यासाठी ती पुढे आणखी काय-काय प्रकार करणार आहे हे तिलाच ठाऊक. 

माझ्या इमेल अकाउंट अकाउंटमध्ये तिच्या इमेल्स, तिचे फोटो होते हे खरे आहे, पण माझे ते अकाउंट हॅक झालेले आहे. ते कोणी हॅक केले असावे हे सांगण्याची गरज नाही. त्या हॅकरने तिचे फोटो आणि इमेल्स डिलीट केल्याच असतील. असो.

या सगळ्या प्रकरणात तिने माझी जी जाहीर बदनामी केली त्याबद्दल मी तिला माफ करत आहे. तिच्याऐवजी दुस-या कोणी माझी अशी बदनामी केली असती तर त्या व्यक्तीला मी जेलमध्ये खडी फोडायला पाठवले असते. पण तिच्या बाबतीत मी हे करू शकत नाही. कारण माझे तिच्यावर प्रेम आहे. काल होते, आजही आहे आणि उद्याही राहील. अगदी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत. मला पुढील काळात एखादी मुलगी भेटली, तिने प्रपोज केले तरी मी या मुंबई गर्लवर जसे प्रेम केले, तसे, तेवढे  प्रेम मुळीच करू शकणार नाही. किंबहुना दुसरी कोणी मुलगी माझ्या आयुष्यात यावी अशी माझी इच्छाच नाही.

कांही विशिष्ट कारणांमुळे मी इच्छा असूनही मी तिला भेटण्याचे पूर्णपणे टाळले.... यामागे माझा तिच्या भल्याचाच हेतू होता. याविषयी मी येथे जास्त कांही बोलू इच्छित नाही. यथावकाश तिला कळेलच की मी असा का वागलो. 

माझ्या वागण्यामुळे तिला बसलेला मानसिक धक्का मी समजू शकतो. तिने मला माफ केले तरी मी माझे मला माफ करू शकत नाही.

डोन्ट वरी फ्रेंड, मी तुझ्या विरोधात पोलिसांमध्ये कसलीही तक्रार दिलेली नाही. देणार नाही.

हम बेवफा हरगीज न थे
पर हम वफा कर न सके...

वुई हॅव टू मीट अगेन इन द नेक्स्ट बर्थ, इफ देअर इज रिअली सच अ थिंग.. टेक केअर, and अॅन्ड  इफ पॉसिबल फरगेट मी टिल युअर नेक्स्ट बर्थ.... गुड बाय मुंबई गर्ल...

माझ्या या कन्फेशन लेटरमुळे दिशापर्यंत योग्य तो संदेश गेला होता. इतरांची मला पर्वा नव्हतीच.

दुस-या दिवशी माझ्या वरील पोस्टला दिशाने उत्तर दिले...

काय ही सहानभुती..... मिस्टर सांगलीकर, आधीच दु:खात असलेल्या एका मुलीला तुम्ही तुमच्या वागण्यामुळे अक्षरश: ठार मारून टाकले आहे. का तुम्ही माझ्याशी असा खेळ खेळलात? का तुम्ही माझ्याशी असे निष्ठूरपणे वागलात? का तुम्ही माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतलात? तुम्ही असे कसे करू शकता? 

तुमचे कन्फेशन लेटर वाचल्यावर तर मला मेल्याहून मेल्यासारखे झाले.... हे सगळं लिहायची गरज होती का? आता वाटतं, गेल्या वर्षी माझा जो अपघात झाला, त्याचवेळी मी का नाही मेले... 

पण यात तुमचा कांही दोष नसावा.... मीच गेल्या जन्मी किंवा याच जन्मात जाणते-अजाणतेपनी कुणाचे तरी वाईट चिंतले असावे, त्याचीच ही फळे मी भोगत आहे... 

मी तुम्हाला माफ केले आहे, पण तुम्ही जे कांही केले आहे, त्याची फळे तर तुम्हाला भोगावीच लागणार, नाही का? हाऊएव्हर, आय विल प्रे फॉर यू ... तुम्हाला जास्त त्रास होऊ नये म्हणून.

आता मी हे सगळे इथच थांबवत आहे... या विषयावर आणखी चर्चा होऊ नये अशी माझी इच्छा आहे. गुड बाय मिस्टर सांगलीकर.....

दिशाच्या या पोस्टला उत्तर देण्याचे कारणच नव्हते. दोघांनी एकमेकांना जे सांगायचे होते ते सांगून झाले होते.

चला, एकदाचे आपण या प्रकरणातून बाहेर पडलो... परत असले उद्योग करायचे नाहीत... करण्याचा प्रश्नच नव्हता...


एक आठवडा गेला. इमेल्स चेक करत असताना मुंबई पोलिसांकडून आलेली एक इमेल दिसली. मी ती ओपन केली. दिशाने माझ्या विरोधात मुंबई पोलिसांच्या सायबरसेलमध्ये तक्रार केली होती. माझ्यावर भयानक आरोप लावले होते. पोलिसांनी मला समन्स पाठवले होते. सात दिवसांच्या आत मुंबई पोलीस मुख्यालयातल्या सायबरसेलमध्ये इन्स्पेक्टर शेख यांना भेटायला सांगितले होते. मी गेलो नाहीतर आम्हाला तुमच्याकडे यावे लागेल असेही लिहिले होते.

ही मेल खरेच मुंबई पोलिसांकडून आली आहे का? की हा दिशाचा आणखी एक खोडसाळपणा आहे? त्या मेलच्या शेवटी दोन फोन नंबर होते. मी टेलेफोन बूथवर जावून त्यातील एका नंबरवर फोन केला.
‘नमस्कार, मुंबई पोलीस..’ तिकडून एक भारदस्त आवाज आला. मी लगेच ओळखले, हा पोलीस स्टेशन मधला आवाज आहे, कारण इतरही अनेक ‘पोलिसी’ आवाज ब्याक ग्राउंडला येत होते. मी पटकन फोन ठेवून दिला. म्हणजे खरेच दिशाने आपल्यावर केस केलीय तर.

पण तिने तर लिहिले होते की मी तुम्हाला माफ केले आहे.. मग हे काय नवीनच?

मी लगेच दिशाला फोन लावला. रिंग वाजली.
ती फोनवर माझ्याशी बोलेल का याविषयी मला शंकाच होती..
तिने फोन उचलला...

‘मिस्टर सांगलीकर, तुम्ही मला पुन्हा फोन का केलात?’ तिने नाराजीने विचारले.
‘मला आधी सांग तू कशी आहेस?’
‘मी अजून आहे यातच काय ते समजून घ्या’
‘सेम हिअर.... दिशा, तू मला माफ केलं होतस ना?’
‘होय...’
‘मग मुंबई पोलिसात तू माझ्या विरोधात तक्रार का केली आहेस?’
‘ती तक्रार मी तुम्हाला माफ करण्यापूर्वीची आहे’
‘मला त्रास होऊ नये असं तुला वाटतं ना?’
‘होय’
‘मग ती तक्रार मागं घे... प्लीज...’
‘तो एफ. आय. आर. होता... मी तक्रार मागं घ्यायला गेले होते. पोलीस म्हणतात, आता चौकशी झाल्याशिवाय कांही करता येत नाही’
‘मग आता काय करायचे?’
‘चौकशीला सामोरं जायचं... दुसरं काय?’
‘ठीक आहे, मी भेटतो पोलिसांना जाऊन’
‘टेक केअर... मुंबई पोलिसांच्या बाबतीत ऐकलंच असेल’
‘ऐकलंय, वाचलंय...’
‘एखाद्या चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या.... पोलिसांना भेटतांना बरोबर कोणीतरी असू द्या.. एकटे जाऊ नका. मुंबईत आहे का कुणी ओळखीचे?’
‘हो, आहे ना.... दिशा... दिशा नावाची एक मैत्रीण आहे’
‘ती नाही तुम्हाला मदत करणार... म्हणजे तीच तक्रारदार आहे, तिला तुमच्या बाजूने बोलता येणार नाही. दुसरं कोणी आहे का ओळखीचे, मुंबईत?’
‘दुसरं कोणीच नाही....’
‘देन गॉड हेल्प यू... मला तुमची काळजी वाटते. कधी भेटणार आहात पोलिसांना?’
‘गुरुवारी.... आणखी तीन दिवसांनी’
‘या... मी असेनच तिथ बहुधा .... हाहाहाहा....’
‘अच्छा, म्हणजे ही केस म्हणजे तुझं एक नाटक आहे.... मला भेटण्यासाठी..’
‘नाही... रागाच्या भरात मी केस केली... ती आता परत घेता येत नाही. मला तुम्हाला भेटायची इच्छाही आता उरली नाही. जर पोलिसांनी बोलावलं नाही तर मी येणारही नाही...’
‘तू न येण्यातच तुझं भलं आहे. दिशा, तू यायचं टाळ. आलीसच तर मी येण्यापूर्वी किंवा मी गेल्यावर ये. हे शक्य झाले नाही आणि आपण समोरासमोर आलोच तर माझ्याकडे बघू नकोस.... मीही तुझ्याकडे बघणार नाही. आपली चुकून जरी नजरानजर झाली तर सगळं संपलंच म्हणून समज’
‘हे तुम्ही काय बोलत आहात मिस्टर सांगलीकर?’
‘ते तुला नंतर कळेल. सध्या आत्ता मी काय सांगितले ते पक्के लक्षात ठेव.  धिस इज अ रिक्वेस्ट... प्लीज... अगदी हात जोडून कळकळीची विनंती .... तुझ्याच भल्यासाठी.. प्लीज.... माझी शपथ आहे तुला’ असे म्हणून मी फोन कट केला.


हे पोलीस प्रकरण जरा गंभीरच होते. आपल्याकडे फक्त तीन दिवस आहेत. एक वकील शोधायला पाहिजे. आणखीही कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यायला पाहिजे. कोणाला भेटावं बरे? अनेक लोकांची नावे डोळ्यासमोर तरंगायला लागली.....

मी लगेच एक फोन लावला...
‘पी. आय. कदम बोलतोय...’
‘मी महावीर....’
‘बोल महावीरा... आज कशी काय आठवण झाली माझी....’
‘संकट... संकट काळात मला तुझीच आठवण होते....’
‘काय लफडं केलंस...?’
‘लफडं नाही.... वेगळीच भानगड आहे.  सांगतो.. पण मला तुला प्रत्यक्ष भेटायचं आहे... आता कुठं आहेस तू?’
‘एक मर्डर झालाय, तिकडे आहे. यायला उशीर होईल’.
‘मग कधी भेटू?’
‘रात्री घरी ये... जेवायला’
‘ठीक आहे... जरा लवकरच येतो... सात वाजता... म्हणजे बोलता येईल भरपूर... बरंच कांही सांगायचं आहे तुला..’
‘सातला नको... आठला ये... मी बरोबर आठला घरी हजर होईन...’
‘ओके, येतो...’


पुढे चालू ...
 या दिर्घकथेचे आधीचे भाग:


शुक्रवार, २३ मे, २०१४

शिक्षा

 -महावीर सांगलीकर


दिशाच्या तावडीतून माझी सुटका झाली असे वाटले खरे, पण त्यादिवशी संध्याकाळ पासून माझे डोके प्रचंड दुखायला लागले. अंगही दुखायला लागले आणि किंचित तापही आला. किरकोळ उपचार करून संध्याकाळीच झोपी गेलो. दुस-या दिवशीही डोके दुखायचे कांही थांबेना. ओळखीच्या एका वयस्कर डॉक्टरांच्याकडे गेलो. त्यांनी तपासले आणि सांगितले, ‘कांही नाही झाले जा.. झोप काढ मस्तपैकी..’

मग मी अक्षरश: दिवसभर झोप काढली... रात्री कांही झोप येईना. दिशाशी संबध तोडले हे ठीक केले, पण त्याच्यासाठी आपण जो घाणेरडा प्रकार केला त्याचे मला वाईट वाटू लागले. माझे मन मला खाऊ लागले. पण आता झाले ते झाले... उद्यापासून आपण आपल्या कामाला लागले पाहिजे...

दुस-या दिवशी मी सायबर क्याफेत गेलो. आधी इमेल चेक कराव्यात असे ठरवले. हॉटमेलमध्ये युजर नेम आणि पासवर्ड टाकला. कांही सेकंदातच स्क्रीनवर राँग पासवर्ड अशी अक्षरे दिसली. आज पासवर्ड कसा काय चुकला? पुन्हा प्रयत्न केला... पुन्हा राँग पासवर्ड.. मी हादरलो. नक्कीच आपले इमेल अकाउंट हॅक झालंय... दिशा... दिशाचेच काम असणार हे. आता काय करायचे.... पासवर्ड रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला. सिक्युरिटी क्वेश्चन्सची उत्तरे देखील चुकीची होती... स्मार्ट गर्ल... तिने आपले याहूचे अकाउंटदेखील हॅक केले असणार... मी तिकडेही युजर नेम आणि पासवर्ड टाकून बघितला... स्क्रीनवर मेसेज... तुमच्या अकाउंटमध्ये मुंबई येथून लॉग इन करण्याचा प्रयत्न झाला. ते तुम्हीच होता का? मी नाही असे उत्तर दिले. कांही प्रश्न विचारले गेले. त्यांची मी बरोबर उत्तरे दिली. मग मला माझ्या अकाउंटमध्ये शिरकाव करता आला. इमेल लिस्टवर एक नजर टाकली. सगळे कांही ठीक ठाक होते. पासवर्ड बदलून टाकला, सिक्युरिटी क्वेश्चन्सही बदलून टाकले.
पण हॉटमेलचे काय? तिथेतर आपल्या फार महत्वाच्या इमेल्स आहेत. आपल्या वेबसाईट्सचे पासवर्ड आहेत... अरे बापरे.... मी लगेच माझ्या एका वेबसाईटवर  गेलो... ती वेबसाईट हॅक झाली होती. तेथे पुढील ओळी होत्या..

हॅलो मिस्टर सांगलीकर
यह तो सिर्फ एक शुरुआत है
आगे आगे देखो होता है क्या....

मी लगेच माझी दुसरी वेबसाईट चेक केली. तेथे लिहिले होते:
अभी बहोत कुछ होना बाकी है..

हा माझ्यासाठी एक जबरदस्त झटका होता. या दोन्ही वेबसाईटसवर मिळून 500 पेक्षा जास्त लेख, शेकडो फोटो होते. इंडॉलॉजी, प्राचीन इतिहास, सिंधू संस्कृती, जैनिज्म, प्राकृत भाषा, संस्कृत भाषा, प्राचीन साहित्य....  त्यातले अनेक लेख मी जगभरच्या विद्वानांकडून खास त्या वेबसाईट्ससाठी लिहवून घेतले होते. त्या बनवायला मला 2 वर्षांपेक्षा जास्त काळ लागला होता. वाईट गोष्ट म्हणजे त्यावरचा मजकूर मी इतर कुठे सेव्ह करून ठेवला नव्हता. या वेबसाईटस एवढ्या महत्वाच्या होत्या की त्यांच्या निर्मितीसाठी दिल्लीच्या एका प्रसिद्ध रिसर्च इंस्टिट्यूटने एका इतिहास परिषदेत माझा सुवर्णपदक देवून गौरव केला होता. गेले सगळे काम मातीमध्ये.

त्या काळात मी वेगवेगळ्या याहू ग्रुप्सचा सभासद होतो. त्यातील इतिहासाशी संबधीत आणि इतर कांही ग्रुप्समध्ये मी वेबसाईटस हॅक झाल्याची पोस्ट टाकली. माझे हॉटमेल अकाउंट हॅक झाल्याचेही सांगितले. मी सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवत असल्याचेही लिहिले. ही बातमी दिशापर्यंत पोहोचणार याची मला खात्री होती. नाहीतरी तिचा वॉच असणारच आहे आपल्या हालचालीवर. पण तरीही मी तिला एक मेल पाठवली.

दिशा, तू जे कांही करत आहेस ते चांगले नाही. इट इज अ क्राईम. सूड घेणे तुला शोभत नाही. लर्न टू फरगेट अंड फरगिव्ह. लर्न टू इग्नोअर. बाकी जास्त कांही सांगत नाही. लवकर बरी हो.

या मेलचे उत्तर येण्याचा प्रश्नच नव्हता. 

आणखी दोन दिवस गेले. मी सभासद असलेल्या अनेक ग्रुप्समध्ये एक पोस्ट झळकली...

महावीर सांगलीकर ब्लॅकमेलड ऍन इनोसंट गर्ल ....

त्या पोस्टमध्ये मी मुंबईच्या एका निरपराध मुलीला ब्लॅकमेल केले असा आरोप होता. ही पोस्ट कोणा राजीव शहा नावाच्या व्यक्तीने पाठवली होती. राजीव शहा म्हणजे दिशाच असणार याचा मला अंदाज आला. त्या पोस्ट मध्ये माझ्याबद्दल बरीच खरी आणि खोटी माहिती दिली गेली होती. अर्थातच या पोस्टमुळे खळबळ उडाली. नाहीतरी मी माझ्या वेगळ्या विचारांमुळे ग्रुप्समध्ये तसा बदनामच होतो. माझ्या विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत पडले. कांही लोकांनी माझी बाजू घेतली. माझे स्पष्टीकरण आल्याशिवाय या पोस्टवर मत व्यक्त करणे चुकीचे आहे असे कांहीचे म्हणणे पडले. मी हे सगळे वीतराग भावाने बघत होतो. आपण आपली बाजू मांडावी की नाही याचा विचार करत होतो. शेवटी आपण लगेच उत्तर द्यायचे नाही असे ठरवले. बघुया काय डिस्कशन होते ते...

कांही मित्रांनी मला खाजगी इमेल पाठवून ‘हे खरे आहे काय? अशी विचारणा केली. माझी बाजू मांडण्याचा सल्ला दिला. तुझी कांही चूक नसेल तर आम्ही तुझ्या बाजूने उभे राहू असे आश्वासन दिले. मी त्याना प्लीज वेट एंड सी असे उत्तर दिले.

ग्रुप्समध्ये इतर सगळ्या चर्चा बाजूला पडून या विषयावरच चर्चा व्हायला लागल्या.

आणखी एक आठवड्याने ग्रुप्समध्ये आणखी एक पोस्ट झळकली. दिशा मुंबई गर्ल या नावाने अवतरली होती.... तिने टाकलेली पोस्ट अशी होती ...


मिस्टर सांगलीकर हॅरॅसड मी

‘दोन दिवसांपूर्वी या ग्रुपमध्ये महावीर सांगलीकर ब्लॅकमेलड ऍन इनोसंट गर्ल .... अशी एक बातमी आली आहे. त्यात उल्लेख केलेली ती दुर्दैवी, निरपराध मुलगी मीच आहे. सांगलीकर यांनी माझ्याशी प्रेमाचे नाटक केले... मग मला ब्लॅकमेल केले... सॉरी, मी माझे नाव उघड करू शकत नाही, पण मिस्टर सांगलीकर यांचे खरे स्वरूप काय आहे हे तुम्हा सर्वांना कळावे म्हणून मी ही पोस्ट लिहीत आहे. कदाचित ते इथे माझे नाव उघड करतील, पण मी ती रिस्क घेवूनच लिहीत आहे......

गेली दोन वर्षे मी अक्षरश: नरकात जगत आहे. सांगलीकर हे माझे दहा वर्षापूर्वीचे चांगले  पत्रमित्र होते... माझे दु:ख कोणातरी विश्वासू व्यक्तीला सांगावे म्हणून मी सांगलीकरांना इंटरनेटवरून शोधून काढले आणि त्यांना इमेल पाठवली. मग सुरवातीला ते माझ्याशी फारच सभ्य वागले, पण नंतर त्यांनी आपले खरे रूप दाखवायला सुरवात केली. ही व्यक्ति धोकादायक आहे असे लक्षात आल्यावर मी त्यांच्याशी संबंध तोडून टाकले. त्या आधी मी त्यांना माझ्या सगळ्या इमेल्स आणि माझे त्यांच्याकडे असलेले फोटो डिलीट करून टाकण्याची विनंती केली. पण त्यांनी आधी माझ्या कॉम्प्यूटरमधले त्यांचे फोटो डिलीट करावेत, त्यांच्या इमेल्स डिलीट करावयात असे सांगितले. त्यांनी माझ्या कॉम्प्युटरमध्ये ट्रोजन व्हायरस घुसवलाय हे नक्की...

मी सुंदर नाही, बुद्धिमान नाही, श्रीमंतही नाही, तरीही सांगलीकर यांनी माझ्यावर प्रेम का करावे बरे? माझ्याशी लग्न करण्याची इच्छा त्यांनी का धरली? माझे कांही त्यांच्यावर प्रेम नव्हते, मी त्यांना तसे अनेकदा सांगितले देखील. एकदा तर मी त्यांना म्हणाले, जगातील सगळे पुरुष जरी मेले, आणि तुम्ही एकटे उरलात, तरी सुद्धा मी तुमच्याशी लग्न करणार नाही. पण ते माझा पिच्छा सोडेनात. त्यांना कांही करून माझी भेट घेण्याची इच्छा होती. त्यांनी मुंबईला येवून माझ्या घराभोवती चकराही मारल्या...

त्यांनी स्वत:बद्दल कधीच कांही सांगितले नाही.... मला माझ्याबद्दल कांहीच विचारले नाही.  दिवसभर नुसते चॅटिंग ......  ते मला रोज रात्री फोन करायचे.. दोन दोन तास बोलायचे. ते अजूनही मला रोज फोन करून त्रास देतात..

हे सगळं मी का लिहित आहे? तर मी सांगलीकर यांच्यापासून सगळ्यांना सावध करण्यासाठी  लिहित आहे. न जाणो उद्या माझ्यासारखी आणखी एखादी निरपराध मुलगी सांगलीकरांच्या उद्योगांना बळी पडायची..

प्लीज हेल्प मी टू गेट रीड ऑफ धिस मॅन... प्लीज हेल्प मी टू डिलीट माय फोटो फ्रॉम हिज कॉम्प्यूटर... प्लीज फॉरवर्ड धिस मेल टू ऑल युवर फ्रेंड्स...

मिस्टर सांगलीकर यांनाही मदत करा... त्यांना मानसोपचाराची गरज आहे... –मुंबई गर्ल’

ओव्हरस्मार्ट गर्ल.... एवढा खोटारडे पणा?

तिच्या या पोस्टचे आपण लगेच उत्तर द्यावे का? नकोच... थांबू आणखी दोन दिवस... बघू ग्रुप्समध्ये आणखी काय गोंधळ होतोय ते... त्या आधी आपण दिशाशीच फोनवर बोलून घ्यावे... जाब विचारावा... बोलेल का ती? प्रयत्न करायला काय हरकत आहे.....

संध्याकाळी बरोबर सात वाजता मी तिला फोन लावला.
‘बोलिये मिस्टर सांगलीकर..’
‘हाऊ आर यु दिशा?
‘आधी तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात?’
‘जशी तू तसा मी... तू आनंदात असशील तर मीही आनंदात आहे असे समज’
‘तुम्ही मला परत फोन का केलात?’
‘तू तशी परिस्थिती निर्माण केलीस म्हणून.. तुला बोलायचे नसेल तर मी फोन ठेवतो’ मी जरा नाराजीच्या स्वरात म्हणालो
‘वेट... तुम्हाला काय सांगायचे आहे ते सांगा’
‘दिशा, हे तू काय चालवले आहेस? तुला याच्यातनं काय आनंद मिळतो?’
‘हे मी आनंद मिळवण्यासाठी नाही करत. तुम्ही माझ्याशी जे वागलात त्याची ही शिक्षा आहे’
‘शिक्षा? असली कसली शिक्षा.... आणि एका गुन्ह्याबद्दल कितीदा शिक्षा करणार आहेस तू?’
‘जोपर्यंत माझे समाधान होत नाही तोपर्यंत...’
‘ओके... कर तुला काय करायचे आहे ते. आता मी ग्रुप्समध्ये कन्फेशन देणार आहे. दोन दिवसात मी माझी बाजू मांडेन.  डोन्ट वरी, आय विल नॉट रिव्हील युअर आयडेंटीटी’
‘हे तुम्ही मला का सांगत आहात... आय डोन्ट केअर इफ यू  रिव्हील माय आयडेंटीटी’
‘मला माहीत आहे, तू कोण आहेस हे माझ्याकडून जाहीर व्हावं अशी तुझी इच्छा आहे. म्हणजे मग तू मला कायदेशीररीत्या अडकवू शकशील. किंवा मग मी तुझ्यावर अपार प्रेम करतोय हे सगळ्यांना कळावं असं तुला वाटते...’
मी असे म्हंटल्यावर दिशा मुसमुसून रडायला लागली.. मग तिच्या रडण्याचा आवाज वाढत गेला... तिने अक्षरश: भोकाड पसरून रडायला सुरवात केली...
‘यु हॅव डिस्ट्रॉयड मी... बाय युवर स्ट्रेंज लव्ह’ दिशा रडत रडतच म्हणाली. मग जोरात ओरडली, ‘आय विल किल यू... देअर इज नो मर्सी फॉर यू’
‘दिशा, शांत हो.... आय एम सॉरी फॉर माय हार्श बिहॅविअर ’
हळू हळू तिचे रडणे थांबले.
‘दिशा, आठवते तुला चॅटिंग करताना मी खोटं बोललो की लगेच तू मला पकडायचीस? आज
मी तुझं खोटं बोलणं पकडलंय’
‘मी कुठं खोटं बोलले?’
‘ग्रुप्समध्ये तू लिहिलं आहेस की तू सुंदर नाहीस, हुशार नाहीस, श्रीमंत नाहीस.. तू श्रीमंत आहेस की नाहीस याच्याशी मला कांहीच देणे घेणे नाही. पण तू सुंदर आहेस. हुशार आहेस. तू स्वत:ला कमी समजू नकोस. निदान याबाबतीत तरी’
‘थॅंक यू फॉर द कॉम्प्लिमेंट्स’
‘ओके, टेक केअर, बाय’
‘प्लीज वेट...’
मग दिशा तासभर माझ्याशी बोलत राहिली.

दुस-या दिवशी मी सायबर कॅफेत जावून ग्रुप्समध्ये काय चाललंय ते बघू लागलो. त्या
मुंबई गर्लची एक नवीन पोस्ट दिसली....

हाऊ धिस म्यान डेअर्स टू मेक अ फोन कॉल टू मी?
काल संध्याकाळी मिस्टर सांगलीकर यांनी मला फोन कॉल केला. त्यांचा आवाज ऐकून मी लगेच फोन कट केला. पण त्यांनी मला पुन्हा फोन केला. हाऊ धिस मॅन डेअर्स टू मेक अ फोन कॉल टू मी? सेव्ह मी फ्रॉम धिस डेंजरस मॅन ... प्लीज.... प्लीज सेव्ह मी...’

तिच्या या पोस्टवर बरेच डिस्कशन चालू होते. मी उत्तर द्यावे म्हणून माझ्यावर दबाव वाढत होता. मग मी एक छोटीशी पोस्ट टाकली...

आय एम गोइंग टू कन्फेस...
हे मुंबई गर्ल... यस्टरडे आय टोल्ड यु दॅट आय एम गोइंग टू कन्फेस... कान्ट यु वेट?
फ्रेंड्स, मी माझी बाजू उद्या मांडत आहे. तोपर्यंत तुम्ही या प्रकरणावर आपली मते बनवू नका. प्लीज...


मग मी सायबरकॅफेतून बाहेर आलो. दिशाला परत फोन करणे म्हणजे मूर्खपणाच होता. बहुतेक तिचे मानसिक संतुलन बिघडलंय.

चूक आपलीच आहे... तिला आपल्याकडून आणखी त्रास व्हायला नको. असं मस्त कन्फेशन लेटर लिहू की आपली बाजूही मांडली जाईल आणि दिशाचेही समाधान होईल.


पुढे चालू:

 या कथेचे आधीचे भाग:

शनिवार, २६ एप्रिल, २०१४

दिशाचं वेगळं रूप

-महावीर सांगलीकर 

दिशानं सांगितलेल्या या कथेमुळं मला कांही गोष्टींचा उलगडा झाला, पण तो तिला आपण आत्ताच सांगायचा नाही असे मी ठरवलं होतं. त्याऐवजी तिच्याकडून आणखी कांही माहिती मिळते का ते मी पाहू लागलो.

‘दिशा, मला एक सांग की तुझ्या पहिल्या जन्मात एवढ्या घटना घडल्या, तुला त्यांच्या तिथ्या आठवतात का?’ मी विचारलं.
‘माझा जन्म गुढी पाडव्याला झाला होता’
 ‘गुढी पाडवा... म्हणजे चैत्र शुक्ल प्रथमा.. वर्षाचा पहिला दिवस .....म्हणजे पहिल्या जन्मात देखील तुझा बर्थ नंबर 1 हाच होता, आत्तासारखाच...... इंटरेस्टिंग... आणि शक्तीसिंहाची जन्मतिथी?’
‘चैत्र शुक्ल त्रयोदशी..’
‘म्हणजे 13, बर्थ नंबर 4... कमाल आहे.. माझा बर्थ नंबर देखील चारच आहे. आणि हे काय, चैत्र शुक्ल त्रयोदशीला महावीर जयंती असते. शक्तीसिंहाचा जन्म महावीर जयंतीला झाला होता?’
‘होय..’
‘आश्चर्य आहे...’
‘मला आणखी कांही तिथ्या आठवतात... मी शक्तीसिंहाला शिकार केल्याबद्दल अटक केली तो दिवस, त्याला अटी घालण्यासाठी भेटले तो दिवस आणि त्याच्याशी लग्न केले तो दिवस या तिन्ही दिवशी चतुर्थी होती..’
‘चतुर्थी.. म्हणजे परत नंबर 4... क्या बात है... हा नंबर प्रत्येक जन्मात तुझा पाठलाग करतोय असं दिसतं... ’
‘मला उलटं वाटतं. मीच या नंबरचा पाठलाग करत आले आहे...जन्मोजन्मी’
‘तुला आणखी कोणता जन्म आठवतो?’
‘आत्तापर्यंतचे सगळेच जन्म आठवतात’
‘मग अलीकडचा एखादा जन्म सांग थोडक्यात’.
‘आता बास झालं. आज आपण दुसरं कांही तरी बोलू...’
‘????’
‘मला एखादा विनोद सांगा बघू...’
‘आधी तू सांग....’
‘ओके.... तुम्हाला तो हत्ती आणि मुंगीचा जोक माहीत आहे का?’
‘कोणता?’
‘एक हत्ती होता आणि एक मुंगी होती....’
‘हां, ऐकल्यासारखं वाटतंय... तोच ना तो ज्यात  हत्तीचा अपघात होतो आणि मुंगी हत्तीसाठी रक्तदान करते...?’
‘तो नाही... एका हत्तीचं आणि मुंगीचं  प्रेम होतं. त्यांना लग्न करायचं होतं, पण मुंगीच्या आई-वडिलांनी नकार दिला’
‘हे आई-वडील पण ना....  पण कारण काय नकार देण्याचं? हत्तीसाठी मुलीला खूप स्वयपाक करावा लागंल म्हणून? की इंटरकास्ट नको म्हणून? खि खि खि खि..’
‘नाही हो, त्या हत्तीचे दोन दात पुढं आले होते म्हणून...’
‘हत तिच्या, काय पण पीजे सांगतेस... आत्ता मी पण तुला एक पीजे सांगतो’
‘ओके, सांगा..’
‘तुला पेरू माहीत आहे?’
‘हो, मला आवडतो खायला’
‘तो पेरू नव्हे, पेरू नावाचा देश..’
‘हो, माहितेय... दक्षिण अमेरिकेत आहे...’
‘हां, तोच तो.. तर त्या पेरूमधले लोक फार चिक्कू आहेत’
‘हाहाहाहा....काय पण जोक... पेरूचा एक पीजे मला पण माहीत आहे ..’
‘सांग की मग..’
‘ब्राझीलच्या एका फूटबॉल खेळाडूनं पेरूमधल्या एका मुलीशी लग्न केलं... तर लोक त्याला नावं ठेवायला लागले.... काय येडा आहे, एका 'पेरूवाली'शी त्यानं लग्न केलं म्हणून’
‘खिखिखिखि.... हसलो...पुढं....?’
‘पुढं तुम्हीच एखादा जोक सांगा...’
‘ओके... एक रेडा होता आणि एक गाय होती... त्या रेड्याला ती गाय आवडत असे. एक दिवस तो तिला म्हणाला, विल यु मॅरी मी? तर ती गाय म्हणाली, आय एम नॉट रेडी’
‘‘ही ही ही ही.. ओके, आता मी एक जोक सांगते...’
‘सांग’
‘एक आळशी तरूण असतो. तो त्याच्या रूमवर दुपारच्या वेळी झोपलेला असतो. तेवढ्यात त्याच्या दारावर ‘टक टक’ असा आवाज येतो. तो तरुण ओरडतो, कोण आहे? बाहेरून आवाज येतो, ‘आय एम ऑंपोरच्युनिटी’ तर तो तरुण ओरडतो, ‘यु कान्ट बी, बिकॉज ऑंपोरच्युनिटी नॉक्स ओन्ली वन्स’
‘हा हा हा.. हा जोक मला उद्देशून बनवलास वाटतं? तू म्हणजे ऑंपोरच्युनिटी वाटतं?’
‘मे बी...’

‘अच्छा, जाने दो... एक शेर सुनाऊ?’
‘जरूर...’
‘अर्ज है.... तुम्हे देखकर मुझे चांद की याद आती है... उसपर भी जो दाग है...’
‘वाह वाह... वाह वाह... पण हे मला उद्देशून होते काय?’
‘मी कुठं तुला प्रत्यक्षात बघितलंय? मग तुला उद्देशून कसं असेल? आणि तुझ्या चेहऱ्यावर खरंच डाग आहेत काय?’
‘मिस्टर महावीर, तुम्ही भेटाच एकदा मला... मग कळंल तुम्हाला माझा चेहरा चंद्रासारखा आहे की शुक्रासारखा...’
 ‘बरं, ते जाउदे....मला एका मराठी वाक्याचे हिंदी भाषांतर जमेना झालंय... तू करून देशील का...?’
‘देईन की.. त्यात काय एवढं? ... काय वाक्य आहे?’
‘वाक्य आहे, मला पाठवले नाही’
‘त्यात काय अवघड आहे... मुझे भेजा नहीं’
‘तुझे भेजा नही? खरंच? मी तर तुला जिनिअस समजत होतो... तूही समजतेस. पण तू स्वत:च म्हणतेस तुझे भेजा नहीं म्हणून...’
‘हसू की रडू...?’
‘रडू नकोस, यु शुड अॅक्सेप्ट द फॅक्ट’
‘ओ मिस्टर महावीर, तुम्ही काय मला खरेच बुद्धू समजता काय?’
‘तूच म्हणालीस की तुझे भेजा नहीं म्हणून..’ 
‘इट इज इनफ... लहान आहे म्हणून मी तुमचं कांहीही ऐकून घ्यायचंकाय..?’
‘रागावलीस?’
‘.......’
‘????’
‘.......’
 ‘ए, हस ना...’
‘बाय बाय..’
‘दिशा.... जाऊ नकोस, थांब’
पण दिशाचं उत्तर नाही.. ती मेसेंजरमधनं लॉग आउट झाली.
माझ्या छातीत धस्स झालं..
आता काय करावं.... मला कांही सुचंना.
मग वाटले, टेलेफोन बूथ मध्ये जाऊन तिला फोन करावा.
मी लॉग आउट होणारच होतो, इतक्यात दिशा परत आली..
‘हाय मिस्टर महावीर....’
‘हाय..’
‘लिसन... टेक धिस सिरीअसली. नेव्हर हर्ट मी. इफ यु डू इट अगेन, यु विल बी नो व्हेअर’
‘चक्क धमकी?’
‘ही धमकी नाही.. धिस इस युवर फेट.. आणि तुमच्याबरोबर मलाही त्रास होईल...  मिस्टर न्यूमरॉलॉजीस्ट, यू नो व्हाट हॅपन्स इफ समवन चॅलेंजेस बर्थ नंबर वन पर्सन..’
तिचं शेवटचे वाक्य वाचून मी चमकलो. न्यूमरॉलॉजीनुसार विचार केला तर दिशा मला बरबाद करू शकते हे मला लक्षात आले.
‘दिशा, हे तू काय म्हणतेस... आणि आय वाज जस्ट किडिंग.. तुला दुखवायचा माझा हेतू नव्हता’
‘हेतू कांहीही असो, पण तुम्ही मला दुखवलं आहे...’
‘आय फील वेरी सॉरी फॉर दॅट... एक सांग, मला तुझी चेष्टा करण्याचा अधिकार आहे की नाही?’
‘आहे... पण जरा जपून... माझ्या बुद्धीची चेष्टा केली तर मला ती सहन होत नाही. तो अधिकार मी तुम्हालाही दिलेला नाही... अजून तरी...’
‘बरं बाई, चुकलो. मी पुन्हा तुझ्या बुद्धीची चेष्टा करणार नाही. वेडे, तू बुद्धीमान आहेस म्हणून तर मला आवडतेस. हे तुला चांगलेच माहीत आहे’
‘बाय फॉर नाऊ... टेक केअर’ असे म्हणून ती पुन्हा गायब झाली.

संध्याकाळी सात वाजता मी तिच्या मोबाईलवर फोन केला. तिनं तो उचलला नाही. दोन तीन वेळा ट्राय केले. नो अन्स्वेर. मग तिच्या लॅंडलाईन वर फोन केला.

‘हॅलो’
‘व्हू इज इट?’ तिकडून दुसऱ्याच कुणा मुलीचा आवाज आला.
‘महावीर हिअर. मे आय स्पीक टू दिशा?’
‘ओह.. तो आप महावीर हैं...’
‘येस... क्या मैं जान सकता हूं आप कौन बात कर रही हो?’
‘मैं निशा... दिशा की छोटी बहन..’
‘ग्लॅड टू मीट यू... दिशा कहां हैं?’
‘दोपहर से उसका मूड ऑफ है. सो रही है’
‘क्या हुआ? उसने कुछ बताया?’
‘कहती है सर में दर्द हैं... बाकी आप ही जाने’
‘ठीक है.. प्लीज उसे कह देना कि मेरा फोन आया था’
‘कह दूंगी...’
‘थॅन्क्स’
‘एक रिक्वेस्ट है..’
‘क्या?’
‘प्लीज डोन्ट हर्ट हर’
‘ओके, आय विल टेक केअर’
‘और उसे हमेशा खुश रखने की कोशीश कीजिये’
‘करूंगा... लेकीन एक बात बताओ, उसे कोई प्रॉब्लेम तो नहीं?’
‘बिलकुल नहीं....’ 
‘मुझे तो कभी कभी उससे डर लगता है’
‘डरने की कोई बात नहीं है’


पुढचे दोन दिवस मी मेसेंजरमध्ये लॉग इनच झालो नाही, दिशाला फोनही केला नाही. तिस-या दिवशी मी लॉग इन झालो तर ती तेथे आधीच आली होती. मी ठरवलं, आपणहून आधी तिला मेसेज पाठवायचा नाही, ती काय बोलते ते बघू.

‘या या या... तुमचीच वाट बघत होते... कुठं गायब झाला होता हो दोन दिवस?’ दिशा म्हणाली. ती रागात होती. आता हिला कांहीतरी थाप मारायला पाहिजे. काय सांगावं बरं? हां....
‘दिशा, माझं डोकं दुखत होतं... अजूनही दुखतंय ... दोन दिवस माझा मूड ऑफ होता..’
‘मिस्टर थापा, खोटं बोलू नका.. आणि मूड ऑफ व्हायचं कारण काय?’
‘तू माझ्यावर रागावली होतीस ना, म्हणून..’
‘मग मी तुमच्यावर रागवायचं नाही का? ’
‘मी तसं कधी म्हणालो... मला वाटतं इथून पुढं तू म्हणशील तसं सगळं मला करावं लागणार आहे’
‘गुड बॉय’
‘जी मॅडम’
‘संध्याकाळी फोन करा..’
‘जी मॅडम’
‘आणि खरंच डोकं दुखत असेल तर विश्रांती घ्या जरा.. टेक केअर, बाय...’
‘बाय दिशा’
सुटलो एकदाचा... आज लगेच सोडून दिलं तिनं... पण तिच्यापासून कायमची सुटका कशी करून घ्यायची? तिला दुखवायचे तर नाही.... दुखावले तर आपलं काय खरं नाय बाबा... पण आधी दिशा ही काय भानगड आहे याचा छडा लावायलाच पाहिजे..... आता तिच्या आणखी एखाद्या जन्माची माहिती तिच्याकडून काढून घेवून मग कामाला लागू...

पुढे चालू:


या दीर्घ कथेचे आधीचे भाग

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा