Advt.

Advt.

सोमवार, १ सप्टेंबर, २०१४

रावन्ना-2ची सुटका

-महावीर सांगलीकर 

कोलंबोवरून चेन्नईला जाणारे विमान रावन्ना-2 च्या साथीदारांनी पळवले. त्यानंतर त्यांनी विमानाच्या आणि प्रवाशांच्या बदल्यात रावन्नाच्या सुटकेची आणि बी. भीषन्ना आणि विजया जयसिंहाला ताब्यात देण्याची मागणी केली. त्यानंतर घडलेल्या विचित्र घडामोडी.....

श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आणि भारताच्या पंतप्रधानांचे हॉटलाईनवर बोलणे झाले. कांही निर्णय घेण्यात आले. त्यानंतर रॉचा एक अधिकारी तातडीने दिल्लीवरून कोलंबोला रवाना झाला.

तिकडे कोलंबोतही श्रीलंकेच्या गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलीस अधिका-यांची एक गुप्त मीटिंग झाली. या बैठकीला ए.एस.पी. विजया जयसिंहा देखील हजजार होती. त्या बैठकीत पोलीस अधिका-यांनी आपापली मते मांडली. रावन्ना-2 चा रिमांड काढून त्याच्याकडून विमान कोठे आहे याची माहिती मिळवता येईल असे मत एका अधिका-याने मांडले. त्याला सगळ्याच अधिका-यांनी दुजोरा दिला. पण गृहमंत्र्यांनी विमानातील प्रवासी हे महत्वाचे असून आपण रावन्ना-2ला लगेच सोडले नाही तर प्रवाशांना दगाफटका होऊ शकतो असे मत मांडले. त्यांच्या सुटकेसाठी हायजॅकर्सच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागतील असे सांगितले. या गोष्टीला कांही अधिका-यांनी पाठिंबा दिला तर काहींनी  विरोध केला. विरोध करणा-या अधिका-यांना गृहमंत्री म्हणाले, ‘रावन्ना-2ला आपण परत पकडू शकू. पण सध्या प्रवाशांना वाचवणे हे महत्वाचे आहे. शिवाय आपल्या राष्ट्राध्यक्षांचे आणि भारताच्या पंतप्रधानांचे मतही हायजॅकर्सच्या मागण्या मान्य करून प्रवाशांची सुटका करावी असेच आहे’

त्यावर  ए.एस.पी. विजया जयसिंहा म्हणाली, ‘सर, ही  माझ्यासाठी एक फार मोठी संधी आहे. मी रावन्ना-2 बरोबर तो नेईल तिथं जायला तयार आहे, अगदी आनंदाने. आणि मी तुम्हाला वचन देते सर, प्रवाशांची सुटका झाल्यावर मी त्याला परत कोलंबोच्या तुरुंगापर्यंत फरफटत आणेन’

मीटिंग संपताच रावन्ना-2च्या सुटकेची तयारी झाली. कोलंबोच्या विमानतळावर त्याच्यासाठी एक हेलीकॉप्टर सज्ज ठेवण्यात आले होते. रावन्ना-2चा भाऊ बी. भीषन्नाला सगळी कल्पना देण्यात आली आणि त्याला बोलावून घेण्यात आले.  ए.एस.पी.विजया जयसिंहा आणि बी. भीषन्ना दोघेही विमानतळावर हजर झाले. रावन्ना-2ही आला. तिथं तो पोलीस कमिशनरला म्हणाला, ‘मी माझे स्वत:चे हेलीकॉप्टर आणि माझा पायलट घेवून जाणार आहे’. रावन्ना-2  अशी मागणी करणार याची कमीशनरला शंका होतीच, आणि ती मागणी मान्य करण्यावाचून दुसरा कांही ऑप्शनही नव्हता. एवढ्यात आकाशातून एक हेलीकॉप्टर आले. ते रावन्ना-2चे होते. त्याला विमानतळावर उतरण्याची परवानगी देण्यात आली. हेलीकॉप्टर खाली उतरताच रावन्ना-2  तिकडे चालला. त्याच्यामागोमाग ए.एस.पी. विजया जयसिंहा आणि बी. भीषन्ना हेही निघाले. सगळेजण हेलीकॉप्टरमध्ये जाऊन बसले. हेलीकॉप्टरची पायलट एक महिला होती. तिने बुरखा घातला होता, आणि त्यावर काळा गॉगल घातला होता, त्यामुळे तिचा चेहरा तर राहोच, डोळेही दिसत नव्हते. विजया जय सिंहाला तिला कुठेतरी बघितल्यासारखे वाटले. मग आठवले, ती पायलट अफगाणिस्तानातल्या गांधारीसारखी दिसत होती.

हेलीकॉप्टर उड्डाण केले आणि त्यात बसलेल्या आणखी दोघा इसमांनी ए.एस.पी. विजया जयसिंहा आणि बी. भीषन्ना यांची झडती घेतली. बी. भीषन्नाकडे घड्याळ सोडता कांहीच सापडले नाही. ते काढून घेण्यात आले.  विजया जयसिंहाकडे वॉकीटॉकी, कॅमेरा या वस्तू सापडल्या. त्या  काढून घेण्यात आल्या. तिच्या हातातले घड्याळही काढून घेण्यात आले.

थोड्याच वेळात ते हेलीकॉप्टर मेन लॅंड सोडून समुद्रावरून पुढे जाऊ लागले. त्या दोन इसमांनी झडती घेऊन काढून घेतलेल्या वस्तू हेलीकॉप्टरच्या बाहेर भिरकावून टाकल्या.

मग बी. भीषन्ना आणि विजया जयसिंहा यांच्या डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधण्यात आल्या.

बराच वेळ झाला. विजया जयसिंहा बोअर झाली होती. तिने विचारले, ‘मिस्टर रावन्ना, हम कहां जा रहें हैं? और कितना टाईम लगेगा?’

‘कुछ बोल नहीं सकते. एक घंटा लग सकता है, या फिर एक दिन भी लग सकता है...हम घुमा फिराकर आपको ले जानेवाले है, ता कि आपको लोकेशन का पता न चले’ रावन्ना ने उत्तर दिले.

सुमारे दोन तास झाल्यावर त्या दोघांच्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढून घेण्यात आल्या. मग रावन्ना बी. भीषन्नाला म्हणाला,

‘मेरे भाय, तुम घरभेदी हो. तुमने मेरे साथ दगाबाजी की है. जानते हो इसकी सजा क्या है?’

बी. भीषन्नाने कांहीच उत्तर दिले नाही. मग रावन्ना त्या दोन इसमांकडे वळून म्हणाला, ‘इसे फेक दो हेलीकॉप्टर के बाहर’

त्या दोघांपैकी एकाने क्षणाचाही वेळ न घेता हेलीकॉप्टरचे दार उघडले. मग दोघांनी बी. भीषन्नाला उचलले आणि सरळ बाहेर फेकून दिले. विजया जयसिंहा आश्चर्याने बघतच राहिली.  मग नाराज होत म्हणाली,

‘मिस्टर रावन्ना, यह आपने ठीक नही किया. अपने सगे भाई को समुंदर में फेक दिया.... आय कांट बिलिव्ह इट’

‘हाहाहाहाहा...हाहाहाहाहा...’ रावन्ना गडगडाटी हसत म्हणाला, ‘इसकी जगह अगर मेरा बाप भी होता, तो उसके साथ भी मैं यही करता... और तुम तो मेरी कोई सगी नहीं हो... सो तुम्हारे साथ भी मैं यही करनेवाला हूं’
मग त्याने त्या दोन इसमांना हुकूम दिला, ‘फेक दो इसे भी बाहर’

‘लेकिन सर, यह औरत है, इसे हम हात नहीं लगा सकते.... आपही का हुक्म है, किसी परायी औरत को हात नहीं लगाना...’

‘ठीक है, किसी और तरीके से इसे बाहर धकेलना होगा....’ असे म्हणत रावन्नाने आपले पिस्तूल बाहेर काढले. विजया जयसिंहाला ते दाखवत तो म्हणाला, ’चलो, खडी हो जाओ’

विजया उठून उभी राहिली.

‘अब दरवाजे के पास जाओ’

ती दरवाजा जवळ जाऊन उभी राहिली.

‘अब नीचे कूद जाओ’

विजयाला खाली उडी मारण्याचे धाडस झाले नाही.

‘मैं ने कहा ना, कूद जाओ... मैं तीन तक गिनुंगा.. उसके आगे गिनने के लिये मेरे पास टाईम नहीं है... तब तक अगर तू नही कुदी तो यहां से गोली छुटेगी.... एक... दो....’

रावन्नाने तीन म्हणायच्या आतच विजयाने हेलीकॉप्टरच्या बाहेर उडी मारली. कांही वेळातच ती समुद्रात कोसळली.

+++

तिकडे बेटावरचे प्रवाशी दोन-तीन दिवसातच बोअर झाले होते. बाहेरच्या जगाशी कसलाही संपर्क नाही... मोबाईल फोन चालत नव्हते, इंटरनेट चालत नव्हते... टी.व्ही., बातम्या फेसबुक आणि व्हाट’स अॅप शिवाय माणूस किती दिवस तग धरू शकणार?

चौथ्या दिवशीची गोष्ट.

‘हमारे पास एक रेडियो होता था तो अच्छा होता था..’ हनमंत राव रामप्रसादला म्हणाला.

‘है... मेरे पास रेडियो है....,’ रामप्रसाद म्हणाला, ‘कोलंबो एअर पोर्ट पर सीता ने एक चायनीज रेडीओ पसंद किया था. लेकिन उस पर चायनीज प्रोग्राम सुनायी नहीं दे रहे थे. इसलिये उसने वह रेडियो खरीदा नही. मैं ने सोचा शायद इंडिया में चायनीज प्रोग्राम सुनायी देंगे... क्यों की चायना पडोस में है ना इंडिया के...  इसलिये मैं ने उसे बिना बताये चुपके से वह रेडियो खरीद लिया. पूना पहुंच ने के बाद मैं वह रेडियो सीता को प्रेसेंत देनेवाला हूं.. सरप्राईझ गिफ्ट’

‘यह आपने बहुत ही बढीया काम किया है... शायद पहली बार... अब एक काम कीजीये.. चुपके से वह रेडियो लेकर आईये... किसीकी नजर में आये बिना...और यहां आने के बाद वह रेडियो मुझे दिखाने की जल्दी मत करना. हम उस सामनेवाले पहाड पर जायेंगे...’

खरे म्हणजे त्या बेटावर आल्यावर पहिल्याच दिवशी हनमंत रावाने त्याच्या मोबाईल फोनवर रेडियो लावून बघितला होता, पण त्यावर कोणतेच रेडियो स्टेशन ऐकू आले नव्हते.

थोड्याच वेळात रामप्रसाद रेदिओ घेवून आला. मग ते दोघे लगेच समोरच्या टेकडीच्या दिशेने निघाले. अर्ध्या-पाऊन तासाने ते टेकडीच्या माथ्यावर पोहोचले. मग पलीकडच्या बाजूस थोडे खाली उतरले.

‘अब दिखाइये मुझे वह रेडियो’ हनमंत राव म्हणाला.

रामप्रसादने आपल्या शर्टच्या आत लपवून ठेवलेला तो रेडियो बाहेर काढला आणि हणमंत रावाकडे दिला. दहा बॅंडचा चायनीज रेडियो... हणमंतरावाने आधी एफ.एम. ब्यांड लावला. त्या बॅंडवर त्याला एकही रेडियो स्टेशन ऐकू आले नाही. हे त्याला अपेक्षितच होते. तो रामप्रसादला म्हणाला, ‘हमे एक भी एफ. एम. रेडियो स्टेशन सुनाई नही देता.... इसका मतलब यह  की हम मेनलॅड से बहोत दूर है. क्यों कि एफ.एम रेडियो स्टेशन के सिग्नल्स जादा दूर नहीं जाते है....’

मग त्याने मेडियम वेव्ह बॅंड लावला. त्यावरचा काटा हळू हळू फिरवून बघितला. त्यावर अस्पष्ट आवाजात कोलंबो रेडियो स्टेशन ऐकू येत होते. मालदीव मधले एक रेडियो स्टेशन ब-यापैकी ऐकू येत होते. केरळ मधले कोणतेच स्टेशन ऐकू येत नव्हते.  हणमंत रावाने लगेच निष्कर्ष काढला, हे बेट श्रीलंकेच्या नैऋत्येला आणि मालदीव पासून जवळ आहे. त्याआधी याला मिळता-जुळता निष्कर्ष त्याने सूर्याच्या उगवण्याची वेळ, आकाशातील विशिष्ट ग्रह-ता-यांचे लोकेशन्स यावरून काढला होताच.   

मग हनमंत रावाने शॉर्ट वेव्ह बॅंडवरची स्टेशने लावून बघितली. त्यावरची बरीच स्टेशने स्पष्ट ऐकू येत होती. त्याने बी.बी.सी. स्टेशन लावले. तिथे बातम्या चालू होत्या. त्यात कोलंबोहून चेन्नईला जाणारे विमान गायब होवून तीन दवस झाले तरी त्याचा अजून पता लागला नाही आणि भारत आणि श्रीलंका यांचे नौदल त्या विमानाचा शोध घेत असल्याची बातमीही सांगण्यात आली.

‘ठीक है’, हणमंत राव म्हणाला, ‘हमें यह रेडियो और ज्यादा दर तक नहीं सुनना चाहिये. नहीं तो सेल वीक हो जायेंगे’

त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत हणमंत रावाने त्या रेडियो पासून ट्रान्समीटर बनवला. त्यासाठी आवश्यक अशा स्क्रू ड्रायव्हर वगैरे वस्तू त्याच्या बॅगमध्ये होत्याच. मग तो दुस-या दिवशी सकाळी लवकर रामप्रसादला घेवून पुन्हा त्या टेकडीवर गेला. एका विशिष्ट फ्रीक्वेन्सीवर त्याने संदेश पाठवला... ‘द प्लेन इज हायजॅकड, नॉट डिसअॅपिअर्ड... ऑल पॅसेंजर्स आर सेफ... वुई आर ऑन अॅन अननोन आयलॅंड.. फार साउथ वेस्ट ऑफ कोलंबो, साउथ ऑफ मालदीव... एक्झॅक्ट लोकेशन इज नॉट नोन’

हा संदेश त्याने थोड्या थोड्या अंतराने ब-याच वेळा पाठवला. पुढचे अनेक दिवस असे संदेश तो पाठवतच राहिला. हा संदेश फारसा लांबवर जाणार नाही हेही त्याला माहीत होते. पण बेटाजवळून जाणा-या एखाद्या जहाजास तो संदेश कदाचित मिळेल असे हनमंत रावास वाटत होते. पण तसा तो कुणाला मिळाला की नाही हे कळायला कांहीच मार्ग नव्हता. 

....पुढे चालू


या कथेचे आधीचे भाग:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा