-महावीर सांगलीकर
कोलंबोवरून विमानाने उड्डाण केल्यावर ब-याच वेळाने रामप्रसाद आणि सीता यांच्या गप्पा संपल्या. एवढ्यात विमानातला एक प्रवाशी आपल्या जागेवरून उठला आणि समोरच्या बाजूला जाऊन प्रवाशांकडे तोंड करून उभा राहिला. त्याची पर्सनॅलिटी एखाद्या एक्झेक्यूटिव्हसारखी वाटत होती. सुटाबुटातल्या त्या मध्यमवयीन व्यक्तिचा चेहरा प्रसन्न, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण होता..
‘सायलेन्स प्लीज’, तो आपल्या भारदस्त आवाजात म्हणाला, ‘पॅसेंजर्स, प्लीज लिसन टू मी केअरफुली ’
सगळे प्रवाशी शांत झाले आणि कान टवकारून ऐकू लागले.
‘आप में से कितने लोगों को चेन्नई जाने की जल्दी है?’ असे विचारात तो एक्झेक्यूटिव्ह समोरच्या एका प्रवाशाकडे बोट करून म्हणाला, ‘आप बताइये भाई साहब... क्या आपको चेन्नई तुरंत जाना है?’
‘नहीं’, तो प्रवाशी म्हणाला.
‘वेल, तो आपको चेन्नई कब जाना है? और कितने दिनों तक आप चेन्नई नहीं गये तो कुछ फर्क नहीं पडता?’
‘दस दिन’
‘ओके’, असे म्हणत त्याने दुस-या एका प्रवाशाला तोच प्रश्न विचारला. त्या प्रवाशानेही सांगितले की तो दहा-बारा दिवस चेन्नईला गेला नाही तरी त्याला चालेल.
आणखी चारपाच प्रवाशांना त्याने तोच प्रश्न विचारला. सर्वांचे उत्तर साधारण सारखेच.
मग तो म्हणाला, ‘देखिये, अगर मैं सबको यह सवाल पुछता रहूंगा तो तब तक तो चेन्नई आ जायेंगी. तो ऐसा करते हैं, जिनको भी चेन्नई जाने की जल्दी है, वे सब अपना दाहीना हात उपर करें’
कांही प्रवाशांनी हात वर केले. त्याने ते मोजले आणि म्हणाला, ‘देखिये इन सात लोगों को चेन्नई जाने की जल्दी है’
मग त्यांच्यापैकी एकाला तो म्हणाला, ‘भाई साहब, आप बताइये, आपको इतनी भी क्या जल्दी है?’
‘मुझे मेरी बीबी से मिलना है...’
त्याचे हे उत्तर ऐकून प्रवाशांना हसू आले. तो एक्झेक्यूटिव्हही हसत म्हणाला,
‘देखिये, क्या अचरज की बात है. लोग तो अपनी बीबी से दूर भागते रहते है, और यह भाईसाहब है कि अपनी बीबी को मिलने के लिये तडप रहे हैं..’ मग तो त्या प्रवाशाला म्हणाला,’ ‘मान लीजिये कि आप चेन्नई टाईम पर नहीं पहुंचे, तो क्या कोई आपकी बीबी को किडनॅप करनेवाला है? या बुरा न मानिये, क्या वह किसी के साथ भाग जानेवाली है?’
‘अरे वह किधर भागेगी... ‘ तो प्रवाशी पुटपुटल्यासारखा म्हणाला.
‘जरा जोर से बोलिये, कुछ सुनाई नहीं दिया’ तो एक्झेक्यूटिव्ह म्हणाला.
‘मैं ने कहा, न वह भागेगी, न कोई उसे भगाकार ले जानेकी हिम्मत करेगा... नो चान्स’
प्रवाशांमध्ये आजू एकदा हास्याची लकेर उमटली.
मग तो सेल्समन दुस-या एका प्रवाशाकडे वळत म्हणाला, ‘भाई साहब, आपको क्या जल्दी है?’
‘मुझे मेरी गर्ल फ्रेंड से मिलना है’
‘आप एकदम यंग हैं. मुझे बताइये, थ्रिलिंग ट्रीप और गर्लफ्रेंड इन दो चीजों में से अगर एक चीज आपको चुननी है, तो आप कौनसी चीज चुनोगे?’
‘ऑफ कोर्स, थ्रिलिंग ट्रीप. लेकिन अच्छा होता अगर गर्ल फ्रेंड के साथ थ्रिलिंग ट्रीप का मौका मिलता’
‘यह मौका आपने खुद गवांया है. अगर आपकी गर्ल फ्रेंड भी अभी यहां होती तो गर्ल फ्रेंड के साथ थ्रिलिंग ट्रीप का मौका आपको मिल जाता था’
अशा रीतीने ज्यांना चेन्नईला जायची घाई होती त्या सगळ्यांना त्या एक्झेक्यूटिव्हने पटवले. पण त्याची नेमकी ऑफर काय होती हे कुणालाच कळले नव्हते. एवढ्यात तो म्हणाला, ‘देखिये, मैं अपना परिचय देना तो भूल ही गया. मेरा नाम है. हमारी कंपनी का नाम है ‘आर’ गॅंग. हमारी कंपनी का काम है हवाई जहाज को हायजॅक करना. यह हवाई जहाज हमने अभी अभी हायजॅक किया है और हम आप सब को एक सिक्रेट आयल्यांड पर ले जा रहे हैं’
त्याच्या या बोलण्याने प्रवाश्यांच्यात खळबळ उडाली.
‘सायलेन्स प्लीज’, तो म्हणाला, ‘कोई गडबड नहीं चाहिये. आप लोगों को डरने की कोई जरुरत नहीं है. जस्ट को-ऑपरेट अस. इसी में आप सब की भलाई है. और याद रखना, साहस या स्मार्टनेस दिखाने की कोशीश न करें. इस हवाई जहाज के पायलट भी हमारी ग्यांग के ही मेंबर हैं. इतना ही नही, आप पॅसेंजर लोगों में भी कई लोग असल में हमारी आर गॅंग के ही मेंबर हैं. हो सकता है आपके अगल-बगल में बैठा हुआ आदमी आर गॅंग का हो’
त्याचे शेवटचे वाक्य ऐकून सीता रामप्रसादकडे संशयाने बघू लागली, तर लखनप्रसादला हनमंत रावाचा किंचित संशय आला.
इकडे हणमंत रावाने विमान हायजॅक झाले आहे हे कधीच ओळखले होते. विमानाने मार्ग बदलला हे त्याच्या लक्षात आले होते, आणि तो एक्झेक्यूटिव्ह जेंव्हा पुढे उभा राहून बोलू लागला तेंव्हा हणमंत रावाची पक्की खात्रीच झाली होती. ही आर गॅंग म्हणजे रावन्ना2 ची हायजॅक विंग आहे ही गोष्ट हणमंत रावास माहीत होते. आपण आत्ताच कांही करायला गेलो तर ते अंगलट येईल हे त्याला माहीत असल्याने त्याने सध्या बघत राहायचे आणि योग्यवेळी कारवाई करायची असे ठरवले होते.
हिंदी महासागरातले एक बेट. हायजॅक झालेले ते विमान या बेटाजवळ आले, त्याने त्या बेटाला एक दोन वेळा फे-या घातल्या, आणि मग ते त्या बेटावरच्या सपाट पठारावर उतरले.
मग विमानातील प्रवाशांसाठी एक अनाउन्समेंट झाली..
‘प्रवाशांनी इकडे लक्ष द्यावे. तुम्हाला माहीत आहेच की हे विमान हायजॅक झाले आहे. आपण आताच हिंदी महासागरातल्या एका बेटावर उतरलो आहोत. आत्तापर्यंतच्या प्रवासात आम्ही तुम्हाला कसलाही त्रास दिलेला नाही. इथून पुढेही आमच्याकडून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या की आम्ही तुम्हाला सुखरूप सोडून देणार आहोत. किती दिवस लागतील हे सांगता येत नाही. ते वरच्यांच्या हातात आहे. वरच्यांच्या म्हणजे श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या आणि भारताच्या पंतप्रधानांच्या हातात. त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या की तुमची सुटका झालीच म्हणून समजा. तोपर्यंत तुम्ही या बेटावर सहलीचा आनंद घ्या. खा, प्या, मजा करा. खाण्यासाठी इथे फक्त फळे आहेत. पिण्यासाठी फक्त पाणी आहे. तुमच्या सामानात कांही खाद्यपदार्थ असतील तर ते तुम्ही खाऊ शकता. पण प्लॅस्टिक आणि कचरा कोठेही फेकून देऊ नका. तो जवळच्या कचरा पेटीतच टाका. तसेच या बेटावरच्या प्राण्यांना आणि पक्षांना त्रास देऊ नका, झाडांची पाने, फुले तोडू नका. या नियमाचा भंग करणा-यांना आम्ही येथेच सोडून जाऊ...
माफ करा, इथे मोबाईल फोन आणि इंटरनेट या गोष्टी चालत नाहीत. हे बेट नेमके कोठे आहे हे आमच्या ठराविक लोकांना सोडून कुणालाच माहीत नाही. या बेटाच्या आजूबाजूला शेकडो किलोमीटर पर्यंत केवळ समुद्रच आहे. त्यामुळे कोणाच्या मनात पळून जाण्याचा विचार आला तर त्याचा कांही उपयोग होणार नाही. सो जस्ट एन्जॉय युअर स्टे ऑन धिस आयलॅंड. निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक जीवन जगण्याचा अनुभव घ्या. पण ज्यादा नैसर्गिक बनू नका...’
मग प्रवाशांना विमानातून उतरण्याची सूचना करण्यात आली. सगळे प्रवासी उतरल्यावर ते विमान त्या बेटावरच्या एका भुयारात शिरले.
त्या बेटावरचे निसर्ग सौंदर्य बघून प्रवाशांनी आपापल्या तोंडात बोटे घातले. गर्द हिरवी झाडी, टेकड्या, एका उंच टेकडीवरून धो-धो कोसळणारा धबधबा, त्याचे एका छोट्या नदीत झालेले रुपांतर, निळसर हिरवा समुद्र, समुद्राला जाऊन मिळणारी ती नदी, निळेभोर आकाश.... असे निसर्गसौंदर्य बॉलीवूडच्या काय, हॉलीवूडच्या सिनेमातसुद्धा बघायला मिळत नाही असे मत अनेक प्रवाशांनी मांडले.
रामप्रसादने हनमंत रावास विचारले, ‘एक बात मेरी समझ में नहीं आ रही है... बाकी सब ठीक है, लेकिन हम सोयेंगे कहां?’
‘आसमां के नीचे..’ त्यांचे बोलणे ऐकत असलेला एकजण म्हणाला, ‘आसमां के नीचे सोना है, पेड के फल खाने है और नदी में नहाना हैं...’
‘आप कौन है? आप यह सब बातें कैसे जानते हैं? आप भी आर गॅंग से है क्या?’ रामप्रसादने त्याला विचारले.
‘नहीं.... मैं भी आपकी तर ही एक पॅसेंजर हूं. पहले भी एक बार आया था मैं यहां... इसलिये यह सारी बाते जानता हूं’
‘तो उस टाईम भी हवाई जहाज हायजॅक हो गया था?’
‘जी नहीं. वह हवाई जहाज नहीं था, पानी का जहाज था...’
‘क्या आप बता सकते है कि यह आयलॅंड एक्झाक्टली कहां है?’
‘मैं नहीं जानता. जानकर कुछ फायदा भी नहीं. हम यहां से भाग नहीं सकते हैं, और ना ही बाहर कोई मेसेज भेज सकते हैं. चिंता मत कीजीये, वे लोग हमें तकलीफ नहीं देते. हमें इस अनोखी सफर का आनंद लेना चाहिये. चिंता छोडो, एन्जॉय करो’
पुढे चालू......
या कथेचे आधीचे भाग:
- भाग 1: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह
- भाग 2: डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव
- भाग 3: मिशन असोका गार्डन
- भाग 4: कोलंबो टू चेन्नई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा