Advt.

Advt.

Saturday, April 26, 2014

दिशाचं वेगळं रूप

-महावीर सांगलीकर 

दिशानं सांगितलेल्या या कथेमुळं मला कांही गोष्टींचा उलगडा झाला, पण तो तिला आपण आत्ताच सांगायचा नाही असे मी ठरवलं होतं. त्याऐवजी तिच्याकडून आणखी कांही माहिती मिळते का ते मी पाहू लागलो.

‘दिशा, मला एक सांग की तुझ्या पहिल्या जन्मात एवढ्या घटना घडल्या, तुला त्यांच्या तिथ्या आठवतात का?’ मी विचारलं.
‘माझा जन्म गुढी पाडव्याला झाला होता’
 ‘गुढी पाडवा... म्हणजे चैत्र शुक्ल प्रथमा.. वर्षाचा पहिला दिवस .....म्हणजे पहिल्या जन्मात देखील तुझा बर्थ नंबर 1 हाच होता, आत्तासारखाच...... इंटरेस्टिंग... आणि शक्तीसिंहाची जन्मतिथी?’
‘चैत्र शुक्ल त्रयोदशी..’
‘म्हणजे 13, बर्थ नंबर 4... कमाल आहे.. माझा बर्थ नंबर देखील चारच आहे. आणि हे काय, चैत्र शुक्ल त्रयोदशीला महावीर जयंती असते. शक्तीसिंहाचा जन्म महावीर जयंतीला झाला होता?’
‘होय..’
‘आश्चर्य आहे...’
‘मला आणखी कांही तिथ्या आठवतात... मी शक्तीसिंहाला शिकार केल्याबद्दल अटक केली तो दिवस, त्याला अटी घालण्यासाठी भेटले तो दिवस आणि त्याच्याशी लग्न केले तो दिवस या तिन्ही दिवशी चतुर्थी होती..’
‘चतुर्थी.. म्हणजे परत नंबर 4... क्या बात है... हा नंबर प्रत्येक जन्मात तुझा पाठलाग करतोय असं दिसतं... ’
‘मला उलटं वाटतं. मीच या नंबरचा पाठलाग करत आले आहे...जन्मोजन्मी’
‘तुला आणखी कोणता जन्म आठवतो?’
‘आत्तापर्यंतचे सगळेच जन्म आठवतात’
‘मग अलीकडचा एखादा जन्म सांग थोडक्यात’.
‘आता बास झालं. आज आपण दुसरं कांही तरी बोलू...’
‘????’
‘मला एखादा विनोद सांगा बघू...’
‘आधी तू सांग....’
‘ओके.... तुम्हाला तो हत्ती आणि मुंगीचा जोक माहीत आहे का?’
‘कोणता?’
‘एक हत्ती होता आणि एक मुंगी होती....’
‘हां, ऐकल्यासारखं वाटतंय... तोच ना तो ज्यात  हत्तीचा अपघात होतो आणि मुंगी हत्तीसाठी रक्तदान करते...?’
‘तो नाही... एका हत्तीचं आणि मुंगीचं  प्रेम होतं. त्यांना लग्न करायचं होतं, पण मुंगीच्या आई-वडिलांनी नकार दिला’
‘हे आई-वडील पण ना....  पण कारण काय नकार देण्याचं? हत्तीसाठी मुलीला खूप स्वयपाक करावा लागंल म्हणून? की इंटरकास्ट नको म्हणून? खि खि खि खि..’
‘नाही हो, त्या हत्तीचे दोन दात पुढं आले होते म्हणून...’
‘हत तिच्या, काय पण पीजे सांगतेस... आत्ता मी पण तुला एक पीजे सांगतो’
‘ओके, सांगा..’
‘तुला पेरू माहीत आहे?’
‘हो, मला आवडतो खायला’
‘तो पेरू नव्हे, पेरू नावाचा देश..’
‘हो, माहितेय... दक्षिण अमेरिकेत आहे...’
‘हां, तोच तो.. तर त्या पेरूमधले लोक फार चिक्कू आहेत’
‘हाहाहाहा....काय पण जोक... पेरूचा एक पीजे मला पण माहीत आहे ..’
‘सांग की मग..’
‘ब्राझीलच्या एका फूटबॉल खेळाडूनं पेरूमधल्या एका मुलीशी लग्न केलं... तर लोक त्याला नावं ठेवायला लागले.... काय येडा आहे, एका 'पेरूवाली'शी त्यानं लग्न केलं म्हणून’
‘खिखिखिखि.... हसलो...पुढं....?’
‘पुढं तुम्हीच एखादा जोक सांगा...’
‘ओके... एक रेडा होता आणि एक गाय होती... त्या रेड्याला ती गाय आवडत असे. एक दिवस तो तिला म्हणाला, विल यु मॅरी मी? तर ती गाय म्हणाली, आय एम नॉट रेडी’
‘‘ही ही ही ही.. ओके, आता मी एक जोक सांगते...’
‘सांग’
‘एक आळशी तरूण असतो. तो त्याच्या रूमवर दुपारच्या वेळी झोपलेला असतो. तेवढ्यात त्याच्या दारावर ‘टक टक’ असा आवाज येतो. तो तरुण ओरडतो, कोण आहे? बाहेरून आवाज येतो, ‘आय एम ऑंपोरच्युनिटी’ तर तो तरुण ओरडतो, ‘यु कान्ट बी, बिकॉज ऑंपोरच्युनिटी नॉक्स ओन्ली वन्स’
‘हा हा हा.. हा जोक मला उद्देशून बनवलास वाटतं? तू म्हणजे ऑंपोरच्युनिटी वाटतं?’
‘मे बी...’

‘अच्छा, जाने दो... एक शेर सुनाऊ?’
‘जरूर...’
‘अर्ज है.... तुम्हे देखकर मुझे चांद की याद आती है... उसपर भी जो दाग है...’
‘वाह वाह... वाह वाह... पण हे मला उद्देशून होते काय?’
‘मी कुठं तुला प्रत्यक्षात बघितलंय? मग तुला उद्देशून कसं असेल? आणि तुझ्या चेहऱ्यावर खरंच डाग आहेत काय?’
‘मिस्टर महावीर, तुम्ही भेटाच एकदा मला... मग कळंल तुम्हाला माझा चेहरा चंद्रासारखा आहे की शुक्रासारखा...’
 ‘बरं, ते जाउदे....मला एका मराठी वाक्याचे हिंदी भाषांतर जमेना झालंय... तू करून देशील का...?’
‘देईन की.. त्यात काय एवढं? ... काय वाक्य आहे?’
‘वाक्य आहे, मला पाठवले नाही’
‘त्यात काय अवघड आहे... मुझे भेजा नहीं’
‘तुझे भेजा नही? खरंच? मी तर तुला जिनिअस समजत होतो... तूही समजतेस. पण तू स्वत:च म्हणतेस तुझे भेजा नहीं म्हणून...’
‘हसू की रडू...?’
‘रडू नकोस, यु शुड अॅक्सेप्ट द फॅक्ट’
‘ओ मिस्टर महावीर, तुम्ही काय मला खरेच बुद्धू समजता काय?’
‘तूच म्हणालीस की तुझे भेजा नहीं म्हणून..’ 
‘इट इज इनफ... लहान आहे म्हणून मी तुमचं कांहीही ऐकून घ्यायचंकाय..?’
‘रागावलीस?’
‘.......’
‘????’
‘.......’
 ‘ए, हस ना...’
‘बाय बाय..’
‘दिशा.... जाऊ नकोस, थांब’
पण दिशाचं उत्तर नाही.. ती मेसेंजरमधनं लॉग आउट झाली.
माझ्या छातीत धस्स झालं..
आता काय करावं.... मला कांही सुचंना.
मग वाटले, टेलेफोन बूथ मध्ये जाऊन तिला फोन करावा.
मी लॉग आउट होणारच होतो, इतक्यात दिशा परत आली..
‘हाय मिस्टर महावीर....’
‘हाय..’
‘लिसन... टेक धिस सिरीअसली. नेव्हर हर्ट मी. इफ यु डू इट अगेन, यु विल बी नो व्हेअर’
‘चक्क धमकी?’
‘ही धमकी नाही.. धिस इस युवर फेट.. आणि तुमच्याबरोबर मलाही त्रास होईल...  मिस्टर न्यूमरॉलॉजीस्ट, यू नो व्हाट हॅपन्स इफ समवन चॅलेंजेस बर्थ नंबर वन पर्सन..’
तिचं शेवटचे वाक्य वाचून मी चमकलो. न्यूमरॉलॉजीनुसार विचार केला तर दिशा मला बरबाद करू शकते हे मला लक्षात आले.
‘दिशा, हे तू काय म्हणतेस... आणि आय वाज जस्ट किडिंग.. तुला दुखवायचा माझा हेतू नव्हता’
‘हेतू कांहीही असो, पण तुम्ही मला दुखवलं आहे...’
‘आय फील वेरी सॉरी फॉर दॅट... एक सांग, मला तुझी चेष्टा करण्याचा अधिकार आहे की नाही?’
‘आहे... पण जरा जपून... माझ्या बुद्धीची चेष्टा केली तर मला ती सहन होत नाही. तो अधिकार मी तुम्हालाही दिलेला नाही... अजून तरी...’
‘बरं बाई, चुकलो. मी पुन्हा तुझ्या बुद्धीची चेष्टा करणार नाही. वेडे, तू बुद्धीमान आहेस म्हणून तर मला आवडतेस. हे तुला चांगलेच माहीत आहे’
‘बाय फॉर नाऊ... टेक केअर’ असे म्हणून ती पुन्हा गायब झाली.

संध्याकाळी सात वाजता मी तिच्या मोबाईलवर फोन केला. तिनं तो उचलला नाही. दोन तीन वेळा ट्राय केले. नो अन्स्वेर. मग तिच्या लॅंडलाईन वर फोन केला.

‘हॅलो’
‘व्हू इज इट?’ तिकडून दुसऱ्याच कुणा मुलीचा आवाज आला.
‘महावीर हिअर. मे आय स्पीक टू दिशा?’
‘ओह.. तो आप महावीर हैं...’
‘येस... क्या मैं जान सकता हूं आप कौन बात कर रही हो?’
‘मैं निशा... दिशा की छोटी बहन..’
‘ग्लॅड टू मीट यू... दिशा कहां हैं?’
‘दोपहर से उसका मूड ऑफ है. सो रही है’
‘क्या हुआ? उसने कुछ बताया?’
‘कहती है सर में दर्द हैं... बाकी आप ही जाने’
‘ठीक है.. प्लीज उसे कह देना कि मेरा फोन आया था’
‘कह दूंगी...’
‘थॅन्क्स’
‘एक रिक्वेस्ट है..’
‘क्या?’
‘प्लीज डोन्ट हर्ट हर’
‘ओके, आय विल टेक केअर’
‘और उसे हमेशा खुश रखने की कोशीश कीजिये’
‘करूंगा... लेकीन एक बात बताओ, उसे कोई प्रॉब्लेम तो नहीं?’
‘बिलकुल नहीं....’ 
‘मुझे तो कभी कभी उससे डर लगता है’
‘डरने की कोई बात नहीं है’


पुढचे दोन दिवस मी मेसेंजरमध्ये लॉग इनच झालो नाही, दिशाला फोनही केला नाही. तिस-या दिवशी मी लॉग इन झालो तर ती तेथे आधीच आली होती. मी ठरवलं, आपणहून आधी तिला मेसेज पाठवायचा नाही, ती काय बोलते ते बघू.

‘या या या... तुमचीच वाट बघत होते... कुठं गायब झाला होता हो दोन दिवस?’ दिशा म्हणाली. ती रागात होती. आता हिला कांहीतरी थाप मारायला पाहिजे. काय सांगावं बरं? हां....
‘दिशा, माझं डोकं दुखत होतं... अजूनही दुखतंय ... दोन दिवस माझा मूड ऑफ होता..’
‘मिस्टर थापा, खोटं बोलू नका.. आणि मूड ऑफ व्हायचं कारण काय?’
‘तू माझ्यावर रागावली होतीस ना, म्हणून..’
‘मग मी तुमच्यावर रागवायचं नाही का? ’
‘मी तसं कधी म्हणालो... मला वाटतं इथून पुढं तू म्हणशील तसं सगळं मला करावं लागणार आहे’
‘गुड बॉय’
‘जी मॅडम’
‘संध्याकाळी फोन करा..’
‘जी मॅडम’
‘आणि खरंच डोकं दुखत असेल तर विश्रांती घ्या जरा.. टेक केअर, बाय...’
‘बाय दिशा’
सुटलो एकदाचा... आज लगेच सोडून दिलं तिनं... पण तिच्यापासून कायमची सुटका कशी करून घ्यायची? तिला दुखवायचे तर नाही.... दुखावले तर आपलं काय खरं नाय बाबा... पण आधी दिशा ही काय भानगड आहे याचा छडा लावायलाच पाहिजे..... आता तिच्या आणखी एखाद्या जन्माची माहिती तिच्याकडून काढून घेवून मग कामाला लागू...

पुढे चालू:


या दीर्घ कथेचे आधीचे भाग

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा