Advt.

Advt.

गुरुवार, २६ मार्च, २०१५

गूढकथा: पाठलाग 1992-2015

-महावीर सांगलीकर 


डॉक्टर दिनेश यांचा फोन आला.... ‘सर, माझ्याकडे एक विचित्र केस आलीय....’
‘काय झालं?’ मी विचारलं.
‘माझा एक पेशंट आहे. बिझनेसमन आहे. बडी आसामी आहे. मॅरीड. वय वर्षे 36’, डॉक्टर दिनेश भरभर सांगू लागले, ‘सगळं व्यवस्थित चाललं असताना त्याला एक तरुणी येऊन भेटली आणि म्हणाली, ‘ओळखलंत का मला? मी अनिता आहे...’
‘ही अनिता कोण?’ मी विचारलं.
‘माझा हा पेशंट 1992 साली पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये शिकत होता. त्याच्या वर्गात अनिता नावाची एक मुलगी होती. दोघांचं प्रेम जमलं. त्यांनी लग्न करायचं ठरवलं, पण दोघांच्या घरच्यांचा विरोध. मग त्यांनी गुपचूप लग्न केलं. पण कांही महिन्यातच अनिताचा अपघात झाला आणि त्यात ती गेली’
‘पुनर्जन्माची केस दिसते’
‘नाही... कारण अनिता 1992मध्ये मेली आणि आता जी तरुणी स्वत:ला अनिता म्हणून सांगते, तिचा जन्म 1986 साली झालाय’
‘इंटरेस्टिंग....समजलं मला काय आहे ते. पण आणखी एखादी विचित्र घटना घडली काय?’
‘आज सकाळी तो पेशंट माझ्याकडे आला होता.. मी त्याला तपाsसत होतो, एवढ्यात तिचा फोन आला.. तिनं विचारलं, तुम्ही कोठे आहात? तर तो म्हणाला, मी माझ्या ऑफीस वर आहे, काम करत बसलोय... ती म्हणाली, नाही, तुम्ही ऑफीस वर नाही आहात, तुम्ही दवाखान्यात आहात. तुम्हाला कांही तरी झालय’
‘म्हणजे ती ऑफीसवर गेली होती?’
‘नाही, ती दूर तिकडे कर्नाटकात तिच्या गावी गेलेली आहे’
‘कर्नाटकात?’
‘गेल्या वर्षी तिचं लग्न झालं.. बेळगावला. तिचा नवरा बेळगावमध्येच जॉब करत होता. एक दिवस ती त्याला म्हणाली, आपण पुण्यात जाऊन राहूया. मग ते दोघे पिंपरी येथे येऊन राहिले. कांही दिवसांनी त्यांनी पिंपरी सोडले आणि वाकडेवाडीला येऊन राहू लागले. शेवटी आमच्या भागात येऊन राहिले. मग तिने माझ्या पेशंटला गाठले. ज्या गोष्टी केवळ माझ्या पेशंटला माहीत आहेत आणि मूळ अनिताला माहीत होत्या त्या सगळ्या ही अनिता सांगत असते.... अगदी बारीक सारीक. काय असेल हे?’
‘सिंपल केस. मूळ अनिताचा आत्मा भरकटत होता. तिच्या नव-याला भेटण्यासाठी. तिला वेळेवर योग्य माध्यम मिळाले नाही. शेवटी तिने दुस-या एका तरुणीच्या शरीरात प्रवेश केला, आणि मग पुढच्या घटना घडल्या’
‘मग आता काय करायचं?’
‘वेट एंड सी... बघूया अजून काय काय होतंय ते. तोपर्यंत तुम्ही हिप्नॉटिझम शिकून घ्या’

(सत्यकथा)

हेही वाचा:
दिशाचा पहिला जन्म
सलोनी राठोड 
कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा