Advt.

Advt.

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

Funny वधूपिता .........

-महावीर सांगलीकर 


एक गृहस्थ मला म्हणाले,  
‘आमच्या पोरीला एखादं स्थळ बघा की!’
‘बायोडाटा आणलाय का?’
‘नाही’
‘वय किती आहे तिचं?’
‘आसंल एक पंचवीस-सव्वीस वर्षं’
‘पंचवीस का सव्वीस?’
‘तिला विचारून सांगतो’
‘बरं, उंची किती आहे?’
‘तिची ना......? पाच-सव्वा पाच फुट आसंल’
‘अवघड आहे.... शिक्षण किती झालंय?’
‘माझं बारावीपर्यंत झालंय की’
‘अहो तुमचं शिक्षण घेऊन काय करायचं? पोरीचं शिक्षण किती झालंय?’
‘ती बरीच शिकलीया’
‘बरीच म्हणजे किती?’
‘तिला विचारायला पाहिजे’
‘परत अवघड आहे..... बरं, काय अपेक्षा आहेत तुमच्या?’
‘मुलगा पुण्या-मुंबईचा पाहिजे. गव्हर्मेंट सर्विस पाहिजे. पगार भरपूर पाहिजे, आणि शेती पण असावी दोन चार एकर’
‘आणखी?’
‘आणखी घर असावं स्वत:चं’
‘इंटरकास्ट स्थळ चालेल का?’
‘पोरीला चालंल, पण मला अजिबात नाय चालणार!’
‘बरं, असं एक स्थळ आहे आमच्याकडं, तुमच्या जातीचं. मुलगा सरकारी नोकरीत आहे, ऐंशी हजार रुपये पगार आहे आणि मुलाची दहा एकर शेती आहे पुण्यात शनिवार वाड्याजवळ जवळ. पण त्याच्या कांही अटी  आहेत’
‘काय?’
‘मुलीनं शेती सांभाळायला पाहिजे. तिला ट्रॅक्टर चालवता यायला पाहिजे, शेतातली सगळी काम करता यायला पाहिजेत. आणि तिनं शेतातल्या घरातच राहायला पाहिजे......शिवाय सध्या शेतमजूर मिळत नाहीत, त्यामुळं तुम्ही स्वतः आणि तिच्या भावाने पण त्या शेतात काम करायला यायला पाहिजे. आहे का तयारी तुमची आणि तिची?’
त्या गृहस्थाचे तोंड पाहण्यासारखे झाले!

हेही वाचा:
हॅलो, मी बोलतेय!
टीना की कहानी

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा