Advt.

Advt.

Saturday, December 5, 2015

Time paas: फोबियाज आणि त्याचे प्रकार

-महावीर सांगलीकर 

कुणाला पाण्याची भिती वाटते, तर कुणाला उंचावर चढण्याची भिती वाटते. कुणाला गर्दीची भिती वाटते तर कुणाला एकांताची भिती वाटते. कुणाला कुत्र्यांची भिती वाटते तर कुणाला मांजरांची! अशी भिती वाटणे ‘फोबिया’ म्हणून ओळखले जाते. पण हे फोबियाज फार किरकोळ प्रकारचे आहेत. आपला समाज यापेक्षा अनेक भयानक फोबियाजना बळी पडला आहे आणि मनोरुग्ण बनला आहे. अशा कांही फोबियाजचा उल्लेख करावासा वाटतो.

मुस्लिम फोबिया: हा जास्त करून हिंदुत्ववाद्यांना होतो. हा फोबिया झालेले लोक मुस्लिमांच्या विरोधात ओरड करत असतात, पण एखादी मुस्लिम व्यक्ति समोर आली की यांची बोलती बंद होते! खान आडनावाचे अभिनेते यांना अजिबात आवडत नाहीत! (विशेष म्हणजे हा फोबिया ब्राम्हणांना जास्त प्रमाणात होतो आणि मग तो इतर समाजात साथीच्या रोगासारखा  पसरतो!). हा फोबिया झालेल्यांच्या मोठमोठ्या संघटना आहेत. त्यातल्या मुख्य संघटनेत जास्त करून साठी पार केलेले लोक असतात. पण तरीही ते अर्धी चड्डीच घालतात. (आता बर्म्युडा घालणार आहेत म्हणे!). हा फोबिया पुरोगाम्यांना अजिबात होत नाही.

ब्राम्हण फोबिया: हा एक जनरल फोबिया आहे आणि तो ब्राम्हण सोडून इतर बहुतेक सगळ्यांना होतो. हिंदुत्ववाद्यांना मुस्लिम देशाचे शत्रू वाटतात तर ब्राम्हण फोबिया झालेल्यांना ब्राम्हण हे देशाचे आणि समाजाचेही शत्रू वाटतात. हा फोबिया झालेले लोक बामसेफ, संभाजी ब्रिगेड यासारख्या संघटनात जाऊन आपला हा फोबिया आणखीन वाढवून घेतात. ब्राम्हण फोबिया झालेल्यांना मुस्लिम फोबिया सहसा होत नाही.
  परप्रांतीय फोबिया: हा फोबिया जास्त करून मुंबई, ठाणे, पुणे या एरियात रहाणाऱ्या मराठी भाषिक कामगार लोकांना होतो. विशेष म्हणजे हा फोबिया झालेले लोक परप्रांतीयांच्या कंपन्यात काम करत असतात.
  जैन फोबिया: हा विशेष करून मुंबईतील मध्यमवर्गीय मांसाहारी लोकांना होतो. परप्रांतीय फोबिया झालेल्या प्रत्येकाला हा होतोच.
  मराठा फोबिया: हा विशेष करून महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला होतो.
  मोदी फोबिया: हा फोबिया सर्व पुरोगामी लोकांना होतो. मोदी भारतात नसले तरी हा फोबिया होत असतो.
  सोनिया फोबिया: हा जवळ जवळ सर्वच मोदीभक्तांना होतो.
  राहुल फोबिया: हा सोनिया फोबियाचा उपप्रकार आहे. तोही मोदीभक्तांना होतो.
  पत्नि फोबिया: विशेष म्हणजे स्त्रियांना वरील प्रकारचे फोबियाज फार कमी प्रमाणात होत असतात! पण स्त्रियांमुळे  अनेक लोकांना पत्नि-फोबिया होत असतो. पत्नि-फोबिया झालेले लोक बायकोला घाबरतात, पण बाहेर मात्र आपण शूर असल्याचा आव आणतात. हा फोबिया झालेल्यांची ‘पत्निपीडीत पति’ नावाची संघटना आहे.

वरीलपैकी कोणताही फोबिया झालेल्याचे आपल्या कामावर लक्ष लागत नाही आणि तो सतत भुंकत रहातो. (या भुंकण्याला Freedom of Expression असे म्हणतात!).

या लोकांना त्यांच्या-त्यांच्या फोबियामधून बाहेर काढणे फार अवघड गोष्ट असते. त्यांच्यावर दीर्घकालीन मानसोपचार करण्याची गरज असते. पण हे बहुतेक लोक आपल्याला फोबिया असल्याचे मान्य करत नाहीत आणि त्यातून बाहेर पडण्याची त्यांची इच्छाही नसते.

हेही वाचा:
ज्याचे त्याचे संस्कार
व्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव
वाचक
संगतीचा परिणाम
एका बदल्याची गोष्ट

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा