Advt.

Advt.

Thursday, November 5, 2015

हॅलो, मी बोलतेय!

-महावीर सांगलीकर

“हॅलो!”
“हॅलो, कोण बोलतेय?”
“अहो, मी बोलतेय!”
“मी म्हणजे कोण?”
“माझा आवाज नाही ओळखलात?”
“सॉरी, नाही ओळखला. त्याचं काय आहे, मला फक्त महत्वाच्या लोकांचेच आवाज ओळखता येतात”
“माझा नंबर पण सेव्ह केलेला नाही तुमच्याकडे?”
“नाही ना! असता तर तुम्ही कोण हे लगेच ओळखले असते ना मी तुमच्या नावासकट!”
“अहो, मी लता बोलतेय”
“कोण लता? मंगेशकरांची का?”
“अहो, चेष्टा काय करताय? मी लता भोसले बोलतेय!”
“लता भोसले..... हे नाव कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतं. तुम्ही गायिका आहात ना?”
“मला वाटतंय रॉंग नंबर लागलाय. तुम्ही कोण बोलताय?”
“तुम्ही कोणाला फोन केलाय?”
“प्लीज सांगा ना तुम्ही कोण बोलताय?”
“मी मी बोलतोय”
“मी म्हणजे कोण?”
“विसरलीस का?”
“.........”
“माझा आवाज नाही ओळखलास?”
“नाही.... तुमच्या आवाजात प्रॉब्लेम आहे. आय मीन फोनच्या आवाजात प्रॉब्लेम आहे”
“बरं, चेष्टा बस्स झाली. का फोन केलास? कांही विशेष काम होतं का?”
“काम असलं तरच फोन करायचा का? तुम्ही मला फोन करत नाही म्हणून मी फोन केला”
“अगं, वेळच मिळत नाही बघ कोणाला फोन करायला”
“खोटं नका बोलू! ... कधी बघेल तेंव्हा तुमचा फोन एंगेजच असतो”
“अगं, क्लाएंट्सचे फोन येत असतात सारखे”
“निशा पण तुमची क्लाएंट आहे वाटतं... तिला बरं सारखं फोन करत असता?”
“तुला कसं माहीत?”
“आहे माहीत. ती तुम्हाला मिस कॉल देते आणि मग तुम्ही लगेच तिला फोन करता. तास-तासभर बोलत असता तुम्ही तिच्याशी”
“काय तरीच काय बोलतेस? तासाभरात काय बोलून होणार आहे तिच्याशी? हा हा हा”
“घ्या हसून! पण तुमचे हे हसू जास्त काळ टिकणार नाही. तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे”
“काय?”
“फॉर यूवर काईंड अटेन्शन, निशाचं दुसरं पण एक अफेअर चालू आहे”
“चालू दे की मग! त्यात काय एवढं मनावर घेण्यासारखं?”
“ती म्हणे त्याच्याशी लग्न पण करणार आहे!”
“अरे वा! चांगली बातमी आहे. कुणीतरी मिळाला म्हणायचा तिला तिच्याशी लग्न करायला”
“तुम्हाला वाईट नाही वाटलं?”
“यात काय वाईट वाटायचं? पण तू तसलं कांही केलंस तर नक्कीच वाईट वाटेल”
“........”
“मग आज भेटायचं का संध्याकाळी?”
“अं.... नको! आज मला मैत्रीणीबरोबर जायचं आहे शॉपिंगला”
“ओके, ठीक आहे. आपण नंतर कधीतरी भेटू. चल बाय, टेक केअर”

थोड्या वेळाने..........

“अहो, मी बोलतेय!”
“बोल! आता काय झालं?”
“आज संध्याकाळी भेटायचं असं म्हणत होता ना तुम्ही मघाशी?”
“हो, पण तूच नको म्हणालीस. शॉपिंगला जायचं आहे ना तुला तुझ्या मैत्रिणी बरोबर?”
“तिनं शॉपिंगला जायचं कॅन्सल केलं”
“अच्छा! तिनं जायचं कॅन्सल केलं म्हणून आपण भेटायचं? मग नको”
“.........”
“तुला बघ माझी ओढच वाटत नाही. तुझ्यात आणि निशात हाच फरक आहे बघ. मी भेटायला बोलावलं की ती सगळी कामं बाजूला टाकून येते”
“अहो तुम्हाला कळत कसं नाही?”
“सगळं कळतं”
“काय कळलं सांगा?”
“हेच की, शॉपिंगला जायचं तुझ्या मैत्रीणीनं नाही, तर तू कॅन्सल केलंस!”
“........”
“ठीक आहे! ये मग संध्याकाळी शार्प सात वाजता झेड ब्रिजवर”
“तिथं नको!”
“का?”
“तिथं निशा असेल तिच्या बॉय फ्रेंडबरोबर त्या वेळेला”
“असू दे की मग!”
“नको! आपल्याला बघितलं तर नंतर ती माझ्याशी आणि तुमच्याशी पण भांडेल”
“मग कुठं भेटायचं?”
“सी.सी.डी.ला भेटू फर्ग्युसन रोडवर”
“त्यापेक्षा आपण शिवसागरला भेटू जेएम रोडवर”
“तिथं नको”
“का”
“तिथं माझा बॉय फ्रेंड कामाला आहे. बघेल तो”
“छान! हे चाललंय काय तुझं?”
“तुमचं जे चाललंय तेच”
“ठीक आहे! आपण भेटायलाच नको मग! उगीच भांडणं व्हायची आपली लोकांसमोर”
“भांडण्यासाठीच तर भेटायचं आहे मला तुम्हाला. तुम्ही भेटा तर खरं, मग बघते तुमच्याकडं”
“मला माहीत आहे तुला बॉयफ्रेंड वगैरे कोणी नाही आहे. खोटं बोलतेस तू”
“........”
“खरं ना?”
“आहे आहे आहे! पण मी तुमच्यासाठी त्याला सोडायला तयार आहे. पण तुम्ही पण निशाचा नाद सोडायला पाहिजे”
“ठीक आहे, सोडेन! पण आधी तू तुला बॉयफ्रेंड आहे हे सिद्ध करून दाखव. आज आपण शिवसागरालाच भेटू. त्याच्याशी ओळख करून दे माझी”
“अहो पण त्याला वाईट वाटेल”
“वाटू दे की! नाहीतरी त्याला सोडून देणारच आहेस ना तू? मग काय फरक पडतोय”
“पण आज त्याला सुट्टी असेल”
“मघाशी तर तू म्हणालीस तो तिथं असणार म्हणून...”
“मघाशी माझ्या लक्षात नाही आलं सुट्टीचं”
“ठीक आहे, मग आपण उद्या भेटू तिथं”
“नको! आजच भेटू”
“पण मग तुझा बॉयफ्रेंड कसा भेटणार आज?”
“अहो तुम्हाला कळत कसं नाही?”
“सगळं कळतं.. पण तुझ्या तोंडून ऐकावसं वाटतं”
“काय?”
“हेच की यू लव्ह मी”
“.......”
“म्हण ना”
“.........”
“ठीक आहे, फोनवर नको म्हणूस, संध्याकाळी भेटल्यावर प्रत्यक्षात म्हण”
“तुम्ही या वेळेवर... मग बघू... बाय”

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा