Advt.

Advt.

Wednesday, April 9, 2014

दिशा विविध भारतीवरघरी आलो आणि डायरीत शुक्रवारच्या कार्यक्रमाची नोंद केली. त्यावेळी लक्षात आले की त्यादिवशी माझा वाढदिवस आहे. त्या कार्यक्रमाचा माझ्या वाढदिवसाशी कांही संबंध आहे का? की हा केवळ योगायोग आहे? दिशाला माझा वाढदिवस कधी असतो हे माहीत असण्याचे कारण नव्हते, तिने कधी तो विचारला नव्हता आणि मीही तो तिला सांगितला नव्हता. अगदी दहा वर्षांपूर्वी देखील. उद्या विचारूच तिला काय भानगड आहे ते. 

दुस-या दिवशी नेटवर च्याटिंग करत असताना मी तिला विचारले,
‘दिशा मला सांग, तुझा वाढदिवस कधी असतो’
‘1 डिसेंबर’
‘अजून खूप लांब आहे’
‘हो’
‘आणि तुझे जन्मसाल?
‘ते नाही सांगणार...... सध्यातरी’
‘तू माझा वाढदिवस कधी असतो ते विचारले नाहीस’
‘विचारायला कशाला पाहिजे? तो मला माहीत आहे’
‘तुला कसा काय माहीत?’
‘अहो तुम्ही एक प्रसिद्ध व्यक्ति आहात. तुमच्याबद्दल बरीच माहिती इंटरनेटवर आहे. कुठेतरी तुमची जन्मतारीख असणारच की. इट इज सो इझी....’
‘म्हणजे माझ्याबद्दल इंटरनेटवरून तू बरीच माहिती गोळा केलेली दिसते’
‘फक्त इंटरनेटवरूनच नाही कांही.... आय ह्याव मेनी ऑदर सोअर्सेस...
माझ्या मागे डिटेक्टीव्ह तर सोडले नाहीस ना?’
‘नाही हो, जस्ट किडिंग....  आपके बारे में जानने के लिये सिर्फ इंटरनेट ही काफी है’


नंतर मी माझ्या रेडीओवर विविध भारतीचे मुंबई केद्र ऐकू येते का बघितले. ते फारच अस्पष्ट ऐकू येत होते. शिवाय खरखरत होते. मग मी रेडीओ घेऊन आमच्या बिल्डींगच्या टेरेसवर गेलो. तिथे ते स्टेशन लाऊन बघितले तर ते ब-यापैकी ऐकू येत होते.

शुक्रवार उजाडला. मी रेडीओमध्ये नवे सेल घातले. दुपारी 2.55ला टेरेसवर गेलो. रेडीओ सुरू केला. बरोबर तीन वाजता पुढील शब्द ऐकू आले:

‘यह विविध भारती का मुंबई केंद्र है. अब आप सुनने जा रहे है हमारा अगला कार्यक्रम मेरी पसंद. आज के इस प्रोग्रॅम में आप सुनेंगे प्रसिद्ध लेखिका दिशा कोठारी की पसंद के गीत’

मग एक आवाज आला, ‘हाय एंड ह्यालो एव्हरी बडी... धिस इस दिशा...... पूना में मेरा एक खास दोस्त है..  महावीर है उसका नाम. आज उसका जन्मदिन है. सबसे पहले मैं मेरे प्यारे दोस्त महावीर को Happy Birth Day कहना चाहुंगी.  मेरी पसंद के जो गीत आज आप सुनने जा रहें हैं, वे सारे गीत खास मेरे इसी दोस्त के नाम है. .....

हाय महावीर, सून रहे हो ना?

मग एक गाणे सुरू झाले....

तुम जियो हजारो साल
साल के दिन हो पचास हजार

हे गाणे संपल्यावर दिशा म्हणाली, ‘जब भी मुझे मेरे इस प्यारे दोस्त की याद आती है, तो मुझे याद आता है यह गीत....’

तेरा मुझसे है पहले का नाता कोई.....
यूंही नही दिल लुभाता कोई....
जाने तू... या जाने ना
माने तू.... या माने ना

या दोन गाण्यानंतर दिशाने ‘मुझे तुमसे प्यार कितना, यह तुम नही जानते......मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना’, ‘मान जाईये, बात मेरे दिल की जान जाईये...’ ही दोन गाणी वाजवली. मग म्हणाली,

‘अब आप सुनिये मेरी पसंद का आखरी गीत.....’. आणि मग पुढील गाणे वाजू लागले....

मैं तो कब से खडी इस पार
ये  अखियां थक गई पंथ निहार
आ जा रे..........


‘आय होप मेरा दोस्त मेरे दिल की बात को समझ गया होगा..’

हा कार्यक्रम ऐकताना आपण नक्कीच आभासी जगात वावरत आहोत असे मला वाटायला लागले. आपल्याला होतात ते भास नसून वास्तव आहे असे म्हणावे तर दिशाला आपण इतके का आवडतो, याचे उत्तर मला मिळत नव्हते. की यामागे वेगळेच कांहीतरी आहे?

दिशामुळे आपल्याला आनंद मिळत असला तरी तिचे जरा अतीच चालले आहे. ती वेडी मुलगी असावी असे म्हणावे तर तसे कोणतेही लक्षण तिच्या बोलण्यात, लिहिण्यात दिसत नव्हते. आपण तिच्याशी पहिल्यापासून हात राखूनच वागत आलो हे ठीकच केले. पण आपण तिच्या प्रेमात गुरफटून गेलो आहोत. याच्यातून बाहेर कसे पडायचे? आता आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागेल. पण घाई नको, नाहीतर भलतेच कांही तरी व्हायचे.

त्यादिवशी मी तिला कांही फोन केला नाही. तिला राग आला असेल, पण मनात म्हणालो, येऊ दे.

रात्री मला झोप येईना. अचानक मनात आले, आपण दिशाचे न्यूमरॉलॉजीकल रीडिंग करावे. कदाचित आपल्याला त्यातून कांहीतरी गवसेल. मी एक कागद आणि पेन घेवून कॅलक्यूलेशन्स सुरू केली. तिने तिची जन्मतारीख 1 डिसेंबर सांगितली होती. 1 तारीख म्हणजे बर्थ नंबर 1. द मोस्ट पॉवरफुल नंबर. माझा बर्थ नंबर 4. अरे हे दोन्ही नंबर तर क्लोज फ्रेंड्स असतात... या नंबरच्या व्यक्ति एकत्र आल्या तर ते चांगलेच असते. पण याच्याही पलीकडे कांही आहे का? तिने तिचे जन्मसाल नाही सांगितले. सांगणारही नाही म्हणाली. तेंव्हा आता आपल्यालाच shodhशोध घ्यावा लागेल. तिचे जन्मसाल 1970 ते 1972 च्या दरम्यान असावे असा आपण अंदाज केलाच आहे. पण यातले नेमके कोणते साल असावे? तिच्या स्वभावावरून, तिच्या वागण्यावरून, विचार करण्याच्या पद्धतीवरून तिचा लाईफ पाथ नंबर 4 असायला पाहिजे. म्हणजे तिची पूर्ण जन्मतारीख 1.12.1971 हीच आहे...   या तारखेची संपूर्ण बेरीज 22 येते... ....22...... माझी जन्म तारीख..   

ही गोष्ट माझ्यासाठी आश्चर्यकारक होती.

दुस-या दिवशी मी सायबर क्याफेत गेलो. मेसेंजरमध्ये लॉगin इन केले. दिशा कांही दिसली नाही. मग मी माझी इतर कामे करत बसलो. तेवढ्यात दिशा ऑनलाईन आली. आपण मेसेज पाठवावा की तिच्याकडून मेसेज यायची वाट पहावी याचा विचार करत होतो. इतक्यात तिचा मेसेज आला....

‘मग कसा काय वाटला कालचा विविध भारतीवरील प्रोग्रॅम?’
तिची फिरकी घेण्यासाठी मी म्हणालो, ‘सॉंरी दिशा, काल मला तो प्रोग्रॅम ऐकायला जमले नाही..’
‘मुझसे झूठ मत बोलो... काल तुम्ही तो प्रोग्रॅम ऐकला... टेरेसवर जावून...’ तिचे हे वाक्य वाचून मी हबकलो... हे आहे तरी काय? तिला या गोष्टी कशा काय कळतात....? 
‘सॉंरी म्याडम, आय वाज जस्ट किडिंग.... ऐकला मी तो प्रोग्रॅम .. छान होता. पण मला सांग मी तो टेरेसवर जावून ऐकला हे तुला कसे काय कळले?’
‘इट इज अ युज ऑफ कॉमन सेन्स. पुण्यात विविध भारतीचे मुंबई केंद्र नीट ऐकू येत नाही... त्यासाठी तुम्हाला उंचावर जावे लागणार.. टेरेस त्यासाठी सोयीस्कर.. मग तुम्ही टेरेसवरच जाणार... सो सिंपल.......’

या बयेने शेरलॉक होम्स वाचलेला दिसतोय, मी मनात म्हणालो.
‘ते ठीक आहे, पण मी तो प्रोग्रॅम ऐकलाच असेल याची तुला कशी काय खात्री?’
‘अपने आपसे पुछो महावीरजी, क्या आप मेरी बात को टाल सकते हो?’
‘दिशा, तुझं प्रेम जरा जास्तच उतू चाललेय... हे जरा अतीच वाटतेय.......प्रेमाचे जाहीर प्रदर्शन कशाला केलेस?’
‘प्यार किया तो डरना क्या... प्यार किया कोई चोरी नहीं.....’
‘परत सुरू झाला का तुझा प्रोग्रॅम.....’


या दीर्घ कथेचे आधीचे भाग:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा